SOME CHILDREN FIND SCIENCE A VERY BORING SUBJECT. THEY CAN BE INTRODUCED TO THE WORLD OF SCIENCE IN A BETTER WAY. THEY ARE SURE GOING TO LOVE THE SIMPLE YET INTERESTING EXPERIMENTS OF SCIENCE. THEY WILL BE EQUALLY FASCINATED BY THE WORLD OF SCIENCE. THE BOOK ‘VIDNYANATIL RANJAKTA-INTERESTING SCIENCE’ WITH ITS MANY COLOURFUL ILLUSTRATIONS IS ALL SET TO ENTERTAIN AND IMPART KNOWLEDGE.
THIS BOOK WILL TALK IN DETAIL ABOUT MANY INTERESTING PRACTICALS OR EXPERIMENTS WHICH CAN BE EASILY BROUGHT INTO REALITY BY THE CHILDREN. THEY WOULD NOT NEED ANY EXPENSIVE SET OF EQUIPMENT OR INGREDIENTS TO PERFORM THESE EXPERIMENTS. THESE WOULD INCLUDE A MOVING RABBIT, MAGICAL DISC, MOVING CLOWN, HIDING MOUSE, FLYING LID, CONTINUOUSLY MOVING MAGNET, ETC. CHILDREN CAN EASILY ASSEMBLE EQUIPMENT TO PERFORM EXPERIMENTS LIKE SOAP AND ITS WORK, MAGNETIC NEEDLE, ELECTRIC GENERATOR, HUMIDITY MEASURING EQUIPMENT-HYGROMETER. THERE IS A LOT OF DIVERSITY IN ALL THESE EXPERIMENTS.
TOGETHER PARENTS AND CHILDREN CAN WORK WONDERS WITH THIS BOOK. THE SIMPLE LANGUAGE, QUICK RESULTS AND ABUNDANT HAPPINESS WILL MAKE BOTH PARENTS AND CHILDREN SATISFIED.
काही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील रंजकता.’
विज्ञानातील रंजक प्रयोगांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. डोलणारा ससा, जादूची चकती, डोलणारा विदूषक, लपणारा उंदीर, उडणारे बूच, अखंड फिरणारे चुंबक असे मुलांना आवडणारे प्रयोग या पुस्तकात अंतर्भूत केले आहेत. खरं साबणाचे कार्यसारखा प्रयोग असो किंवा चुंबकसुईचा, विद्युत जनरेटरचा प्रयोग असो किंवा आद्र्रतामापक यंत्राचा, हे सगळे प्रयोग मुलांना आवडणारे आणि सहज करण्यासारखे आहेत. या प्रयोगांमध्ये वैविध्य आहे.
पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.