* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF 18 CHARACTER SKETCHES. ‘DR. SHARAD PAWAR: SAHITYA, SANSKRUTI, ITIHAS YANCHI JAAN ASNARA NETA’ UNFOLDS SHRI. PAWAR’S CHARACTER. AT THE PUBLICATION OF ‘SHAHU SMARAK GRANTH’, DR. JAISINGRAO PAWAR HAD AN OPPORTUNITY TO MEET SHRI. SHARAD PAWAR. HE CAUGHT A GLIMPSE OF THE LATTER’S STUDIOUS NATURE AND REALISED THAT SHRI. PAWAR WAS AN EXCELLENT READER. SHRI. PAWAR HAD MADE SOME CRITICAL NOTES REGARDING TWO CRUCIAL PROJECTS AND SHARED THOSE NOTES WITH DR. JAISINGRAO. THES ARE INCLUDED IN THIS ARTICLE. ‘DR. PATANGRAO KADAM: SAHYADRICHYA KONDANATIL EK SONHEERA’ IS AN ARTICLE THROWING LIGHT ON DR. KADAM’S WORK IN THE EDUCATION FIELD AND THE OVERALL DEVELOPMENT IN HIS VILLAGE. ‘SURYAKANT: SWAPNE PAHANARA EK JIDDI KALAWANT’ IS BASED ON MARATHI MOVIE LOVERS’ FAVOURITE ACTOR SURYAKANT, HIS VERSATILITY AS SEEN BY JAISINGRAO, HIS LOVE FOR HIS BROTHER, HIS WRITING AND HIS GREATNESS AS AN ACTOR. ‘CHANDRAKANT: EKA PUNAVECHYA CHANDRACHA ASTA’ IS BASED ON THE SENIOR CINEMA ACTOR CHANDRAKANT. HE WAS SURYAKANT’S ELDER BROTHER, AN ARTIST AND TOOK SOCIAL COMMITMENT SERIOUSLY.
साहित्य, संस्कृती, इतिहास यांची जाण असणारे शरद पवार...भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम... सिने-नाट्य कलावंत, लेखक सूर्यकांत...सिने कलावंत चंद्रकांत यांची चित्रकारिता...फारसी भाषेत असणारा मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा खजिना मराठीत आणणारे सेतुमाधवराव पगडी... ऐतिहासिक साधन साहित्य संपादन-प्रकाशनातून समोर आणणारे थोर इतिहास संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार...‘थोरातांची कमळा’ या दंतकथेला विराम देणारे मु. गो. गुळवणी... निरपेक्षपणे इतिहास संशोधन करणारे समुद्रगुप्त पाटील... शाहू महाराजांच्या दिलदारपणाचं दर्शन घडविणारे दादा महाराज सांगवडेकर...बुिद्धप्रामाण्यवादी नास्तिक विचारवंत भाई माधवराव बागल... लोकशिक्षणास वाहून घेतलेले मालोजीराजे निंबाळकर...इतिहास आणि इतिहासेतर क्षेत्रातील व्यक्तींचा ओघवत्या भाषेत घेतलेला अभ्यासपूर्ण वेध
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#व्यक्तिवेध:शरदपवार…ते...गोविंदपानसरे #डॉ.जयसिंगरावभाऊसाहेबपवार # व्यक्तिचित्रसंग्रह #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #VYAKTIVEDHA:SHARADPAWAR…TE…GOVINDPANSARE #VYAKTICHITRASANGRAHA #DR.JAYSINGHRAOBHAUSAHEBPAWAR #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
  • Rating Star लोकसत्ता २०/१/२०२२

    डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे’ या पुस्तकात एकूण अठरा लेखांचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील अनेक मान्यवरांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात शब्दांकित केली आहेत. यात शरद पवार, पंडित सेतु माधवराव पगडी, मु. गो. गुळवणी, सूरयकांत-चंद्रकांत हे बंधू, कॉ. गोविंदराव पानसरे अशा अनेक मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या मंडळींची व्यक्तिचित्रे म्हणजे लेखकाला त्यांच्यातील विविध गुणांमधून घडलेले व्यक्तिदर्शनच होय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय राजकारणातही दबदबा असणारे, तसेच सांस्कृतिक, सामजिक विषयांची उत्तम जाण असणारे शरद पवार यांच्यावरील लेख त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे तसेच त्यांच्या व्यासंगी आणि वैचारिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवितो. मराठी चित्रपटसृष्टीतील लाडके चंद्रकांत-सूर्यकांत बंधू यांच्यावरील लेखांमध्ये या दोघांमध्ये असलेले प्रेमाचे नाते प्रामुख्याने दिसून येते. इतिहास संशोधक, विचारवंत सेतुमाधवराव पगडी यांच्यावरील लेख म्हणजे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवातून उलगडलेले त्यांचे व्यक्तिचित्र. त्यात सेतुमाधवराव पगडी यांची व्यासंगीवृत्ती, त्यांच्यातील संशोधकवृत्ती, पांडित्य यांचे यथार्थ दर्शन घडते. याचप्रमाणे कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. पतंगराव कदम, इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार, विचारवंत भाई माधवराव बागल, क्रांतिवीर नागनाथअण्णा, प्राचार्य पी. बी. पाटील, मालोजीराजे निंबाळकर या मान्यवरांची ओळख या पुस्तकातून होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more