* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GIRL FROM FOREIGN
  • Availability : Available
  • Translators : SNEHLATA DATAR
  • ISBN : 9788184985573
  • Edition : 1
  • Publishing Year : 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FASCINATING AND INTIMATE , THE GIRL FROM FOREIGN IS ONE WOMAN`S SEARCH FOR ANCIENT FAMILY SECRETS THAT LEADS TO AN ADVENTURE IN FAR-OFF LANDS. SADIA SHEPARD, THE DAUGHTER OF A WHITE PROTESTANT FROM COLORADO AND A MUSLIM FROM PAKISTAN, WAS SHOCKED TO DISCOVER THAT HER GRANDMOTHER WAS A DESCENDANT OF THE BENE ISRAEL, A TINY JEWISH COMMUNITY SHIPWRECKED IN INDIA TWO THOUSAND YEARS AGO. AFTER TRAVELING TO INDIA TO PUT THE PIECES OF HER FAMILY`S PAST TOGETHER, HER QUEST FOR IDENTITY UNLOCKS A MYRIAD OF PROFOUND RELIGIOUS AND CULTURAL REVELATIONS THAT SHEPARD GRACEFULLY WEAVES INTO THIS TOUCHING, EYE-OPENING MEMOIR.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुळे कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत, हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या भाचीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते आणि ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्मच्या लोकांविषयी जे काही आजवर ऐकलेले होते,त्याही पेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतिचा मिलाप असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पुर्वाजाबद्दल माहिती मिळवू लागले. त्यातनं आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू) आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (ख्रिशन) अशा विचारचक्रात ती अडकते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SADIYA SHEPARD #SNEHLATADATAR # #SADIYA SHEPARD #VIDESHI KANYA
Customer Reviews
  • Rating StarPurva Sawant

    Ho, khup mast aahe. Je lok Raigad dist. madhye rahatat kinva tithe gav aahe, tyancha Jew lokanshi samndh aala aahe. Tyana khup aapulaki vatatel he pustak vachatana.

  • Rating StarLOKPRABHA NOV 2016- RASHMI GOLE

    ‘द गर्ल फ्रॉम फॉरिन’ या मूळ इंगजी पुस्तकाच्या लेखिका सादिया शेपर्ड. लेखिकेच्या आजीची (नानाची) इच्छा असते, की सादियाने त्यांच्या जन्मगावी जाऊन, तेथील घराला भेट देऊन त्यांच्या जमातीचा, पूर्वजांचा इतिहास समजून घ्यावा व त्या जीवनाचा परिचय करून घ्यावा तिची आवडती आजी नाना ही जन्माने ज्यू, तिचे नाव रेयल जेकब्स. इस्राइल सोडून निघालेल्या टोळ्यांपैकी एक जहाज दोन हजार वर्षांपूर्वी हिंदूस्थानच्या किना-यावर आदळून पुâटले होते. त्यातील वाचलेले लोक तेव्हापासून तिथेच स्थिरावले. जे नानाच्या पूर्वजांपैकी एक असतात. आजीची इच्छा पूर्ण करण्याचे सादिया तिला वचन देते. फुलब्राइट स्कॉलरशिपवर पुण्याच्या ‘नॅशनल फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये ज्युडाईझमचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेहून भारतात एकटी येते. या शोधकार्यासाठी निघालेली सादिया प्रथम वरळी सीपेस भागातील तिच्या आजीच्या ‘राहत व्हिला’ नावाच्या घराला भेट देते. लगेच दुस-या दिवशी आजीच्या ज्य जमातीचा म्हणजेच बेने इस्राइल लोकांचा शोध घेण्यासाठी पुण्यात येते. त्या वेळी संशोधनासाठी तिच्याकडे निव्वळ एका वयस्कर नातेवाइकाचे आजीच्या डायरीतून घाईघाईने खरडलेले फान नंबर्स आणि १९८० च्या सुमारास लिहिली गेलेली मानवजातीशास्त्रावरची पुस्तके एवढ्या दोनच गोष्टी हातात असतात. पुण्यात नानाच्या बहिणीचा नवरा अंकल मोझेस आणि हैदराबादला भाऊ राहत असतो. सादियाच्या कुटुंबाची धार्मिक पाश्र्वभूमी फार गुंतागुंतीची आहे. तिच्या आईची आई नाना ही जन्माने ज्यू, पण तिचे मुस्लिमाशी लग्न झालेले. तिने मुस्लीम धर्म स्वीकारलेला. सादियाची आई मुस्लीम, पण वडील खिश्चन. त्यामुळे आपण नक्की कोणता धर्म स्वीकारावा, याचा सादियाला कायम संभ्रम. सादिया भारतात येते त्यापूर्वी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर मुसलमान दहशतवाद्यांनी नुकताच हल्ला केलेला असतो. साहजिकच पुन्हा मुस्लीम धर्मीयांविरुद्ध समाजातील इतर धर्मीय लोकांमध्ये नाराजी व द्वेष निर्माण झालेला असतो. अशा पाश्र्वभूमीवर सादिया हे मुस्लीम नाव ऐकल्यावर पुण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ म्हणजेच ‘सिनगॉग’मध्ये सादियाचे म्हणावे तसे स्वागत होत नाही. पुण्यातील सिनगॉगला भेटण्यापेक्षा तिने मुंबईतील सिनगॉगमधील ज्यूंना भेटावे अशी सूचना अंकल मोझेस तिला देतात. मुंबईतील सर्व ज्यू इस्रइलला परत जात आहेत आणि तू हा खटाटोप कशासाठी करीत आहेस, असा नकारात्मक सूरही ते तिला ऐकवतात. तरीसुद्धा नानाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सादिया तिचे प्रयत्न नेटाने सुरू ठेवते. मुंबईतील सिनगॉगला भेट देऊन काही माहिती मिळते का ते पाहते. त्याबरोबर भोपुरली आणि चोपडे या आजी-आजोबांच्या गावात जाऊनही शोध घेते. अमेरिकन ज्युईश कमिटी या १९६० पासून मुंबईत समाजकल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेला भेट देते. तेथील एक समाजसेविका कोकण किना-यावरच्या खेड्यातून वसलेल्या तीनशे बेने इस्राइली कुटुंबीयांना नियमित जाऊन भेटत असते. तिच्याबरोबर सादियाही काही ज्यूंना भेटते. दरम्यान कराचीतील तिच्या भावंडांच्या लग्नाला ती जाते तेव्हा तिथे तिला नानाच्या पूर्वीयुष्याची बरीच माहिती मिळते. एके काळी ब्रिटिश अधिका-यांसाठी चांगल्या वस्तीचा भाग असलेले ‘बाथ आयलंड’ या धनवंत लोकांमध्ये गणल्या जाणा-या लोकवस्तीत सादियाच्या नानाचे ‘सिद्दिकी हाऊस’मधील घर असते. आजोबा मुस्लीम असल्यामुळे त्यांना नानाव्यतिरिक्त अजून दोन बायका. नाना सर्वांत जास्त हुशार असल्यामुळे आपल्या पश्चात आपले सर्व कुटुंब एकत्र ठेवण्याचे ते नानाकडून वचन घेतात. आजोबा गेल्यावर असे लक्षात येते, की पूर्ण घर कर्जबाजारी झाले आहे. कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी नाना तिच्या नावचा राहता व्हिला विकून टाकते . त्याच्या मोबदल्यात सिद्दिकी हाऊसमधील एक फ्लॅट तिच्या नावावर केला जातो. त्या जागेत भाडेकरू असतो. तो जागा सोडत नाही, त्यामुळे नानाला त्या जागेचा काहीच उपभोग घेता येत नाही. तिचेच सावत्र मुलगे तिच्या घरातील सर्व वस्तू चोरून नेतात. बँक अकाउंटमधील पैसे घेतात. सादियाला प्रत्यक्ष भेटीत हे सर्व समजल्यावर ती खूप बेचैन होते. दरम्यान, ‘अंकल मोझेस बरेच आजारी आहेत, तू त्यांना भेटून तिने संकलित केलेली माहिती व फोटो दाखवते. तेव्हा अंकल मोझेस तिला सांगतात की, तिचे पणजी-पणजोबा रेवदंड्याच्या सिनगॉगमध्ये जायचे. अर्थातच तिने जुळवलेले सारे तुकडे आणि हा संदर्भ यामुळे तिला पटते की नानाचे मूळ गाव म्हणजे रेवदंडा. अशा प्रकारे अठरा महिने पुणे-मुंबई-रेवदंडा आणि इतर अनेक ठिकाणे भटकंती करीत, नानाच अस्तित्वाच्या खुणा शोधताना सादियाला कोणकोणत्या प्रसंगांना भावनिक पातळीवर तोंड द्यावे लागते आणि तरीही अतिशय चिकाटीने ती शोधमोहीम कशी पार पाडते, याची रंजक कहाणी म्हणजेच ‘विदेशी कन्या’ जरूर वाचावी अशी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more