TALKING ABOUT THE RELATIONSHIP BEYOND ANGER AND GREED, ``I HAVE A HEAD, I WANT A WIFE WHO PICKS MY BRAIN``, I BURST OUT LAUGHING AS I REMEMBERED THE PAST INCIDENT OF ``IDLE YOUTH GOT A JOB`` AND ALSO ``WENT TO MEET A GIRL, LOST THE SCENT OF PERFUME``. THEN THERE WAS A VOICE OF `WHERE IS THIS` AND ‘WHERE IS THAT’ AND WHEN I WENT TO THE GROCERY STORE, I SAID TO MYSELF, ``GROCERY LIST, DO IT FIRST ``. WITH THE HELP OF INTELLECTUAL HUMOR TO OVERCOME THE CONFUSION CREATED BY SNEEZING, AUTHOR SAYS `EK CHUTKI TAPKEER KI KIMAT TUM KYA JAANO?` THAT RESULTS IN RELAXING THE MIND, BRINGING A SMILE ON YOUR FACE. THIS BOOK MAKES GOOD READ FOR THE ENTIRE FAMILY. AUTHOR S. L. KHUTWAD ENTERTAINS AND MAKES US LAUGH THROUGH HIS NEW BOOK-`VINODACHE GURHAL`.
`डोकं आहे, ते खाणारी बायको हवी’ या राग-लोभापलीकडील नात्यावर बोलताना भूतकाळातील `बेकार तरुणाईच्या हाताला मिळाले काम’ हा प्रसंग आणि त्याचबरोबर `मुलगी बघायला गेला, अत्तराचा सुगंध हरवला’ ही फजिती आठवून हसू फुटताच, `हे` कुठंय अन् `ते` कुठंय’चा आवाज आला आणि किराणा दुकानात जाऊन आल्यावर `किराणा सामानाची यादी, नको लागू याच्या नादी’ असं स्वत:ला ठणकावून सांगतानाच परत अवेळी आलेल्या शिंकेने घातलेल्या गोंधळाला सावरण्यासाठी बौद्धिक विनोदाची मदत घेत ‘एक चुटकी तपकीर की किमत तुम क्या जानो?’ असं म्हणता-म्हणता मनावरील ताणतणाव कमी व्हावा, चेहर्यावर हसू फुलावं, त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब वाचू शकेल, अशा हल्क्याफुलक्या शैलीतील हे पुस्तक यातील निर्भेळ विनोदाचा वाचकांना आनंद देईल, याची खात्री आहे आणि म्हणूनच `विनोदाचं गुर्हाळ’ या पुस्तकातून लेखक सु.ल.खुटवड नव्याने भेटतात व खळखळून हसवतात..