* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WASTED
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980196
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARKJOHNSON`S FATHER HAD `LOVE` TATTOOED ACROSS HIS LEFT HAND, BUT THAT DIDN`T STOP THE BEATINGS. THE JOHNSON CHILDREN WOULD TURN UP TO SCHOOL BATTERED AND BRUISED, BUT NO ONE EVER THOUGHT OF INVESTIGATING THEIR HOME LIFE. MARK JUST SLIPPED THROUGH THE CRACKS AND KEPT ON FALLING. FOR YEARS. BROUGHT UP IN A HOME SIMMERING WITH VIOLENCE AND DARK SECRETS, MARK FELL INTO BAD HABITS AT AN EARLY AGE. CONSTANTLY IN TROUBLE AT SCHOOL, HE BEGAN STEALING _T THE AGE OF SIX, WAS DRINKING BY THE AGE OF EIGHT AND TOOK HIS FIRST HIT OF HEROIN AGED ELEVEN. A SENSITIVE AND INTELLIGENT BOY, HE COULD NEVER STAY ON THE RIGHT PATH, AND THOUGH ART COLLEGE BECKONED, HE ENDED UP IN PORTLAND PRISON INSTEAD. WITH SEARING HONESTY, WASTED DOCUMENTS MARK`S DESCENT INTO THE VERY DEPTHS OF ADDICTION AND CRIMINALITY. HOOKED ON HEROIN AND CRACK, HOMELESS ON THE STREETS OF LONDON AND WITH A PRICE ON HIS HEAD, NO ONE - LEAST OF ALL MARK - BELIEVED HE WOULD SURVIVE, NEVER MIND RECOVER. _ND YET HE SOMEHOW FOUND THE STRENGTH`_O PULL THROUGH, AND NOW RUNS HIS OWN THRIVING TREE SURGERY BUSINESS, EMPLOYING AND HELPING OTHER RECOVERING ADDICTS. HIS STORY IS AT ONCE SHOCKING AND INSPIRATIONAL - A HEARTBREAKING AND COMPELLING ACCOUNT OF ONE MAN`S STRUGGLE TO SAVE HIMSELF, AND HELP SAVE OTHERS IN THE PROCESS.
मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि व्रॅÂकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #WASTED #SNEHALJOSHI #MARKJOHNSON #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating Starदर Pramod Bankhele

    वेगळ्या विषयावरचं खुपच वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पुस्तक,प्रामाणिक भाषांतर ,हे पुस्तक म्हणजे त्याच्या आठवणी चे तुकडे आणि घटना आहेत,जाऊ द्या,"पुस्तक "मिळावा आणि हाती घ्या--एक वेगळं विश्व अनुभवा!!

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 06-09-2009

    जीवनात हरवलेल्या माणसांसाठी… माणूस व्यसनात का अडकतो? माणसाचं माकड होतं म्हणजे नक्की काय होतं? व्यसनांमुळे किंवा त्या जीवनात प्रचंड गुरफटल्यामुळे एखादा माणूस चांगल जगणं सोडून भीक मागू शकतो? बरं, आयुष्याची इतकी हेळसांड झाल्यानंतर एखाद्याला त्यातून बाहर पडावंसं वाटलं, तर बाहेर पडता येतं? तो पुन्हा एकदा नवा डाव मांडू शकतो? तो डाव यशस्वी होऊ शकतो? या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, एका व्यसनी माणसाचं, गर्दुल्ल्याचं आयुष्य जवळून पाहायचं असेल, त्याचा व्यसनात गुरफटण्यापासून ते त्यातून मुक्त होईपर्यंतचा प्रवास अनुभवायचा असेल, तर मार्क जॉन्सन यांचं ‘वेस्टेड’ वाचायला हवं. हे त्यांचं आत्मकथन आहे. सत्य घटना आहे. ही कथा आहे, एका बालपण हरवलेल्या मुलाची. प्रेमाचा ओलावा शोधता शोधता, रखरखीत घरापासून मनानं दुरावलेल्या मुलाची. त्या शोधात लागलेल्या कुसंगतीची. त्यातून जडलेल्या व्यसनांची. व्यसनांमुळे विखुरलेल्या आयुष्याची. त्यानं भोगलेल्या तुरूंगवासाची आणि रस्त्यावरच्या जगण्याची. ही कथा आपल्याला सुन्न करते. आतून हलवून टाकते. माणूस व्यसनी का होतो, याचं उत्तर या प्रवासातून कुठंतरी सापडत जातं. व्यसनी आहे, असं म्हणून हिणवण्यापेक्षा किंवा झटकून टाकण्यापेक्षा, त्यांच्याकडे कशा पध्दतीनं पहायला हवं, हे यातून लक्षात येतं.सिगारेटपासून सुरवात करून हेरॉइन आणि क्रॅकच्या अधीन गेलेल्या मार्कचा फक्त व्यसनांचाच नव्हे, तर मानसिक प्रवास, त्याची आंदोलनं आपल्याला भिडतात. मार्कनं केलेल लग्न, त्याची तशीच व्यसनी बायको, नंतर झालेली मुलं, त्या मुलांची झालेली ससेहोलपट, हे वाचता वाचता आपण अंतर्बाह्य हादरतो. पुढे तर त्याचं रस्त्यावरचं भिकारी होऊन जगणं. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यातच गुरफटत जाणं, हा प्रवास आपणही सुन्न मनानंच करतो; पण प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा साक्षात्काराचा क्षण असतोच. तो क्षण समजला आणि पकडता आला, तर आयुष्याचं सोनं होतं, नाहीतर माती. मार्क तो क्षण पकडतो. त्याआधीही त्यानं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो; पण प्रत्येक वेळी त्यापासून तो दूर पळतो. या वेळी मात्र तो निर्धारानं उतरतो. व्यसन सोडणं अजिबात सोपं नाही. शारीरिक त्रासासोबत मानसिक अडथळेही प्रचंड आहेत. शारीरिक त्रासावर औषधोपचार हा उपाय आहे; पण मानसिक त्रासाचं काय? तो सोसलाच पाहिजे. त्याला तोंड द्यायलाच हवं आणि त्यातून पार पडायलाच हवं. ही प्रक्रिया खूप अवघड असते. मुळात आपण व्यसनात गुरफटलेले आहोत, त्यातून बाहेर पडणं आपल्याला जमत नाही, हे मान्य करणंच खूप अवघड असतं. ‘छे, मी कधीही सोडू शकतो,’ हीच भूमिका व्यसनी लोकांची असते. तावून-सुलाखून निघणं म्हणजे काय, याचा अनुभव मार्क आपल्याला देतो. एकदा व्यसनमुक्त झाल्यानंतरचा मार्कचा प्रवासही तेवढाच भव्य आहे. मुळात तो झाडांचा शल्यचिकित्सक आहे. व्यसनांच्या आवरणाखाली त्याचं हे अंग झाकलं गेलं आहे. ते आवरण दूर होताच तो मोकळा होतो. पुन्हा एकदा डाव मांडतो. आत्मविश्वासानं व्यवसायात उतरतो आणि चक्क यशस्वी होतो.नव्या वाटेवर चालतानाही तो जुने दिवस विसरत नाही, हे विशेष! तो आपल्यासारख्या पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनी मंडळींना नोकरी देतो. त्यांनाही पुन्हा उभं करतो. मार्क जॉन्सन आज एक यशस्वी व्यावसयिक आहेत. ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहतात. गुन्हेगार आणि व्यसनी तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचं पुर्नवसन करण्याचं कामही ते करत आहेत. मार्कची ही कहाणी आणि त्याची गगनभरारी मराठीत अगदी उत्तम रीतीनं पोचवली आहे स्नेहल जोशी यांनी. मार्क यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती लिहिली,असं सातत्यानं वाटत राहतं, हेच त्यांचं यश आहे. हे उत्तम पुस्तक उत्तम रीतीनं मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभारच मानायला हवेत. जाता जाता एकच. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि त्यातील विचार खूप महत्त्वाचा आहे. मार्क म्हणतो, ‘हे पुस्तक जीवनात हरवलेल्या माणसांना अर्पण. जर माणसं बदलली, तर जग बदलेल.’खरंच असंच व्हावं, हीच मनापासून इच्छा! - अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more