* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669879
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY FIELD OF LIFE IS AFFECTED BY POLITICS. EVEN FIELD LIKE EDUCATION IS NOT EXCEPTION FOR THAT. THIS VIRUS OF CORRUPTION & POLITICS NOT ONLY EXPLOITS THE TRUE PEOPLE IN THE FIELD, BUT CORRUPTS THE WHOLE SYSTEM. RAVINDRA THAKUR’S NOVEL ‘VIRUS’ PUTS LIGHT ON SUCH MALPRACTICES IN THE FIELD OF EDUCATION. ‘VIRUS’ EFFECTIVELY PORTRAY CHANGING SCENARIO OF THE EDUCATION SYSTEM.
त्याचं काय आहे प्रोफ्रेसर कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय,पण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो. तसा हा एक व्हायरस! कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो विंÂवा काही वेळा कॉम्प्युटरच्या सिस्टिममध्येच दडलेला असतो आणि संधी मिळताच अक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवर उपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच, की हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. विंÂबहुना त्यावरच ही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली कशी निपजणार?...तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा... तुमच्या नकळत तो त्यात शिरतोच आणि सगळी सिस्टीम क्रॅश करून टाकतो.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIRUS #VIRUS #व्हायरस #FICTION #MARATHI #RAVINDRATHAKUR #रवींद्रठाकूर "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘व्हायरस’ : विद्यापीठीय राजकारणाचे व्यामिश्र बंध उलगडणारी कादंबरी… समाजीकरणाच्या प्रक्रियेसाठी निर्माण करण्यात आलेली शिक्षण ही एक महत्त्वाची सामाजिक व्यवस्था आहे. समाजाची निर्मिती, अस्तित्व आणि विकास समाजाअंतर्गत कार्यशील असलेल्या विविध घटकांमधील पस्पर समन्वयावर अवलंबून असतो. सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी समाजातील सदस्यांचे परस्परसहकार्य आणि आरोग्यदायी वर्तन महत्त्वाचे ठरते. यासाठी चांगल्या मूल्यांची रुजवात होणे महत्त्वाचे असते. प्रत्येक व्यक्तिच्या जन्मापासून अंतापर्यंत चालणारी समाजकीरणाची प्रक्रिया यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. शिक्षणव्यवस्था ही या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर झालेला आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले आहे. त्यामुळेच शिक्षणक्षेत्र हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. या क्षेत्राशी प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येणे अपरिहार्य ठरले आहे. शिक्षणक्षेत्राकडून समाजातील सर्वच घटकांची मोठी अपेक्षा असते. त्यामुळेच राष्ट्र उभारणीच्या कार्यातील शिक्षण ही सर्वांत महत्त्वाची पायरी मानली जाते. परंतु या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला याची जाणीव असते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या क्षेत्रामध्ये घुसलेल्या अनेक अप्रगल्भ, उथळ, अकार्यक्षम, दृष्टिकोन व्यापक नसलेल्या, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीच्चया अक्कडबाज लोकांमुळे हे क्षेत्र प्रदूषित झाले आहे. या लोकांच्या संकुचित मनोवृत्तीमुळे हे क्षेत्र हीन राजकारणाचे माहेरघर बनले आहे. एकूणच या व्यवस्थेतील फोलपणा आणि दांभिक वृत्तीवर कधी थेट तर कधी उपरोधिक भाष्य करणारी रवींद्र ठाकूर यांची ‘व्हायरस’ ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झालेली आहे. स्वत:ला कामामध्ये मनस्वीपणे गुंतवून ठेवणारे कार्यमग्न आणि महत्परिश्रमी डॉ. शेळके त्यांच्या विषयाचे विभाग प्रमुख तसेच कुलगुरू डॉ. जुनागडे यांच्या हितसंबंधी राजकारणाचे बळी ठरतात. डॉ. खराडे यांच्यापेक्षा सेवा, संशोधन आणि इतर अनुषंगिक बाबींमध्ये पात्र असूनही विभागातील प्राध्यापक पदासाठी डॉ. शेळक्यांना अर्ज करता येऊन नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते. अडवणुकीचा एक भाग म्हणून तयांचा अर्ज थ्रू प्रॉपर चॅनल जाऊ नये याची डॉ. खराडेंकडून दक्षता घेतली जाते. अशी परिस्थिती निर्माण केली जाते. या प्रकाराने अस्वस्थ झालेले डॉ. शेळके विद्यापीठातील अडवणूक, वशिलेबाजी, हितसंबंधी, आणि जातीय राजकारणाचे स्वत:ला येणारे अनुभव विनेदनातून कथन करीत कादंबरीभर अस्वस्थच राहतात. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीमध्ये दिसणारी अस्वस्थता डॉ. शेळकेंच्या रूपातून कादंबरीमध्ये व्यक्त होते. स्वत:ला हवी मी माणसं हवीत तेथे बसवून मनमानी कारभार करणारे कुलगुरू आणि त्यांच्यासारख्या इतर प्राध्यापकांची स्वाभिमानी वृत्तीच त्यांच्या प्रगतीआड येताना दिसते आणि त्यांच्या उपेक्षेला कारणीभूत ठरते. जात-पात, गटबाजी यामध्ये स्वत:च सहभागी होणारे कुलगुरू डॉ. खराडे, डॉ. वांगीकर, डॉ. प्रिया सोमण, डॉ. पावसकर यांच्यासारख्या प्राध्यापकांचा कौशल्यपूर्वक वापर स्वत:चे हेतू साध्य करण्यासाइी करतात. हे प्राध्यापकदेखील स्वत:च्या छोट्या-मोठ्या स्वार्थापोटी जुनागडेंचे होयबा होतात. केवळ विद्यापीठातच नव्हे, तर विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये या राजकारणाचे पडसाद उमटतात. एकीकडे शिक्षकांच्या संघटनेला हाताशी धरणे आणि दुसरीकडे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संघअनेविरोधात काम करणे, त्यांची आंदोलने मोडून काढणे असे दुटप्पी काम जुनागडेंपासून सुरू असते. विद्यापीठातील हितसंबंधांच्या राजकारणामुळे शिक्षक निवड समित्यांमधून गैरव्यवहार होतात. प्रशांत काळोखे सारख्या हुशार उमेदवारावर होणारा अनन्वित अन्याय हे या राजकारणाचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. जातीने एन. टी. प्रवर्गातील असूनही काळोखेची खुल्या जागेवर निवड होते. या निवडीवेळी येणारे अडथळे, होणारे राजकारण हे या व्यवस्थेतील लोकांची कोती मनोवृत्ती आणि जातीय राजकारण ध्वनीत करते. पीएच. डी. सारख्या महत्त्वाच्या पदवीसाठी चालणाऱ्या संशोधनामध्ये होणारे गैरप्रकार मीनाक्षी महाजनच्या उदाहरणातून समोर येतात. ती वाङ्मयचौर्यासारखा गंभीर गुन्हा करून पीएच. डी. पदवी मिळवू पाहते आहे. अशी विद्यार्थीनी स्वत:च्या नावावर दाखवून डॉ. खराडे स्वत:चे प्रमोशन मिळवू पाहात आहेत. कारण हितसंबंधांतून येथे प्रमोशनचे फायदे दिले जात आहेत. विद्यापीठ गीताच्या निमित्ताने झालेले राजकारण, ते निमित्त साधून प्रा. ढवळ्यांसारख्या गरीब माणसाचा होणार छळ, कुलगुरू पदासाठी ज्यांचे नाव नेहमी चर्चेत असायचे त्या प्रा. चव्हाणांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक, उलट त्यांच्या कृपेने विभागात चिकटलेल्या माणसालसा विभागप्रमुख पद दिले जाणे, पात्र लोकांना डावलणे, चमचेगिरी करणाऱ्यांचे हितसंबंध जोपासले जाणे अशा अनेक घटना-प्रसंगातून कादंबरीचे कथानक पुढे सरकत राहते. अनेक प्रश्न उपस्थित करीत आणि शेवटी तेही अनुत्तरीत ठेवून कादंबरी संपते. शिक्षणक्षेत्र अंतर्गत राजकारणाने दिवसेंदिवस बरबटले जात आहे. या व्यवस्थेमध्ये एखाद्या प्रमुख पदावर नियुक्त केलेली व्यक्तीच राजकीय प्रभावामुळे त्या पदावर आली असेल तर राजकारण विरहीत काम चालणार कसे अलीकडे अशा भ्रष्ट मार्गानेच रिक्त पदांवर उमेदवारांची निवड होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच चेहरे पाहून काम करण्याची प्रवृत्ती बळावते आहे. हुशार, ध्येयवेडी, जबाबदारीचे गांभीर्य ओळखणारी कार्यक्षम व्यक्ती किंवा असा वर्ग आजही या क्षेत्रामध्ये आहे. परंतु हा वर्ग अपरिमित कष्ट करूनही तत्त्वशून्य, दूषित राजकारणाला बळी पडताना दिसतो आहे. या वर्गाकडे असणारी ज्ञानपिपासूवृत्ती, त्यांचे मनोरथ आणि एकूणच त्यांच्या कार्यक्षमतेला नेस्तनाबूत करण्याचा दुराचार वाढला आहे. मोठ्या पदांची अभिलाषा ठेवून स्वत:चे स्वार्थ साधण्यामध्ये मशगूल असणारे लोक त्यासाठी गटबाजी करून प्रामाणिक व्यक्तींवर अन्याय करीत सुटले आहेत. हे माजोरी लोक आणि त्यांच्या माजोरीवृत्तीचे बळी अशा सवाचे वास्तवदर्शी पडसाद प्रस्तुत कादंबरीमध्ये पडलेले दिसतात. शैक्षणिक कार्यासाठी स्थापन केलेल्या एका महत्त्वाच्या संस्थेतील अनागोंदी, तेथील भ्रष्ट राजकारण, सूडबुद्धी, दांभिकता यावर भेदक प्रकाश टाकत एकूणच अशा संस्थांतील भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. खरे तर जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे. परंतु शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडवण्याएवेजी व्यवस्थेकडून भिजत ठेवले जातात. विशिष्ट हेतूने प्रेरित आणि हितसंबंधी राजकारण करीत असलेल्या प्रमुख पदांवरील जुनागडेंसारख्यांना यातच सुख मिळते. अशा लोकांना सामाजिक स्वास्थ आणि समाजाचे परितर्वन नको असते. या कादंबरीतील डॉ. जुनागडे आपल्या सनातनी विचारांना सतत चिकटून आहेत. वेळप्रसंगी ते आपल्या विचारांना मुरड घालताना दिसतात. परंतु त्यांचा मूळ हेतू उघड झाल्याशिवाय राहत नाही. वरून बोलणे पुरोगामी, नवविचाराधिष्ठित असले तरी त्यांच्या मनामध्ये सनातनी विचार खोलवर रुजलेला आहे. आपल्या विचाराशी सहमती दर्शविणाऱ्यांना ते जाणीवपूर्वक जवळ करतात. अशांवर ते आपली कृपादृष्टी ठेवून आहेत. विद्यापीठात चाललेल्या राजकारणाचा सूत्रधारच कुलगुरू पदावर असणारी व्यक्ती आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थाच या राजकारणांमध्ये कशी ओढली जाते. याचे वास्तववादी चित्र या कादंबरीमध्ये येते. कुलगुरू डॉ. जुनागडे विशिष्ट विचारांशी बांधील आहेत. आपल्या विचारांना, ध्येयांना जुळवून घेणाऱ्यांना हळूहळू ते स्वत:भोवती जमवू लागतात. त्यातून विद्यापीठात एक कंपू तयार होतो. या कंपूतील सर्वच त्यांच्या विचारांचे आहेत असे नाही. परंतु स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी ते अधीर आहेत. यासाठी ते कुलगुरुंच्या स्तुतीत डुंबलेले आहेत. संधी मिळेल तेथे स्तुती करण्याची स्पर्धा लागावी असे त्यांचे वर्तन आहे. स्वास्थ्यामुळे त्यांच्यात तत्त्वशून्यता आलेली आहे. स्वत:च्या भल्यापोटी ते काहीही करायला धजताहेत. वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे ते आड येणाऱ्यांना पद्धतशीरपणे बाजूला करताहेत. त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यासाठी उपलब्ध सर्व मागाचा अवलंब ते करताहेत. शिक्षणव्यवस्थेमध्ये आज सर्वत्र दिसणारी ही आपमतलबी प्रवृत्ती प्रस्तुत कादंबरीच्या आशयसूत्रातून व्यक्त होते. लेखक हे आशयसूत्र समोर ठेवताना कोठेही घटना-प्रसंगाची ओढूनताणून मांडणी करीत नाही. इतिहासाचे प्राध्यापक डॉ. शेळके यांच्या भाविश्वासाने येणारे सर्व अनुभव येथे एका क्रमाने लेखक वाचकांसमोर ठेवतो. वाचकांना या कादंबरीला एकसंघ सलग असे कथासूत्र नाही असे वाटते. परंतु विद्यापीठासारखी संस्था ही व्यापक आणि विविध विद्याशाखांमध्ये विभागलेली असते. अशा व्यापक आणि विविध विद्याशाखांमध्ये विभागलेल्या व्यवस्थेवर लिहिताना घटना प्रसंगांची बांधणी लेखकाने डॉ. शेळकेंच्या भावविश्वाचा आधार घेऊन केलेली आहे. डॉ. चव्हाण, डॉ. सावंत यांच्यासारख्या प्राध्यापकांशी डॉ. शेळक्यांच्या चललेल्या चर्चा यातून कथासूत्र प्रतीत होत राहते. या चर्चांमधून एकीकडे या व्यवस्थेवर वास्तवदर्शी प्रकाश टाकला जातो तर दुसरीकडे कादंबरीचे कथासूत्र एकत्र बांधून ठेवण्याचे कौशल्य साधले जाते. या कादंबरीमध्ये घडून येणाऱ्या या चर्चांमधून व्यक्त होणारे चिंतन संवेदनशील वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहे हे अंतर्मुख चिंतन कादंबरीमध्ये सर्वत्र येते. असाच एक संवाद येथे मुळातून पाहण्यासारखा आहे. सावंत सरांशी बोलताना शेळके म्हणतात, दोन प्राध्यापक भेटले तर एकमेकांशी धड बोलतसुद्धा नाहीत. सरळ एकमेकांना टाळतात किंवा बघूनही न बघितल्यासारखं करतात. सगळं वातावरण इतकं गढूळ होऊन गेलं आहे की काही विचारू नका. त्यावर सावंत सर म्हणतात, त्याचं काय आहे कोण माणूस कसा असेल, कोणाचा असेल, तो कुठे जाऊन काय सांगेल याचा काहीच अंदाज नसतो नं. असल्या गचाळ वातावरणात कसलं डोंबलाचं शिक्षण देणार आणि कसलं झाटाचं संशोधन करणार अहो, या उच्चविद्याभिूषितांपेक्षा आमची खेड्यापाड्यातली माणसं फार चांगली. ओळख असो नसो, समोरून येणाऱ्या माणसाला ते सहज नमस्कार करतात, माणसाकडे आधी माणूस म्हणून पाहतात. अरे, तुमच्या शिक्षणात आणि संशोधनात माणसालाच जागा नसेल तर ते काय चाटायचं आहे. शिक्षणव्यवस्थेच्या पोटात शिरलेल्या प्रदूषणाचे आणि अंतर्गत राजकारणाचे सर्व संदर्भ ही कादंबरी पुरविते. शिक्षणाचा उद्देश मानवता या मूल्याची प्रतिष्ठापना हा असावा. तसा तो असतोही, परंतु मूल्यप्रदूषित वातावरणामध्ये मानवताच पायदळी तुडविली जाते. शिक्षणातून नम्रता यायला हवी परंतु नम्रतेपेक्षा अहंकार वाढतो आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, विचारांची क्षुद्रताच अधिक दिसून येते. यासंदर्भातील अंतर्मुख करणारे चिंतन या कादंबरीमध्ये अनेक वेळा येते. मुळातच विद्यापीठाविषयी पूर्वग्रहदूषित असलेले आणि विशिष्ट विचारांनी कार्य करणारे कुलगुरू वरकरणी पुरोगामित्वाची भाषा वापरतात. परंतु ही त्यांची तोंडदेखली भाषा त्यांच्या कृतींमधून उघडी पडते. त्यामुळेच विद्यापीठात त्यांच्या विचारांचे प्रतिकूल पडसाद एमटत राहतात. दररोज नवनवे वाद जन्माला येतात. आंदोलनं उभी राहतात. या आंदोलनांना कुलगुरू जुमानत नाहीत. आंदोलकांची हेटाळणी केली जाते. लोकांचे न्याय्य हक्कच डावलले जातात. त्यातूनच नवे-नवे संघर्ष सुरू होतात. या आंदोलनात काहींचे प्राण जातात. विद्यापीठाचेही अपरिमित असे नुकसान होते. संकेतांना तिलांजली दिली जाते. जेष्ठतेला मूठमाती मिळते. हे संघर्ष शेवटही कोर्ट-कचेऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतात. कुलगुरू आपल्या विचारांना आणि कार्यपद्धतीला विरोध करणाऱ्यांना हुकूमशाहीच्या बळावर लगाम लावण्याचा प्रयत्न करतात. विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळेल तेथे ठेचून काढतात. अडवणे, डावलणे असल्या दबावतंत्राचा अवलंब सुरूच ठेवतात. आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ घालवायचे, त्यांना समाधानाने जगणेही अशक्य करायचे ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक सोडाच त्यांनी केलेल्या कामाची साधी दखलही घेतली जात नाही. या सर्वांमागे असणाऱ्या हीन मानसिकतेचे प्रत्ययकारी चित्रण लेखकाने केले आहे. हे चित्रण करताना कोठेही अतिशयोक्ती झालेली आहे असे जाणवत नाही. भाषा वापरताना ते स्वत:चा संयम ढळू देत नाही. अन्याय मांडताना देखील लेखकाच्या भाषेमध्ये शिवराळपणा शिरत नाही. अनवधनानेही येथे कोणाविषयी टोकाचे आरोप येत नाहीत. कादंबरीदेखील व्यक्तिरेखा, उद्वेग, चीड, संताप व्यक्त करतात, परंतु तो करताना आपला तोल ते ढळू देत नाहीत. कादंबरीतील आशयसूत्र लेखकाच्या समाजविषयीच्या सखोल जाणिवेतून संयतपणे अभिव्यक्त होत राहते. लेखकाची तीव्र संवेदना समकालीन बोलीतून व्यक्त होते. विद्यापीठीय क्षेत्रामध्ये व्यवहारासाठी वापरली जाणारी समकालीन भाषा लेखक येथे कौशल्याने उपयोजितो. या कादंबरीतील भाषेचे स्वरूप लक्षात येण्यासाठी पुढील उतारा उपयुक्त ठरेल. त्याचं काय आहे प्रोफेसर ही मानसिकताच मोठी अवघड आहे. कॉम्प्युटरमध्ये एखाददुसरा प्रोग्रॅमच काय, पण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो. तसा हा एक व्हायरस आहे. कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो किंवा काही वेळा कॉम्प्युटच्या सिस्टीममध्ये तो दडलेला असतो आणि संधी मिळताच अ‍ॅक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवर उपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच, की हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुंना त्यावरच ही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली व्यवस्थेमुळे उद्विग्न झालेल्या संवेदनशील मनाचा उद्गार आहे. एखादी शिक्षण संस्था वरून जेवढी भव्य दिव्य दिसते तशी ती आतून असतेच असे नाही. पीएच. डी. सारख्या महत्त्वाच्या संशोधनपदवी मधील भोंगळपणा, अशी मोठी पदवी विनासायास पदरी पाडून घेण्यासाठी अवलंबिले जाणारे गैरमार्ग, विविध समित्यांवर चेहरे पाहून होणारी लोकांची नियुक्ती, निवड समित्या, त्यातून चालणारा गैरव्यवहार, भरती-पदोन्नती प्रक्रियेतील मनमानी, पदांचा गैरवापर करून चाललेले आक्षेपार्ह वर्तन, दबावतंत्र, अडवणूक, जातीयता, प्रांतीयता, विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार, वसतिगृहातील गैरप्रकार, भ्रष्टाचार अशा असंख्य घटना-प्रसंगांच्या आधाराने विद्यापीठासारख्या महत्त्वाच्या संस्थेतील अनागोंदी आणि मनमानी कारभाराची चिरफाड प्रस्तुत कादंबरीमध्ये वास्तवपूर्ण रीतीने येते. शिक्षकांच्या संघटना आणि कर्मचारी-विद्यार्थी आंदोलने कशी कौशल्यपूर्ण रीतीने मोडून काढली जातात, आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी कसे डावपेच आखले जातात, या संदर्भातील वर्णने वाचून शिक्षणप्रेमी वाचकांची मने उद्विग्न होतात. वाचकांच्या मनामध्ये उद्वेग जागृत व्हावा अशी घटना– प्रसंगांची मांडणी हे ठाकूरांचे कौशल्य आहे. या कादंबरीला कथासूत्र आहे. परंतु ते बंदिस्त स्वरुपाचे नाही. त्या प्रमाणेच कादंबरीच्या रूढ तंत्रात बसेल असा शेवटही या कादंबरीला नाही. शिक्षणयात्रेचे स्वरूप विलक्षण व्यापक आणि दिवसेंदिवस विस्तारणारे आहे. त्यामुळे या व्यवस्थेचे समग्र अंतरंग एकाच कथासूत्रात उलगडून दाखविणे अशक्य आहे. तथापि आतून बरबटलेल्या, सडलेल्या या व्यवस्थेचे आयाम देखील विविधांगी आहेत. त्यामुंळेच प्रस्तुत कादंबरीचा रूपबंध बंदिस्त झालेला नाही. कादंबरीच्या शेवटी कथासूत्र जेथे संपते तिथून पुढे वाचकांच्या मनामध्ये ते सुरू राहते. पुढे महाजनवर कारवाई झाली काय, काळोखेचे अस्वस्थ होतो. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम लेखक वाचकांवर सोडून देतो. समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची लेखकाची वृत्ती, घटना-प्रसंगांची सर्जनशील मांडणी आणि सामाजिक जाणिवेतून सर्व घडामोडींकडे पाहण्याची व्यापक दृष्टी प्रस्तुत कादंबरी वाचताना प्रत्ययाला येते. एकूणच शिक्षणासारख अनेक शाखा-उपशाखांतून विभागलेल्या आणि दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या गुंतागुंतीची आणि व्यामिश्रतेची उकल प्रस्तुत कादंबरीतून होताना दिसते. त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये शिरलेल्या भ्रष्ट आणि हीन प्रवृत्तीमुळे शिक्षण व्यवस्थेलाच भोगाव्या लागणाऱ्या परिणामांचे सर्व सुक्ष्म संदर्भ पुरविण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालेला आहे. -डॉ. नंदकुमार मोरे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 23-12-2012

    विद्यापीठीय भ्रष्टाचाराचा पंचनामा… आजकाल शिक्षण क्षेत्रातदेखील राजकीय हस्तक्षेप, जातीय प्रवृत्त्ती आणि भ्रष्टाचार यांनी हौदोस मांडला आहे. ज्ञानदानासारख्या पवित्र आणि उदात्त क्षेत्रातील विद्यापीठांना अनाचाराचा जंतुसंसर्ग झाला असून या तिरस्करणीय परिस्ितीमुळे विद्वान, प्रामाणिक आणि स्वार्थत्यागी व्यक्तींचा बळी जात आहे. या विचित्र सत्यचित्राचे प्रातिनिधिक रूप म्हणजे प्रस्तुत व्हायरस ही कादंबरी होय. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रतीक. या ग्रंथांना धर्म, जात, राजकारण, भ्रष्टाचार, कलह यांची कीड लागणे म्हणजे सुसंस्कृत, सज्जनांना छळणे होय, पण विद्यमान समाजयंत्रणा तशीच असून तिचा भेद करणे किती दुरापस्त असू शकते हे कादंबरीकाराने मांडले आहे. ‘कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय, पण संपूर्ण सिस्टिमच करप्ट व्हायरस असतो तसा हा एक व्हायरस. हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुना त्यावरच ही सगळी सिस्टिम उभी आहे. मग ती कशी चांगली निपजणार तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा... तुमच्या नकळत तो आत शिरतोच आणि सगळी सिस्टिम कॅश करून टाकतो.’ हे कादंबरीतील एका प्रधानपात्राचे निवेदन असून त्याद्वारे कादंबरीचा आशयपट कोणत्या स्वरूपाचा आहे हे ध्वनित होते. प्रस्तावनेत कादंबरीकाराने ‘सारभूत’ विधान केले आहे. ते असे असत्यच सत्याचं रूप घेऊन वावरतंय. सत्यावरच कुरघोडी करतंय. सत्य अशा बिकट परिस्थितीत सापडलंय की त्याला समोर येणं अशक्य होऊन बसलंय. सत्यवादी वेडा ठरतोय... ठरवला जातोय... यासंदर्भात स्वतंत्रपणे भाष्य करण्याची मुळीच गरज नाही. कारण तो एक बोलका ढलपा ठरावा. कादंबरीतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा इत्यादी सर्व काही काल्पनिक... असे स्पष्टीकरण ठळक अक्षरात मुद्दामहून केले असले तरी वाचकांना मात्र हे सर्वकाही चांगलेच परिचयाचे वाटते यातच कादंबरीचे यश सामावले आहे. जातीय पातळीवरून राजकारण करून, दलित विद्यार्थी संघटनांना भडकावून आंदोलने करणे अशा घटनांची नोंदसुद्धा सविस्तरपणे केली गेली आहे. विद्यापीठ स्तवनाचे गीत, बहुजन संघटना नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे भांडवल करून घरबांधणीत केलेला भ्रष्टाचार अशा प्रसंगांचा आलेख शैक्षणिक क्षेत्राची झाडाझडती घेताना दिसून येतो. ज्ञानदानापेक्षा गटबाजी, हेवेदावे, भ्रष्टाचार यामध्येच गुरफटलेले विद्वान प्राध्यापक, विद्यार्थी नेते, मंत्री यांच्यामुळे शिक्षण क्षेत्र कसे व किती पोखरले आहे याची कल्पनाच करवत नाही. हा ‘व्हायरस’ खूप हैदोस घालून सारी यंत्रणच बिघडवून टाकतो. किंबहुना तो यंत्रणेचाच एक अटळ भाग बनून सर्वांना हतबल करू शकतो हे दारूण सत्य कथन करणारी ही कादंबरी शैक्षणिक वर्तमानावर कोरडे ओढून अंतर्मुख करते. ही कादंबरी अजिबात काल्पनिक न वाटता ती वास्तवात घडणारी वाटते हे कादंबरीकाराचे सुयश म्हणता येईल. - डॉ. श्रेया मुळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more