* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE REBEL
  • Availability : Available
  • Translators : MADHURI KABRE
  • ISBN : 9788177662214
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO IS THE UNCROWNED KING OF THE WORLD. HE RULES OVER THE COMMON MAN AS WELL AS THE PROFOUND THINKERS. `VIDROHI` IS A COLLECTION OF HIS SERMONS IN THE FORM OF QUESTIONS AND ANSWERS. OSHO THINKS THAT REBELLION IS THE PERFECT INDICATION OF ANY RELIGIOUS MIND. THE PUREST FORM OF SPIRITUALITY IS REBELLION ACCORDING TO HIM. OSHO IS NOT IN RELEVANCE WITH ANY OF THE PAST RELIGIOUS TRADITIONS OR PHILOSOPHICAL THOUGHTS AND PROCESSES. HE HAS HIS OWN SCHOOL OF THOUGHTS, IT IS SO MATURED THAT IT IS COMPLETE IN ITSELF, ABLE TO START A NEW ERA. THE SOCIETY THAT HE HAS IN HIS MIND IS THE ONE WHERE EVERYBODY WILL DENY PERSONAL ASSETS AND MARRIAGE SYSTEM. WHILE DEPICTING THIS NEW ERA HE VERY HARSHLY REMINDS US OF OUR OUTDATED AND CONSERVATIVE CULTURE, WHICH IS WORTH ABANDONING. FOR HIM, MEDITATION IS THE ONLY WAY TO REACH THE DESIRED PLACE. HE GIVES IT TOPMOST PRIORITY. OSHO REVEALS THE SECRETS OF THIS PATH IN HIS SIMPLE, SWEET LANGUAGE. HE PROPAGATES HUMOUR THROUGHOUT, HE IS NAUGHTY AT TIMES, ALL THESE MAKE HIS SERMONS LIKE AN EASY DIALOGUE BETWEEN HIM AND US. WE ARE IMPRESSED BY HIS PRODIGIOUS KNOWLEDGE, HIS VISION, HIS VAST STUDIES, AND HIS BOUNDLESS KNOWLEDGE. THOUGH OUR MIND IS TOTALLY ABSORBED IN HIS WORDS, IT AUTOMATICALLY COPIES THE MESSAGE FROM HIS SERMONS.
जगभरातील सर्वसामान्य माणसांपासून विचारवंतांपर्यंत अगणित माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणाया ओशोंची प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील प्रवचनं ‘विद्रोही’ या पुस्तकात संकलित केलेली आहेत. ओशोंच्या दृष्टीनं विद्रोह हेच धार्मिक व्यक्तीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. अध्यात्माचं शुद्ध रूप म्हणजेच विद्रोह, असं त्यांचं प्रतिपादन आहे. ओशो भूतकाळातील कोणत्याही धार्मिक परंपरेशी वा तात्त्विक विचारप्रणालीही संबद्ध नाहीत. त्यांच्या आगमनाने नव्या युगाची सुरुवात व्हावी, इतकी त्यांची विचारधारा स्वतंत्र आहे. त्यांच्या दृष्टीसमोरचा समाज हा कोणत्याही खासगी मालमत्तेला व लग्नसंस्थेला नाकारणारा समाज आहे. या समाजाचं चित्र रेखाटताना ते कठोरपणे आपल्याला आपल्या जुनाट, त्याज्य संस्कारांची जाणीव करून देतात. अपेक्षित स्थितीपर्यंत पोचण्यासाठी ध्यानाला ते एकमेव अग्रक्रम देतात. हा सारा आशय ओशो अतिशय सोप्या, प्रवाही भाषेत, मार्मिक उदाहरणं देत, कधी मिश्किलपणे, विनोदाची पखरण करत करत असा पटवून देतात, की ती प्रवचनं सहज संवाद बनतात. त्यांच्या द्रष्टेपणाची, प्रगाढअभ्यासाची, अफाट बुद्धिमत्तेची झेप जाणवून मती गुंग होत असतानाच त्यातील आशय वाचकांच्या मनावर आपसुख कोरला जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विद्रोहातूनच नवी मानवता व नवे युग यांचा उदय होईल... ओशो रजनीश यांची अनेक पुस्तके मराठीत मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. ‘विद्रोही’ हे त्यांचे नवे पुस्तक ‘दि रिबेल’ या पुस्तकाचे भाषांतर आहे. पहिल्या तेरा प्रकरणांचा समोवश यत केलेला आहे. माधुरी काबरे यांनी हे भाषांतर केले आहे. ओशो हे कुठल्या धर्माचे होते? धर्माबद्दलची त्यांची संकल्पना काय होती? त्यांना भविष्यकाळात माणसाची प्रगती कुठल्या दिशेने होणे अपेक्षित होते? असे काही प्रश्न मनात आले तर आश्चर्य नाही. कारण ओशोंनी जैन, बौद्ध, खिस्ती, इस्लाम, चिनी, झेन, सुफी आणि इतरही अनेक धर्मांवर लिहिले आहे. धर्मसंस्थापक आणि साधुसंत व तत्त्वज्ञ यांच्यावर लिहिले आहे. ते स्वत: जन्माने जैनधर्मीय होते. आणि त्यांच्या विचारांवर जैनधर्माचा बराच प्रभाव आहे. तरीही कुठल्याही धर्माचे कर्मकांड त्यांना मान्य नव्हते आणि त्या त्या धर्माची रूढ चौकटही त्यांना पसंत पडत नव्हती. त्यांची प्रज्ञा स्वतंत्र होती; तिला जे उमगत होते ते वेगळेच काही होते, आणि त्यामुळे रूढ संकल्पनांचेही नवेनवे अर्थ त्यांच्या प्रज्ञाचक्षूंसमोर सतत झेपावत होते. माझा कुठल्याच धर्मावर विश्वास नाही; जगात तीनशेवर धर्म अस्तित्वात असले तरी अजूनपर्यंत खरा धर्म अस्तित्वात आलेला नाही; भय आणि हाव यांचा विचार करून विविध धर्मांनी दिलेल्या आज्ञा ह्या एकापेक्षा एक विचित्र आणि अस्वाभाविक आहेत, असे ते सांगतात. मात्र धर्म नाकारला तरी धार्मिकता हवीच असे ते म्हणतात. सृष्टीपाशी कृतज्ञतेनं वागणं म्हणजे धर्म. कृतज्ञतेची भावना म्हणजे धर्म. सत्याचा साक्षात्कार व्हायचा असेल, जीवनात परिपूर्ण शांततेचा प्रत्यय यावा असे वाटत असेल ध्यानाची साधना आवश्यक आहे. परमात्मा म्हणजे माणसाची चेतना आणि आत्म्याचा अणू यांचा स्फोट होऊन निर्माण होणारी ऊर्जा... ही ऊर्जा. स्वत:च्याच विकासातून जन्म घेते. या शक्तीचा अनुभव म्हणजे परमात्मा... आणि त्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ध्यानधर्म, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. माणसाला आपल्यातील चैतन्याचा साक्षात्कार होण्याची उत्कट अभिलाषा असेल तर त्याला ध्यान हाच एकमेव मार्ग उपयुक्त आहे. ध्यान ही आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्ट नाही; ध्यानासाठी कुठेही निर्जन स्थानी जाण्याची गरज नाही; ध्यान ही मनाला हलकंफुलकं करणारी, निर्मळ-निर्विकार करणारी, केवल आनंद देणारी गोष्ट आहे, असे ओशो मानतात. माणूस हा जन्माने अपूर्ण आहे; पूर्णत्वासाठी त्याला काही कृती करावी लागते. पूर्णत्व न मिळण्याची अवस्था म्हणजे आजारपण. शारीरिक-मानसिक व्याधीतून मुक्ती हवी असेल तर ध्यान हवेच. ध्यान म्हणजे स्वत:मध्ये जागरूकता निर्माण करणे. ही जागरूकता निर्माण झाली की मरणाचे भय सरते. ध्यान म्हणजे जागे राहणे. ध्यान ही पद्धती आहे. समाधी ही उपलब्धता आहे. ध्यान म्हणजे जागरण बघणे. साक्षीत्व. ध्यान म्हणजे जप करणे नव्हे. जप करणे ही क्रिया आहे. ध्यान ही अक्रिया आहे. विद्रोही या पुस्तकातील तेरा प्रवचन-प्रश्नोत्तर सत्रांमधून ओशोंच्या धर्मविषयक संकल्पनेचा दुसरा एक पैलू अधोरेखित होतो. विद्रोह हे त्यांना अध्यात्माचं शुद्ध रूप वाटतं. विद्रोह हेच त्यांना धार्मिक व्यक्तीचं व्यवच्छेदक लक्षण वाटतं. आपण लोकांना क्रांतीचे धडे देत नाही, आपण विद्रोह शिकवतो असे ओशोंनी म्हटले आहे. ‘‘क्रांतिकारक हे अतिसामान्य मर्त्य पातळीवरचे असतात. विद्रोही व त्याचा विद्रोह मात्र दिव्य पातळीवरचा असतो. पवित्र असतो.’’ असे ते मानतात.(पृष्ठ३) माणसाची चेतना ही गेली अनेक शतके विशिष्ट चाकोरीतच फिरत आली आहे. तिच्यात बदल झालेला नाही. त्यामुळे तिची वाढही खुंटली आहे. या मानवी चेतनेत परिवर्तन घडवून आणणे हे आवश्यक आहे. त्यासाठी ध्यानात्मक ऊर्जा हवी. सडलेले आदर्श, बिनडोक भेदभाव, मूढ अंधश्रद्धा यांचा लोप झाला पाहिजे आणि नवा माणूस जन्माला आला पाहिजे. हा नवा माणूस भूतकाळाची झापडं झुगारून दिलेला, नव्या नजरेनं बघणारा हवा. ओशोंच्या भाषेत भूतकाळाशी असलेले सर्व जुनाट संबंध तोडणारा तो विद्रोही. गौतमबुद्ध, कबीर हे त्यांच्या दृष्टीने विद्रोही होते. असे विद्रोही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले नाहीत तर पृथ्वीवरचे माणसाचे अस्तित्वच धोक्यात येईल असा इशारा ओशो देतात.(४) सुधारणा, क्रांती आणि विद्रोह या तीन शब्दांचा आशय ते स्पष्ट करतात. सुधारणा म्हणजे फेरफार. नूतनीकरण. मूळ गाभ्याला धक्का न लावता केलेला बदल. क्रांती जुनं ते शिल्लक ठेवते पण त्यात खूप बदल करते. जुन्याचा भक्कम पाया तसाच राहतो पण वर मजले चढतात. विद्रोह म्हणजे स्वत:ला जुन्यापासून पूर्णपणे तोडण्याची कृती. जुने धर्म, जुने राजकीय सिद्धान्त, जुना माणूस- या सर्वांना स्वत:मधून पूर्णपणे छाटून टाकून, त्या धावातून नवं ताजं आयुष्य सुरू करणं. जुन्याचा मृत्यू आणि नव्याचा जन्म. पुनरुत्थान. पुनरुज्जीवन. पुनर्जन्म. क्रांतिकारक जुन्याला बदलण्याची धडपड करतो. विद्रोही सरळसरळ जुन्यातून बाहेर येतो. (५) क्रांत्या खूप होतात. पण त्या बहुतेक फसतात. क्रांतिकारकांच्या हातूनच त्या फसतात. सत्ता हाती आली की क्रांतीच्या मूळ उद्दिष्टांचाचा विसर पडतो. (६) त्यामुळे भविष्यात क्रांत्यांची गरजच नाही. गरज आहे ती विद्रोहाची आणि विद्रोही व्यक्तींची. नव्या दृष्टीच्या नव्या माणसांची.(८) मला आज्ञाधारक अनुयायी नको आहेत; मला जिज्ञासू, विद्रोही साधक हवे आहेत. मला होयबा नको आहेत. शंका घेतल्याशिवय अस्सल विश्वास ठेवता येत नाहीत असे विद्रोही हवे आहेत अशी अपेक्षा ओशो पुन:पुन्हा प्रकट करतात.(४२) विद्रोही माणसाची काही वैशिष्ट्ये ओशो समजावून सांगतात. १. विद्रोही आपल्या स्वत:च्या अनुभवाखेरीज दुसऱ्या कशावरही विश्वास ठेवत नाही. त्याचं सत्य हे त्याचं एकमेव सत्य असतं. २. ठराविक गोष्टींवर श्रद्धा ठेवणाऱ्या कोणत्याही पारंपरिक धर्माला विद्रोही मानत नाही. जुमानत नाही. तो स्वत: शोध घेत जाणारा साधक असतो. तो धर्म मानत नाही याचा अर्थ तो अहंकारी असतो असा नाही. तो स्वत:लाच परिपूर्ण, सर्व काही मानत असतो. ३. तो अहंकारी नसतो. निरागस असतो. त्याचं विश्वास ठेवणं हे उर्मटपणातून नव्हे तर विनम्रतेतून आलेलं असतं. ४. विद्रोही कुठल्याही चर्चचा वा संस्थेचा नसतो. कुणाचीही नक्कल करणारा नसतो. पूर्वग्रहांशिवाय तो आपला शोध नम्रपणे चालू ठेवत असतो. ५. विद्रोही माणूस स्वत:च्या स्वातंत्र्याचा सन्मान करतो तसाच दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचीही बूज राखतो. ६. विद्रोही माणूस भूतकाळात जगत नाही; भविष्यकाळातही जगत नाही. तो वर्तमानात जगतो. शक्य तितक्या जागरूकपणाने आणि सावधपणाने. त्या त्या क्षणात तो जगत असतो. ७. इतरांवर वर्चस्व गाजवण्यात विद्रोही माणसाला काडीमात्र रस नसतो. त्याला सत्तेची लालसा नसते. ८. विद्रोही माणूस आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यात जगतो. त्यात कुणालाही ढवळाढवळ करू देत नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात तो ढवळाढवळ करीत नाही. ९. विद्रोही माणूस हा आपल्या आत्म्याचा शास्त्रज्ञ असतो. आपल्या आंतरिक यात्रेसाठी तो विज्ञाननिष्ठ मनाने शंका-नकार-चौकसपणा यांचा वापर करून आपली शोधयात्रा अधिकधिक निर्दोष व्हावी म्हणून प्रयत्नशील असतो. १०. विद्रोही हा मूलत: अज्ञेयवादी असतो. आपल्याला काहीही माहीत नाही इथपासून तो आरंभ करतो. बालसदृश निरागसपणा हेही विद्रोही माणसाचे एक लक्षण असते. ११. विद्रोही माणूस खऱ्या अर्थाने क्रांतिकारक असतो तसाच धार्मिकही असतो. तो कोणतीही संघटना निर्माण करीत नाही. परंतु तो सहप्रवासी म्हणून एकमेकांच्या स्वत्वाला धक्का न लावता इतरांबरोबर राहू शकतो. (४९-५५) १२. विद्रोही माणूस जगाचा वा समाजाचा त्याग कधीही करीत नाही. मात्र समाजाने लादलेल्या तथाकथित नैतिकतेचा, मूल्यांचा, बंधनांचा त्याग तो नक्कीच करतो. गर्दीत राहूनही गर्दीच्या आदेशानुसार तो वागत नाही; स्वत:च्या विवेकबुद्धीनेच वागतो.(६६) १३. विद्रोही माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थिती रोमहर्षक असते. हरक्षणी तो समस्येशी सामना करीत असतो. १४. विद्रोही माणसाचा परित्याग हा गौतम बुद्धाच्या त्यागापेक्षाही मोलाचा असतो. समाजात राहून तो समाजाशी झगडत राहतो. १५. विद्रोही माणूस समाजाचे तथाकथित आदर्श, नैतिक संकेत, धर्म तत्त्वज्ञान, रीतिरिवाज, अंधश्रद्धा या संगळ्यांचा त्याग करतो. पण समाजाचा त्याग करीत नाही. जगावर तो प्रेम करतो. हे जग हा आपल्या जीवनाचा मूलस्रोत आहे. त्याला नाकारणं म्हणजे जीवनविन्मुख होणं. सर्व धर्म हे जीवनविरोधी व नकारात्मक आहेत. (७०) १६. विद्रोही माणूस जगाचा निषेध करीत नाही. आदर करतो. कोणत्याही स्वरूपातील जीवन तो सन्माननीय मानतो. १७. विद्रोही असणं म्हणजे एका पूर्णपणे नव्या आयुष्याची सुरुवात करणं. एका नवीन मानवतेची, एका नवीन माणसाची सुरुवात करणे. (७१) विद्रोहातच आपल्यातील सुप्त सामर्थ्याचा पूर्ण विकास संभवतो. १८. तुम्ही विद्रोही असला तरच तुमच्या अवतीभवती विद्रोह पसरवू शकाल. तुम्ही पेटलेले असाल तरच तुम्ही वणवा पेटवू शकाल. स्वत:ला अनुभव आल्याखेरीज दुसऱ्याला मदत करायला जाऊ नका. जगात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर प्रथम स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणा. (७४) १९. विद्रोही म्हणजे सगळ्या परिवर्तनाचे बीज. विद्रोही म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. निखळ प्रेम. पूर्ण सर्जनशीलता. २०. नवा विद्रोही हा आत्मबोध झालेला माणूस असतो. गाढ समाधानी आणि तृप्त असतो. अलिप्त आणि एकटा असतो. झुंडीच्या शृंखलेपासून मुक्त असतो. नवा विद्रोही हा योद्धा असतो. अमानुष, अयोग्य, अनुचित, अशास्त्रीय असं जे जे आहे त्यांच्याशी लढणारा तो योद्धा असतो. २१. नवा विद्रोही माणूस माणसाच्या प्रतिष्ठेची आणि देवाच्या मृत्यूची घोषणा करतो. जुने साधुसंत कल्पित ईश्वराला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवून, माणसाला तुच्छ मानणारे होते. माणूस असणं म्हणजे पापी, पातकी असणं असं मानून मानवाची प्रतिष्ठा ते मातीमोल ठरवत होते. नवा विद्रोही असा कोणताही देव गृहीत न धरता, हाडामांसाचा जिवंत माणूस आपल्या चैतन्याच्या जागृतीद्वारे परिपूर्ण व्हावा असे मानतो.(९०) २२. नवा विद्रोही कोणत्याही प्रकारची अपराधी भावना बाळगत नाही जे जे नैसर्गिक ते ते योग्य असे तो मानतो. २३. नवा विद्रोही माणूस निरोगीपणाचा, संपूर्णत्वाचा पुरस्कार करून, नव्या मानवतेचा जन्म व्हावा असा आग्रह धरणारा असेल.(९३) विद्रोही माणसाचा परिपूर्ण नमुना म्हणून बुद्ध झोर्बा यांच्याकडे ओशो बोट दाखवतात. इहवाद आणि अध्यात्मवाद यातील विरोध नष्ट करणं हा त्याचा विद्रोह होय. देह व आत्मा एकत्रित आहेत. संपूर्ण अस्तित्व चैतन्यमय आहे, संपूर्ण अस्तित्व हे उर्जेचंच क्षेत्र आहे असे बुद्ध झोर्बाला जाणवते. ‘‘हा माझा अनुभव आहे. हे काही माझं तत्वज्ञान नाही.’’ असे ओशो नि:संदिग्धपणे बजावून सांगतात. (१०१). बुद्ध असणारा झोर्बा ही सर्वात समृद्ध शक्यता आहे. झोर्बा हा अपूर्ण असतो. बुद्ध बनलेला झोर्बा हा मात्र पूर्ण असतो. (१०२) झोर्बा व बुद्ध हे नव्या युगातल्या नव्या माणसाचं नाव आहे. ओशो येथे बुद्ध हा शब्द गौतम या आत्मज्ञानी माणसाचं विशेषण म्हणून वापरत नाहीत, तर जागरुक माणूस म्हणून वापरतात. जीवनाच्या प्रत्येक समस्येचा विचार करताना हा नवा विद्रोही माणूस तिच्या मूळापर्यंत जाईल. लक्षण दडपण्याचा प्रयत्न करणार नाही; असे सांगून न्यायव्यवस्थेकडे तो वेगळ्या दृष्टीने कसा पाहील याचे मूलगामी विश्लेषण ओशोंनी केले आहे. (११० ते ११७) बुद्धावस्थेला न पोचलेला विद्रोही हा नुसताच आंधळा नसतो तर तो पिऊन तर्र झालेला असतो. त्याचा विद्रोहीपणा हा प्रतिक्रियात्मक असतो. अस्सल नसतो असेही ओशो स्पष्ट करतात. (१४६) बुद्धत्व व विद्रोही या दोन्ही घटना एकाच वेळी घडणाऱ्या आहेत असे ओशो मानतात. त्यांच्या मते गौतम बुद्ध हा पूर्णतया बुद्ध पुरुष होता; पण तो विद्रोही नसलेला बुद्ध होता. (१४७) बाकुनिन, बुखारिन, कॅमस हे लोक विद्रोही तत्त्वचिंतक होते पण बुद्धत्वाचा अनुभव नसलेले होते. त्यांची पुस्तकं समाजानं करमणूक म्हणून वाचली, असा शेराही ओशो नोंदवतात. शेवटी ओशो एक विलक्षण विधान करतात. ‘‘जो विद्रोही नाही तो माझ्याजवळ येणारच नाही. तो माझ्याजवळ आला ही वस्तुस्थितीच त्याच्या विद्रोही असण्याचा पुरावा आहे... विद्रोही हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही.’’ (१५७-१५८) पुढे जाऊन ओशो म्हणतात,‘‘प्रत्येक व्यक्ती ही विद्रोही म्हणूनच जन्मते. स्वतंत्र म्हणून जगण्याचा अधिकार घेऊनच ती जन्मते. मुखवटा घेऊन वावरण्यासाठी ती जन्मत नाही. पण समाज या व्यक्तीला मुखवटा चढवून जगायला भाग पाडते. (१६०) विद्रोही हा शब्द ओशोंना नकारात्मक वाटत नाही. सकारात्मक अर्थानेच ते त्याचा वापर करतात. (१६१) विद्रोहातून एक नवी मानवता जन्माला येईल. प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी बाधलेली, धर्म-राष्ट्रे-पंथभेद नसलेली पण धार्मिकता असलेली. जीवनाबद्दल नितान्त आदर असलेली... अस्तित्वाबद्दल खोल कृतज्ञता असलेली...’’ अशी विद्रोही माणसे घडवण्यासाठी आपण प्रशिक्षण देतो, आणि त्यातून योद्धे घडवतो- अशी कबुलीही ओशो देतात. जुन्या धर्मांचा बुरखा निर्दयपणे फाडून, नव्या विद्रोहासाठी जागा करावी अशी त्यांची अपेक्षा-अभिलाषा आहे. आपल्या संपूर्ण विचारधारणेलाच आमूलाग्र बदलून टाकणारी मते ओशो अत्यंत प्रभावीपणे मांडतात. विद्रोहाद्वारेच आत्मविकासाचा मार्ग सापडू शकेल हा विचार अनेक रंजक किस्से व कहाण्या सांगून ते मनावर ठसवतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more