MANY A TIMES, MANY CHILDREN FIND SCIENCE A BIT TOUGH AND HENCE BORING. IF WE ARE ABLE TO EXPLAIN THEM SCIENCE IN SIMPLE AND LUCID LANGUAGE THEN THEY WILL SURELY ENJOY IT, ESPECIALLY ALONG WITH EASY TO DO EXPERIMENTS. IF THESE ARE SUPPORTED WITH ILLUSTRATIONS THEN THE LEARNING IS GOING TO BE ALL THE MORE EASIER AND SIMPLER.
THIS BOOK IS ONE SUCH WONDERFUL TOOL.
HOW TO CREATE A FOUNTAIN IN A BOTTLE, TRANSFORMATION, A BOTTLE GOING ROUND AND ROUND, A BALLOON THAT WON’T GET FILLED WITH AIR, MAGIC FLOWER, COLOURFUL FOUNTAIN, AN INVISIBLE COIN, A MOVING COIN, ETC. ARE THE SIMPLEST EXPERIMENTS ENJOYED BY CHILDREN. A FEW EXPERIMENTS ARE RELATED TO ELECTRONICS. THEY INCLUDE WORKING OF SAFETY FUSE, INDICATOR OF ELECTRICITY, BUTTON, BUZZER, BATTERY, ETC. THIS BOOK WILL SHOW HOW TO MAKE A COMPASS.
CHILDREN WILL SURELY ENJOY EACH AND EVERY EXPERIMENT SHOWN HERE.
PARENTS CAN TAKE INITIATIVE AND ACCOMPANY CHILDREN TO THE WONDER WORLD OF SCIENCE. MOST OF THE EXPERIMENTS ARE BASED ON THE THINGS AVAILABLE INHOUSE. THEY WILL SURELY OPEN STORES OF HAPPINESS AND SATISFACTION FOR BOTH; PARENTS AND CHILDREN AS WELL.
काही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील गमती.’
बाटलीतील कारंजे कसे तयार करायचे हे तर त्यांनी सांगितले आहेच. शिवाय परावर्तनाची गंमतही एका प्रयोगाद्वारे सांगितली आहे. गरगर फिरणारी बाटली, न फुगणारा फुगा, जादूचे फूल, रंगीत कारंजे, अदृश्य होणारे नाणे, सरकणारे नाणे हे प्रयोग तर मुलांना आवडतील असेच आहेत. सेफ्टी फ्यूजचे कार्य, विद्युत प्रवाह दर्शक, बटण, बझर आणि बॅटरी असे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित प्रयोगही सांगितले आहेत. घरगुती होकायंत्र कसे तयार करावे याचीही माहिती मुलांना या पुस्तकातून मिळेल. एकूणच या पुस्तकातील सगळे प्रयोग मुलांना आवडतील असेच आहेत.
पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.