* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342188
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE IS QUITE CURIOUS ABOUT WARREN BUFFET, THE GREATEST INVESTOR OF ALL TIMES. IN SPITE OF NOT TAKING UP TRADITIONAL EMPLOYMENT OR ENGAGING INTO ANY BUSINESS, BUFFET HAS BECOME THE WORLD`S SECOND RICHEST PERSON, OPERATING WITH COMPLETE HONESTY AND STRAIGHTFORWARDNESS. NATURALLY, EVERY PERSON CAN LEARN A LOT FROM HIM. THERE ARE MANY PEOPLE WHO HOPE TO MAKE MONEY BY INVESTING WHILE SITTING AT HOME. APART FROM THIS, ALMOST EVERYONE WORKING OR RUNNING ONE`S BUSINESS HOPES TO BE RICH. NATURALLY, EVERY PERSON THAT HOPES TO BENEFIT FROM BUFFET`S WISDOM AND INTELLIGENCE CAN LEARN QUITE A LOT FROM THIS BOOK. THE BOOK ATTEMPTS TO DEMYSTIFY 50 OF BUFFET`S FAMOUS QUOTES WITH DETAILED ANALYSIS. THESE ARE VERY WITTY AND THEY ALSO TEACH EVERYONE SOMETHING UNIQUE.
वॉरन बफे या जगप्रसिद्ध गुंतवणूकदारानं, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचं गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचं मार्गदर्शन केलं आहे. मुख्य म्हणजे अगदी मजेशीर आणि कुणालाही समजेल अशा भाषेमधल्या दिलखुलास विधानांच्या आधारे त्यानं हे साधलं आहे. बफेच्या या विधानांना `मंत्र` असं इथं म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे त्याचं प्रत्येक विधान खूप विचारांमधून, अनुभवांमधून आणि यश-अपयश यांच्या हिंदोळ्यांवर तरंगल्यानंतर तयार झालेलं आहे. यांमधील नेमकी ५० विधानं निवडण्याचा प्रयत्न इथं केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ५० विधानांचा इथं नुसता उल्लेख नाही, तर प्रत्येक विधानामध्ये दडलेला बपेÂचा विचार आणि काही वेळा खोडसाळपणा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एवूÂणच वॉरन बफेनं गुंतवणुकीच्या विश्वाला `ग्लॅमर` मिळवून दिलं, हे इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. ‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच,’ असा आत्मविश्वास त्यानं दिला आहे. अगदी छोट्या रकमांच्या गुंतवणुकीतूनसुद्धा अवाक करून सोडणारं यश गुंतवणूकदार शेअर बाजारात मिळवू शकतात. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. शेअर बाजाराविषयीची ही नकारात्मक मानसिकता काही अंशी मोडून काढण्यासाठी तरी अशा पुस्तकांचा उपयोग होईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
WARREN BUFFET# INVESTING# STOCK MARKET# SHARE MARKET# STOCK# SHARE# SUCCESS# HOW TO BE SUCCESSFUL# PROFIT# RETURNS# PATIENCE IN INVESTING# GREAT INVESTOR# INVESTING WISDOM# LOSS# MARKET# WALL STREET# FORECASTING# STOCK PRICE# ACCOUNTING# GREED# FEAR# INTEREST RATE# ECONOMICS# FINANCE# EARNING# LOSS.
Customer Reviews
  • Rating StarNILESH SHINDE

    वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे. आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि त्यातही कितीतरी कंन्याची मालकी त्याच्याकडे आहे. त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर 2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे. त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात सांगितली आहेत , हे पुस्तक म्हणजे व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची गुंफलेली सुरेख माळ .... गुंतवणूकपूर्व सल्ले : श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा..... ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा. छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे. माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल गुंतवणूकदार होण्यापूर्वी : आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. गुंतवणूकदार झाल्यानंतर : ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी. ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी. तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो. Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा "जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला" शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा गुंतवणूक कशी करावी: दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी. शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल. ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या (Trading , FO, Commodity )मागे धावू नये. हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये. लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात. जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी. गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते. लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी. कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही. सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही. आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात 100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही. भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये. इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी. इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा. खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा. तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते. शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये. ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो. तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका. नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो. ...Read more

  • Rating StarDr Ketan Talmale

    Now I am reading वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र in which you present his thoughts and principles in innovative way, simple language. THANK YOU SO MUCH SIR🙏🙏👍👍

  • Rating StarRohit Pawar

    खूप छान पुस्तक आहे .अतिशय कमी शब्दात बफे यांच्या संपूर्ण जीवनाची मांडणी केली आहे आणि खास करून त्यांनी दिलेली सोपी आणि स्पष्ट अशी गुंतवणुकीची सूत्रे आपण ह्या पुस्तकात दिलेली आहेत .

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-07-2017

    वॉरन बफे हे नाव माहीत नाही, असा कोणी नसेल. विशेषत: गुंतवणुकीच्या क्षेत्रातला हा बादशहा. सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कुठलीही नोकरी वा कुठलाही व्यवसाय न करता न्याय्य मार्गाने अब्जाधीश होण्याची कमाल त्याने करून दाखवली. त्याचयाकडून गुंतवणुकीचे मार्ग खरोखर शिकायला हवेत. या विषयावरच आधारित माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. विलक्षण बुद्धिमत्तेची झलक यातून निश्चितपणे मिळते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more