* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VEDHA PARYAVARANACHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661767
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ENVIRONMENT IS AN ISSUE OF UTMOST IMPORTANCE IN THIS TWENTYFIRST CENTURY. WHEN MAN HIMSELF WAS TOTALLY DEPENDENT UPON THE NATURE LIKE THE OTHER LIVING THINGS, ADAPTING HIMSELF TO THE CONDITIONS OF THE EARTH, THE ENVIRONMENT WAS SAFE. BUT SINCE THE DAY MAN LEARNT THE ART OF FARMING AND DEVELOPED IT, HE STARTED DISTURBING THE ENVIRONMENT. HE IS WHOLE AND SOLE RESPONSIBLE FOR THE DESTRUCTION OF THE GLOBAL ENVIRONMENT. INITIALLY, HE STARTED WITH CUTTING DOWN FORESTS FOR FARMING AND SLOWLY SWITCHED OVER TO OTHER DESTRUCTIVE MODES SUCH AS BUILDING DAMS AND BUNDS AND SO ON. AFTER THE INDUSTRIAL REVOLUTION THE HUMAN INTERFERENCE WITH THE NATURE STARTED GROWING, AND HAS BEEN GROWING EVER SINCE. TWENTIETH CENTURY SAW THE WORST EFFECTS OF ALL THESE. AFTER THE END OF THE SECOND WORLD WAR, HUMANS STARTED REALISING THE IMPORTANCE OF ENVIRONMENT. STILL, IT WAS IN THE YEAR 1965 WHEN ENVIRONMENT PROTECTION WAS CONSIDERED SERIOUSLY. NIRANJAN HAS ATTEMPTED TO THROW A LIGHT ON THIS PROBLEM THROUGH HIS EARLIER BOOK, "PARYAVARAN PRADUSHAN` MEANING POLLUTION OF THE ENVIRONMENT. IN HIS PRESENT BOOK, NIRANJAN HAS GIVEN A DETAILED STUDY OF THE ENVIRONMENT DISCUSSING ITS VARIOUS ASPECTS. THE ENVIRONMENTALIST WILL SURELY FIND IT VERY HELPFUL. NIRANJAN SAYS THAT HE REALISED THE IMPORTANCE OF THE ENVIRONMENT AND THE DISASTER WHICH IS APPROACHING FAST TO ENGULF MOTHER EARTH WHEN HE READ "THE RUINS OF EARTH`, BY THOMAS M. DISH, "THE LAST GASP` BY TREVOR HOYLE AND "EVEN THE BIRDS ARE COUGHING` . AT THAT TIME, HE WAS CONDUCTING CLASSES FOR STUDENTS OF STANDARD NINE, MAKING THEM AWARE OF THE ENVIRONMENT. HE REALISED THAT THE YOUNGER ONES ARE BETTER IN A WAY THAT THEY WERE MORE CONCERNED ABOUT THE ENVIRONMENT BUT THERE WAS HARDLY ANY CONCERN IN THE ADULT MINDS ABOUT THE ENVIRONMENT. THIS IN TURN GAVE BIRTH TO THIS BOOK "VEDH PARYAVARNACHA`.
पर्यावरण हा विषय एकविसाव्या शतकात फार महत्त्वाचा ठरणार आहे. मानव शेती करू लागला, तेव्हापासून पर्यावरणावर परिणाम करणारा सर्वांत महत्त्वाचा घटक असं स्वरूप त्याला हळू हळू प्राप्त होऊ लागलं. शेतीसाठी जंगलतोड, पाण्यासाठी बांध, असं करत माणूस बरीच वर्षं जगला. औद्यागिक क्रांतीनंतर मानवाची निसर्गातली ढवळाढवळ वाढीस लागली. विसाव्या शतकात तिनं फारच गंभीर स्वरूप धारण केलं. दुसया महायुद्धानंतर पर्यावरणाचं महत्त्व हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागलं. १९६५ नंतर पर्यावरण संरक्षणाला महत्त्व प्राप्त झालं. पर्यावरणप्रदुषण ह्या महत्त्वाच्या ग्रंथानंतर निरंजन घाटे ह्यांच्या लेखणीतून पर्यावरणाची सांगोपांग माहिती देणारा हा महत्त्वाचा ग्रंथ उतरला आहे. पर्यावरणाच्या चाहत्यांना तो खूप उपयोगी पडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NIRANJAN GHATE #JYACHKARAVBHALA #PARYAVARANPRADUSHAN #MARATHIBOOKS #VEDHPARYAVARNACHA #DNYANDEEP #FARFARVARSHAPURVI #ROBOTFIXING #SWAPNACHOURYA#ज्याचंकरावंभलं #निरंजन घाटे #कथासंग्रह #एकाप्रकरणाचीसुरुवात #ज्याचंकरावंभलं #आणखीएकविकेट #जीनचेमाप #आमचाज्ञानेश्वर #एकामहादेवाचीकृपा #शेवटचाहप्ता #उद्योजक #अनूचाराजा #अनंतानावाचीवल्ली #बाळ्या #डायव्हर्शननिबाळासाहेब #व्यवहारी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JYACHAKARAVABHALA #NIRANJANGHATE #EKAPRAKANACHISURUVAT #AANKHIEKWICKET #JEENCHEMAP #AAMCHADNYANESHWAR #EKAMAHADEVACHIKRIPA #SHEVATACHAHAPTA #UDYOJAK #ANUCHA RAJA #ANANTANAVACHIVALLI #BALYA #DIAVARTIONNIBALASAHEB #VYAVHARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA) 26-05-2001

    पर्यावरणाचा वेध... आज पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. याला अनेकच घटक कारणीभूत आहेत. पण सर्वाधिक कारणं आहेत विसाच्या शतकात लागलेले दोन शोध. पहिला म्हणजे पेट्रोलमध्ये मिळालेलं शिसं आणि दुसरा म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बन किंवा सीएफसी वर्गी रसायं. हे दोन्ही शोध एकाच शास्त्रज्ञाने लावले. त्याचं नाव थॉमस एडिसन मिजली. मिजीचा बाप थॉमस आल्वा एडिसन या महान शास्त्रज्ञाचा चाहता आणि मित्रही होता. आपल्या मुलाने त्यांच्यासारखंच नामवंत शास्त्रज्ञ व्हावं म्हणून मिजलीने आपल्या मुलाचं नाव थॉमस आल्वा ठेवलं आणि खरोखरचं धाकटा मिजली तसा झालाही. १८८९ मध्ये जन्मलेला थॉमस आल्वा मिजली ऊर्फ मिज १९११ मध्ये डोमेस्टिक इंजिनिअरिंग कंपनीच्या संशोधन विभागात दाखल झाला. अनेक छोट्यामोठ्या शोधांमधून मिजचं नाव हळूहळू सर्वतोमुखी होत गेलं. त्याकाळच्या मोटारी पेट्रोलच्या असमतोल ज्वलनामुळे विचित्र आवाज करीत असत. हा दोष दूर करण्यासाठी मिजने तीन वर्षे सतत संशोधन केलं. त्याने पेट्रोलमध्ये तीन हजार वेगवेगळी रसायनं मिसळून पाहिली. अखेर टेट्रॅएथिल लेड. या रसायनामुळे त्याचं काम झालं. १९२० ते ३० या काळात अमेरिकेत फ्रीज खरेदीची लाट आली. त्या काळच्या फ्रीजमध्ये अमोनिया आणि सल्फर डाय ऑक्साईड हे वायू वापरत असत. बरेचदा हे वायू फ्रीजमधल्या अन्नात मिसळून अन्नाला अतिशय घाणेरडा वास यायचा. मिजने त्या जागी एखादा स्वस्त, बिनविषारी आणि गंधरहित वायू वावरायचं ठरवलं. त्यासाठी त्याने फ्रोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांची विविध संयुगं तयार करून असंख्य प्रयोग केले. यातूनच सीएफसी, वायूची निर्मिती झाली. त्याकाळी या दोन शोधांना मानवी औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. मिजला भरपूर प्रसिद्धी आणि अफाट संपत्ती मिळाली. आपल्या या शोधांमुळेच भावी काळात पृथ्वीच्या पर्यावरणाचा भयानक ऱ्हास होऊन संपूर्ण मानव जातीला ओझोन छिद्रासारख्या आपत्तीला सामोरे जावं लागेल. याची तेव्हा मिजला सुतराम कल्पना नव्हती. निरंजन घाटे यांच्या ‘वेध पर्यावरणाचा’ या पुस्तकाच्या एका प्रकरणातली ही माहिती आहे. वाढत्या वैज्ञानिकतेमुळे सुखसोयी वाढतायत, पण प्रदूषणही भयंकर होतंय. निसर्गाने सजीवांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेलं पर्यावरण उद्ध्वस्त होतंय आणि माणूस कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाची शिकार बनतोय. याची जाणीव झाल्यामुळे पाश्चिमात्त्य जगात आता पर्यावरणवाद हे तत्त्वज्ञान वाढू लागलं आहे. सामान्य माणसाचाही मोठ्या प्रमाणावर या चळवळीला पाठिंबा मिळू लागला आहे. वैज्ञानिक प्रगतीचा पार एका टोकाला जाऊन पोचलेला लंबक आता हळूहळू पुन्हा मध्याकडे येतोय याची सूचक अशी ही चिन्हं आहेत. ‘वेध पर्यावरणाचा’ मध्ये लेखकाने पर्यावरणाचा विनाश आणि त्यांच्या संवर्धनाच्या मोहिमा, उपाय, त्यांचा इतिहास अशा सगळ्याच गोष्टींचा साक्षेपाने घेतलेला वेध वाचकांसमोर मांडला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 08-07

    पर्यावरणाच्या अभ्यासाचा डोळस मागोवा... पर्यावरणविषयक जागृतीसाठी साऱ्या जगभर काही ना काही उपक्रम सुरू असतात. परिषदा, ग्रंथलेखन, व्याख्याने, चित्रफिती प्रदर्शन अशा अनेक माध्यमांतून पर्यावरणवादी आपली मते आग्रहाने मांडत असतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये र्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून झटणारे व पर्यावरणविषयक ज्ञानाचा धंदा करणारे असे काळे-गोरे दोन्ही पर्यावरणप्रेमी आपल्या आजूबाजूला वावरत असतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी म्हटला की एखाद्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटते. तर कोणाला घृणा वाटते. अशा वातावरणात निसर्ग, पर्यावरण याविषयी सातत्याने चिंतनशील लेखन करणारे निरंजन घाटे यांच्यासारखे विज्ञानवादी आशेच्या किरणाप्रमाणे भासतात. पर्यावरण, विज्ञान संदर्भात निरंजन घाटे यांनी आतापर्यंत १०० मराठी पुस्तके लिहिली आहेत. हा एक प्रकारचा ग्रंथिक विक्रमच आहे. विज्ञानाची परिभाषा सर्वसामान्यांना समजेल अशा ओघवत्या शैलीत सांगणे हे सोपे काम नाही. निरंजन घाटे यांचे ‘वेध पर्यावरणाचा’ हे पुस्तक अशा सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांच्या समोर येते. पर्यावरणाचा अभ्यास परिस्थितीकी शास्त्रज्ञांनी अधिक डोळसपणे केलेला आहे. परिस्थितीकी तज्ज्ञ सर्व प्रकारच्या सजीवांचे परस्परसंबंध तपासून पाहत असतात. एकतर यात विविधता आणि वैचित्र्य असते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे परस्परसंबंध परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. परिस्थितीला सध्या जीवविज्ञानाची शाखा मानण्यात येते. दोन किंवा अधिक सजीव जातींचे संबंध या सजीव जातीचे, त्यांच्या परिसरांचे संबंध, प्रदूषणाचा या सजीवांवर होणारा परिणाम, बदल अशा नानाविध विषयांचा अभ्यास परिस्थितीकी शास्त्रज्ञ करतात. माणूस हाही एक सजीव प्राणी असल्याने त्याच्या जीवनावश्यक किंवा इतर क्रियांचाही परिणाम परिस्थितीवर घडून येतो. ३ डिसेंबर, १९८४ रोजी भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातील विषारी वायुगळतीने २८०० माणसे मेली. ही अशाप्रकारची जगातील पहिलीच घटना होती. या घटनेने पर्यावरणविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा परामर्श घेताना ‘वेध पर्यावरणाचा’मध्ये निरंजन घाटे म्हणतात की, जेव्हा एखादी गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरते तेव्हा तिच्याबदली दुसरी गोष्ट आणली जाते. ती पहिल्या गोष्टीहून अधिक घातक ठरणार नाही किंवा आपल्याच जीवावर उठणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे विकसित राष्ट्रांमध्ये जी काळजी, ज्या सावधगिरीच्या उपाययोजना अमलात आणल्या जातात. त्या विकसनशील राष्ट्रांमध्ये, जिथे आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती वेगळी असते तिथे उपयोगी पडतीलच असे नाही. ‘वेध पर्यावरणाचा’ या पुस्तकामध्ये पर्यावरणाचा ज्ञात इतिहास, वर्तमान व भविष्याचा आलेख रेखाटण्याचा प्रयत्न निरंजन घाटे यांनी केलेला आहे. पाश्चात्य पर्यावरणाची सुरुवात, परिस्थितीकी अभ्यास, मानवी परिस्थितीकी, आम्ल पर्जन्य, विषवृष्टी, ओझोनचा थर, विसाव्या शतकातील शाप ठरलेला शास्त्रज्ञ, ओझोन विवर व पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे, ओझोन विवरातले राजकारण, ओझोन विवर व बदनाम ज्वालामुखी, ओझोन विवराच्या सिद्धांताचे विरोधक, सागरी पर्यावरण, विज्ञानकथा आणि पर्यावरण असे सुमारे २६ माहितीपर लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पर्यावरण अभ्यास हे विज्ञानाचे अंग असल्यामुळे त्यात मांडले गेलेले सिद्धांत प्रगत संशोधनानुसार... काळाच्या ओघात बदलतच राहणार आहेत. या अर्थाने निरंजन घाटे यांनी समकालीन संदर्भ देत पर्यावरणाचा घेतलेला वेध हा ‘शिळा’ ठरू शकतो. पण कालबाह्य होणार नाही. भविष्यातही पर्यावरणाची कालची, आजची व उद्याची स्थिती असा तौलनिक अभ्यास होतच राहणार आहे मराठीमध्ये उत्तम विज्ञानपुस्तके लिहिणाऱ्यांमध्ये घाटे यांचे नाव आघाडीवर आहे. पर्यावरण विषयाचा त्यांनी या पुस्तकाद्वारे घेतलेला वेध त्यांचा हा लौकिक सार्थ ठरवितो. -समीर परांजपे ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-12-2002

    पर्यावरणाची माहिती देणारा ग्रंथ... खूप पूर्वीपासून मानवप्राणी जंगलतोड खनिजपदार्थाचा हव्यास या पोटी पर्यावरणाला हानी पोचवत आला आहे, शेतीसाठी जंगल तोडणे, पैसा कमावण्याच्या आशेमुळे प्राण्यांची हत्या करणे यामुळे व अन्य अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धक्का ोचत आहे. पर्यावरणाच्या हानीला कोणकोणते घटक कारणीभूत असतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये. म्हणून मानवाने कोणती खबरदारी घ्यायला हवी या विषयी पुस्तकात लेखकाने खूपच परिश्रम घेऊन सर्वसामान्यांना नसणारी माहिती दिली आहे. लेखक हे स्वत: विज्ञान लेखक असल्यामुळे अत्यंत संशोधक वृत्तीने त्यांनी हे लेखन केले आहे, हे पुस्तक वाचताना लक्षात येते. निरनिराळ्या कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू वातावरणात मिसळल्यामुळे होणारे दुष्परिणाम, वणव्यामुळे अथवा मुद्दाम आगी लावून नष्ट केली गेलेली जंगले, ओझोन विवर, युद्धाचे पर्यावरणावर होणारे परिणाम, आम्ल पर्जन्य, एकविसाव्या शतकातील पर्यावरण याबरोबरच विज्ञानकथा आणि पर्यावरण यावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. पर्यावरणाची सांगोपांग माहिती देणारा हा ग्रंथ आहे. ...Read more

  • Rating StarMARMIK

    ‘मार्मिक’चे लेखक निरंजन घाटे यांना विज्ञानाचा ध्यास इतका मोठा आहे की बोलायची सोय नाही. कित्येक वर्षांपासून त्यांचे विज्ञानाच्या बाबतीत ‘शहाणे करोनि सोडावे सकळ जन’ हे वृत्त चालू आहे. विज्ञानामधले काही त्यांना वर्ज्य नाही. माहीत करून देणे नि माहीत करूनदेणे एवढेच त्यांना माहीत आहे. त्यांनी विज्ञानाचा अमूक अंगाने परिचय करून दिला नाही, असा दावा करणे कठीण आहे. मराठी पुस्तके खपत नाहीत. त्यातूनही विज्ञानासारख्या रुक्ष विषयाची पुस्तके खपत नाहीत. या प्रवादाला घाटे अपवाद आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या ३/३, ४/४ आवृत्त्या निघतात. दोन तर नक्कीच निघतात. १०० पुस्तके झाली तरी त्यांचा विज्ञानाचा पाठलाग चालूच आहे. ‘वेध पर्यावरणाचा’ हे त्यांचे ताजे पुस्तक त्या विषयाचा अनेक अंगोपांगांनी परिचय घडवणारे आहे. पर्यावरण हा विषय तसे पाहिले तर गेल्या तीन-चार दशकांत जास्त वाजायला-गाजायला लागला. चालू शतकाच्या पूर्वार्धात पर्यावरण या नावाचे काही ऐकू येत नव्हते. वनस्पती, प्राणी, यांच्या संहाराबाबत फुटकळ नाराजीचे उल्लेख तसे आढळतात. संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ म्हटले आहे तेवढेच त्याचा संबंध अध्यात्माशी होता. तो पर्यावरणाशी लावलेला पाहिला की हसू येते. अशा या विषयासंबंधीच्या जाणिवा निर्माण कशा झाल्या. विकसत कशा गेल्या. पर्यावरणावर वाईट परिणाम करणारे घटक कोणते, पर्यावरणाच्या खात्याला कारणीभूत कोण, अशा असंख्य विषयांचा परामर्ष या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यातला एक मासला. विसाव्या शतकातला शाप ठरलेला शास्त्रज्ञ विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रदूषणाने हाहाकार माजवला आहे. या प्रदूषणाची जबाबदारी एका कुठल्या तरी व्यक्तीवर निश्चित करायची झाली तर ते सहज शक्य आहे. याचं कारण आजचे दोन महत्त्वाचे प्रदूषक घटक म्हणजे पेट्रोलमधील शिसे आणि ओझोनचा नाश करणारी सीएफसी वर्गीय रसायने. पेट्रोलमध्ये शिशाचं संयुग मिसळणं आणि सीएफसी या दोन्ही गोष्टींचा शोध एकाच शास्त्रज्ञानं लावला. आपल्या संशोधनाने पुढं एवढा हाहाकार उडेल अशी त्या बिचाऱ्याला कल्पनाही नसेल. या शास्त्रज्ञाचं नाव आहे थॉमस एडिसन मिजली. आज मिजलीला दोषी ठरवणं सोपं आहे. त्या काळात मात्र या दोन शोधांचं स्वागतच झालं होतं. किंबहुंना या दोन शोधांना मानवी औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान देण्यात येत होतं. थॉमस एडिसन मिजलीचे आई-वडील नशीब काढायला म्हणून अमेरिकेत आले. ते स्वत: शोध लावून पोट भरणाऱ्या थॉमस अल्वा एडिसनला आपला आदर्श मानीत. आपल्या परसदारी नाना प्रकारचे प्रयोग करून नशीब काढायची मिजलीच्या वडिलांची इच्छा होती. थोरल्या मिजलीच्या नावावर लोखंडी धावेपासून वेगळं काढून हवा भरता येईल अशा रबरी धावेचे आणि त्यावरील आवरणाचे ब्रिटनमधले एकाधिकार होते. आज यांना आपण टायर व ट्यूब म्हणतो. त्यावेळी त्या शोधाला ‘डिटॅचेबल रिम टायर’ म्हणत. अमेरिकेत आल्यावर थोरल्या मिजलीनी आधी आपल्या दैवताचं थॉमस अल्वा एडिसनचं दर्शन घेतलं. त्या दोघांचा चांगलाच परिचय वाढला. या परिचयाच्या सन्मानार्थ मे १९८९ मध्ये जन्मलेल्या ‘मिज’चं नाव थॉमस एडिसन मिजली असं इेवलं मात्र या धाकट्या थॉमस मिजलीला सर्व परिचित ‘मिज’या उपनावानेच हाक मारीत असत. मिजच्या जन्मानंतर काही दिवसांतच हे कुटुंब ओहायोतल्या कोलंबस नावाच्या गावी राहायला गेलं. इथंच मिज वाढला. तोही वडिलांबरोबर यांत्रिक खटपटीत प्रवीण झाला. त्याने कॉर्नेल विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी हुशार विद्यार्थ्याना प्रायोजित करीत असे. मिजला एकट्यालाच ही शिष्यवृत्ती यावर्षी मिळाली होती. यावरून तो इतरांपेक्षा किती बुद्धिमान होता हे स्पष्ट होतं. १९०७ मध्ये नॅशनल कॅश रजिस्टरचं प्रायोजन मिळालेला मिज १९११ मध्ये कंपनीच्या शोध विभागात (आता या विभागाला आर अ‍ॅण्ड डी म्हणतात.) दाखल झाला. इथे त्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. थॉमस एडिसनचं नाव लावणारा मिज प्रसिद्धी तंत्रात एडिसन एवढाच पुढं गेलेला होता. वृत्तपत्र प्रतिनिधींना हव्या त्या बातम्या पुरवून स्वत:ची टिमकी कशी वाजवून घ्यावी हे त्याला चांगलंच कळत होतं. (याला आजकाल पी आर म्हणतात.) अगदी आजकालच्या प्रसिद्धी तंत्राने जे साध्य होणार नाही अशा तर्हेनं प्रसिद्धी मिळविण्यात तो पटाईत होता. एकदा पेट्रोलमध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळून त्यांचे परिणाम पाहत असताना त्या मिश्रणाचा स्फोट झाला. यामुळे त्याचा चेहरा भाजलाच पण त्याच्या डोळ्यात धातूचे कण गेले. यानंतर एका नेत्रतज्ज्ञाचे त्याच्या डोळ्यात शिरलेले मोठे तुकडे काढले पण सू़क्ष्म तुकडे काढणं त्या काळातल्या उपकरणांनी जमणं शक्यच नव्हतं. ते सूक्ष्म कण डाळ्यात असेपर्यंत त्या डोळ्याचा वापर करणंही अवघड होतं. मग मिजलीनं या प्रकणात स्वत: लक्ष घालायचं ठरवलं. बरेच धातू पाऱ्याला चिकटतात आणि याचा उपयोग मिश्र धातू बनवण्यासाठी केला जातो. याची ‘मिज’ला कल्पना होती. त्याने अतिशय शुद्ध पाऱ्याचे काही थेंब आपल्या डोळ्यात टाकले. त्या पाऱ्याला चिकटून ते धातूचे सूक्ष्म कण बाहेर आले. या सर्व प्रकारात ‘मिज’ला चांगलीच प्रसिद्ध मिळाली. पेट्रोलचं ज्वलन वठणीवर आणलं. ही घटना मिज डोमेस्टक इंजिनिअरिंग कंपनीत (डीईसी) ऋजू झाल्यावर घडली. डीईसीचा संस्थापक थॉमस केटरिंग याने मोटारीच्या स्वयंचलियाचा (सेल्फ स्टार्टर) शोध लावून भरपूर पैसे मिळवले होते. या स्वयंचलियाचा शोध लागण्यापूर्वी गाडी लोखंडी दांड्यानं यंत्र गरगर फिरवून चालू करावी लागत असे. स्वयंचलियाचा शोध लागला तरी तत्कालीन मोटारींमध्ये एक दोष उरला होता. या गाड्या पेट्रोलच्या असमतोल ज्वलनामुळे अतिशय विचित्र आवाज करीत असत. याचा तत्कालीन विनादेी चित्रपटात फार मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता आणि मोटारगाडी हा एक चेष्टेचा विषय बनला होता. जर हा दुष्पपरिणाम नाहीसा केला तर आपण कोट्याधीश बनू याची केटरिंगला खात्री पटत होती. पेट्रोलचं झटकन पेटणं आणि मग असमतोल जळणं यामुळं मोटारीचं यंत्रही लवकर खराब होत असे. पेट्रोलचं योग्य वेळी आणि सातत्याने एकाच वेगाने ज्वलन घडवू आणण्याची किमया थॉमस एडिसन मिजलीला साध्य करता येईल याची केटरिंगला खात्री वाटत होती. मिजनं या प्रश्नावर तीन वर्षे प्रयोग केले. त्यानं पेट्रोलमध्ये ३ हजार वेगवेगळी रसायनं मिसळून बघितली. केटरिंगनं त्याला धातूची संयुगं वापरून पाहावयास सांगितलं. या प्रयोगात आणखी दोन वर्षे गेल्यावर ‘मिज’ला हवं ते रसायन मिळालं. ते म्हणजे टेट्रॅएथिल लेड. हे झटकन पेट्रोलमध्ये मिसळत होतं. त्याच्या अल्पशा मिश्रणानं पेट्रोल योग्य वेळी पेट घेत होतं. त्याचं ज्वलन एकाच वेगानं होत होतं. यामुळे इंजिनातले आवाज थांबत होते. यामुळे मोटारी कमी इंधनात जास्त अंतर कापत होत्याच; व त्यांच्या यंत्रणाही व्यवस्थित चालून जास्त वेळ टिकत होत्या. मिजलीने एथिल हुंगलं या रसायनात तांबडा रंग मिसळून केटरिंगनं ते एथिल या व्यापारी नावानं बाजारात आणलं. सुप्रसिद्ध रसायन निर्मितीतल्या व्यापारी संस्थेने या रसायनाच्या निर्मितीचे हक्क विकत घेतले. छोट्या छोट्या बाटल्यांमधून हे रसायन पेट्रोलपंपांवर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येऊ लागलं. ‘मिज’ यांना एथिलायझर्स असे म्हणत असे. या एथिलचा विक्रमी खूप होऊ लागला. एवढ्यात १९२४ मध्ये ‘वेडा वायू’ अशी त्याची हवा झाली. न्यू जर्सीमधील एथिलनिर्मितीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना अष्टीभ्रम, वेडेवाकडे भास, खूप भीती आणि आक्रमकता यांचा त्रास होऊ लागला. हे झपाटलेले कामगार पुढे मरण पावले. हा मृत्युही अतिशय क्लेशकारक असे. अमेरिकन वृत्तपत्रांनी झपाटणारा वायू’, ‘वेडा वायू’ असे मथळे देऊन प्रचंड आरडाओरड या कारखान्याविरुद्ध केली. अमेरिकन जनमत एथिलच्या विरोधात गेलं. हे जनमत परत एथिलच्या बाजूने वळविण्यासाठी एखाद्या नाट्यपूर्ण प्रसंगाची आवश्यकता होती. वृत्तपत्रांमधून प्रथम ही बातमी जाहीर झाली. यानंतर एका आठवड्यानंतर थॉमस मिजलीनी एक वार्ताहर परिषद घेतली. ‘आम्ही सांगूनही या कारखान्यातील कामगारांनी संरक्षक मुखवटे वापरायला नकार दिला होता.’ असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या एथिलच्या साहाय्याने पत्रकारांसमोर हात आणि चेहरा धुतला. नंतर एक मिनिटभर या एथिलच्या वाफा हुंगल्या. यामुळे जनमानासातील एथिबद्दलची भीती दूर झाली. यानंतर दोन वर्षांत एक अब्ज लिटर एथिलयुक्त पेट्रोलची विक्री झाली. फ्रिजला नवं जीवदान याच काळात बाजारात शीतपेट्या उर्फ फ्रिज उपलब्ध होऊ लागले होते. १९२० ते ३०च्या दरम्यान अमेरिकेत फ्रिज खरेदीची लाट आली होती. फ्रिज आणणं हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. त्या काळात फ्रिजमध्ये अमोनिया आणि सल्फर-डाय-ऑक्साईड हे वायू वापरण्यात येत असतं. हे बरेचदा फ्रिजमधल्या अन्नात मिसळून अन्नास अतिशय वाईट वास यायचा आणि ते अन्न फेकून द्यावं लागत असे.’ रेफ्रिजरेटर बनवणाऱ्या फिजिडेअर या कंपनीनं केटरिंगला विनंती करून हा प्रश्न सोडवण्यासाठी मिजला उसना घेतला. फ्रिजच्या यंत्रणेतून थोड्या प्रमाणात वायू फ्रिजमध्ये निसटणार, हे मान्य करूनही एखादा स्वस्त, बिनविषारी आणि शक्यतो वासरहित वायू शोधून काढायची कामगिरी मिजवर सोपविण्यात आली. मिजला फ्लोरिन वायूची संयुगं वापरायची अटकळ सुचली. त्यानं फ्लोरिन, क्लोरिन आणि कार्बन यांची विविध संयुगं तयार केली. गिनीपिग आणि नंतर काही स्वयंसेवक यांना ही वायूरूप संयुगं हुंगायला दिली. त्यापैकी कुणालाही इजा झाली नाही हे वायू ज्यांना आज सीएफसी म्हटलं जातं त्या कुटुंबातले हे वायू वापरुन त्याने फ्रिज बनवून बघितले. त्या काळात चाचण्या प्रमाणित करण्यात आलेल्या नव्हत्या. शिवाय हे वायू विषारीही नव्हते आणि निष्क्रिय वाटत होते. त्यामुळे हे वायू शीतीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागले. एप्रिल १९३० मध्ये अटलांटा इथं भरलेल्या अमेरिकन केमिकल सोसायटीच्या वार्षिक परिषदेत मिजनं सीएफसीचा शोध अत्यंत नाट्यमयरीत्या जाहीर केला. त्यानं एका ग्लासात द्रव सीएफसी ओतलं. त्या द्रवाच्या वाफा हुंगल्या आणि मग उच्छ्वास टाकताना तोंडासमोर काडी पेटवली. अमोनिया आणि सफर-डाय-ऑक्साईड यांनी घेतलेल्या बळींप्रमाणे आता माणांचे बळी फ्रिज घेऊ शकणार नाहीत, याचं कारण हा नवा पदार्थ, असं त्याने जाहीर केलं. सीएफसी तेव्हा संपूर्ण जीवसृष्टीसच घातक ठरू शकतील याची त्याला कल्पना असणं शक्यच नव्हतं. सीएफसी वापरणाऱ्या रेफ्रिजरेटनी मग जुन्या फ्रिजना नामशेष केलं. १९३०च्या अखेरीस अमेरिकन बाजारात सीएफसी वापरणारे फ्रिजच उपलब्ध होते. फ्रिजिडेर, जनरल मोटर्स आणि द्युपाँ या तीन प्रमुख व्यापारी संस्था एकत्र येऊन आता या नव्या वायूची ‘फ्रिऑन’या नावानं विक्री करू लागल्या. या वायूमुळे द्युपाँची आर्थिक घडी स्थिरावली आणि पुढे ती बहुराष्ट्रीय राक्षसी कंपनी बनली. सीएफसी एवढे लोकप्रिय व्हायचे कारण म्हणजे त्यांची निर्मिती अगदी स्वस्तात होत होती. फ्रिजबरोबर वातानुकूलन यंत्रणा आणि सौंदर्यप्रसाधनांच्या फवाऱ्यात हे वायू उपयुक्त ठरले होते. याच काळात कीटकनाशक म्हणून डीडीटी पुढं आलं. डीडीटीचा फवारा पिकावर फवारण्यासाठी सीएफसींचा वापर प्लास्टिक फेसाळनिर्मितीत (फोम) आणि इलेक्ट्रॉनिक भाग साफ करण्यासाठी होतो हे लक्षात येताच त्याचं महत्त्व आणखीनचं वाढलं. ‘मानवी कल्याणार्थ रसायनशास्त्र’ (केमिस्ट्री फॉर बेटरमेंट ऑफ मॅनकार्इंड) ही घोषणा जागोजाग द्युपाँ आणि इतर रसायन निर्माते वापरू लागले. या संशोधनानं थॉमस एडिसन मिजली प्रचंड श्रीमंत बनला. तो आता ओहायोतल्या कोलंबस या त्याच्या गावी एका प्रचंड प्रासादात राहू लागला. त्याच्या या प्रासादाभोवतालच्या बागेस जगातली ‘सर्वांत सुंदर बाग’ असं वाखाणण्यात येऊ लागलं. त्यानं या प्रासादाच्या मागच्या टेकडीत एक बोगदा खणला. तिथून तो या टेकडीच्या मागच्या दरीत जात असे. या दरीत सर्वत्र मेणबत्त्यांच्या आकाराचे विजेचे दिवे लावलेले होते. बॅटमॅनच्या ‘अ‍ॅटकेव्ह’ची कल्पना मिजच्या या दरीवरूनच उचलण्यात आली असावी असं म्हणतात. मिज् आपल्या शास्त्रीय कल्पनांच्या प्रसारार्थ युरोप व अमेरिकेत दौरे काढत असे. मद्यपान करता करता तो पृथ्वीचं वातावरण कसं बदलता येईल यावर जे विचार आपल्या मित्रांना ऐकवत असे तेच विचार थोडे अधिक आकर्षक करून व्याख्यानातून तो विज्ञानाच्या साहाय्याने स्वर्गतुल्य पृथ्वीचं चित्र श्रोत्यांपुढे उभे करण्यासाठी वापरत असे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९४० मध्ये मिजला पोलिओ झाला. ४५ वर्षानंतर संशोधन सोडून शास्त्रज्ञांनी व्यवस्थापनात भाग घ्यावा. हे त्याचे विचार तो चाकाच्या खुर्चीतून लोकांना ऐकवू लागला. अंथरुणातून चाकाच्या खुर्चीत ठेवणारं आणि तिथून परत अंथरुणावर नेणारं एक यंत्र मिजनं तयार केलं. या यंत्राच्या साहाय्यानं नोव्हेंबर १९४४ मध्ये थॉमस एडिसन मिजलीने आत्महत्या केली. ‘तो मानवजातीच्या सुखासाठी झटला’ असे शब्द त्याच्या कबरीवर कोरण्यात आले. पण आज मृत्यूनंतर ५० वर्षांनी त्याच्या शोधांनी मानव जातीवर केवढं संकट आणलंय ते त्याच्या शोधांना बंदी घालण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार केले जात आहेत त्यावरून लक्षात येतं आणि थॉमस एडिसन मिजलीचं वर्णन जगाला थाप ठरलेला शास्त्रज्ञ, असं करावं लागतं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more