* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE ARE POOR BUT SO MANY
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184984224
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ELA BHATT IS WIDELY RECOGNIZED AS ONE OF THE WORLD`S MOST REMARKABLE PIONEERS AND ENTREPRENEURIAL FORCES IN GRASSROOTS DEVELOPMENT. KNOWN AS THE "GENTLE REVOLUTIONARY," SHE HAS DEDICATED HER LIFE TO IMPROVING THE LIVES OF INDIA`S POOREST AND MOST OPPRESSED CITIZENS. IN INDIA, WHERE 93 PERCENT OF THE LABOR FORCE ARE SELF-EMPLOYED, 94 PERCENT OF THIS SECTOR ARE WOMEN. YET SELF-EMPLOYED WOMEN HAVE HISTORICALLY ENJOYED FEW LEGAL PROTECTIONS OR WORKER`S RIGHTS. IN FACT, MOST ARE ILLITERATE AND SUBJECT TO EXPLOITATION AND HARASSMENT BY MONEYLENDERS, EMPLOYERS, AND OFFICIALS. WITNESSING THE TERRIBLE CONDITIONS FACED BY WOMEN WORKING AS WEAVERS, STITCHERS, CIGARETTE ROLLERS, AND WASTE COLLECTORS, ELA BHATT BEGAN HELPING THESE WOMEN TO ORGANIZE THEMSELVES. IN 1972, ELA BHATT FOUNDED THE SELF-EMPLOYED WOMEN`S ASSOCIATION (SEWA) TO BRING POOR WOMEN TOGETHER AND GIVE THEM WAYS TO FIGHT FOR THEIR RIGHTS AND EARN BETTER LIVINGS. THREE YEARS AFTER SEWA WAS FOUNDED, IT HAD 7,000 MEMBERS. TODAY IT HAS A TOTAL MEMBERSHIP OF 700,000 WOMEN, MAKING IT THE LARGEST SINGLE PRIMARY TRADE UNION IN INDIA. BHATT LEAD SEWA TO FORM A COOPERATIVE BANK IN 1974 - WITH A SHARE CAPITAL OF $30,000 - THAT OFFERED MICROCREDIT LOANS TO HELP WOMEN SAVE AND BECOME FINANCIALLY INDEPENDENT. TODAY THE SEWA COOPERATIVE BANK HAS $1.5 MILLION IN WORKING CAPITAL AND MORE THAN 30,000 DEPOSITORS WITH A LOAN RETURN RATE OF 94 PERCENT. THROUGH YEARS OF ORGANIZATION AND STRATEGIC ACTION, ELA BHATT DEVELOPED SEWA FROM A SMALL, OFTEN IGNORED GROUP INTO A POWERFUL TRADE UNION AND BANK WITH ALLIES AROUND THE WORLD. DURING THE LAST THREE DECADES, SEWA`S EFFORTS TO INCREASE THE BARGAINING POWER, ECONOMIC OPPORTUNITIES, HEALTH SECURITY, LEGAL REPRESENTATION, AND ORGANIZATIONAL ABILITIES OF INDIAN WOMEN HAVE BROUGHT DRAMATIC IMPROVEMENTS TO HUNDREDS OF THOUSANDS OF LIVES AND INFLUENCED SIMILAR INITIATIVES AROUND THE GLOBE. WE ARE POOR BUT SO MANY IS A FIRST-HAND ACCOUNT OF THE VISION, RISE, AND SUCCESS OF SEWA, IN INDIA AS WELL AS INTERNATIONALLY. THE BOOK BEGINS WITH A HISTORY OF THE EARLY DAYS OF SEWA AND AN EXPLORATION OF THE GHANDIAN PHILOSOPHY THAT HELPED SHAPE SEWA`S FORMATION AND VISION. IT FOLLOWS WITH AN ACCOUNT OF THE STRUGGLES AND CHALLENGES THAT SEWA FACED IN ITS JOURNEY AND DESCRIBES HOW THESE WERE ADDRESSED AND OVERCOME. IT THEN EXPLORES THE FREEDOM THAT SEWA HAS FACILITATED FOR WOMEN WORKING IN THE INFORMAL ECONOMY BY PRESENTING SEVERAL INSPIRATIONAL STORIES OF INDIVIDUAL SEWA MEMBERS. THE FINAL CHAPTER DESCRIBES THE INTERNATIONAL EXTENSION OF SEWA`S WORK, THE CHALLENGES THAT WOMEN FACE IN THE INFORMAL ECONOMY WORLDWIDE, AND HOW SEWA CAN BE EFFECTIVELY REPLICATED IN OTHER PARTS OF THE WORLD. THIS VOLUME IS UNIQUE IN THAT IT WILL ELABORATE THE SPECIFIC EXPERIENCE AND KNOWLEDGE OF ELA BHATT IN HER AND SEWA`S JOURNEY AND PROVIDE INSIGHTS AND KNOWLEDGE THAT NO OUTSIDE RESEARCHER WOULD EVER BE IN A POSITION TO REPLICATE.
‘सेवा’ (SEWA - SELF EMPLOYED WOMEN`S ASSOCIATION) हे इलाबेन भट्ट यांचं अलौकिक जीवितकार्य आहे. लहान-सहान व्यवसायांवर उपजीविका करणाऱ्या तळागाळातल्या लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून ‘सेवा’नं त्यांना त्यांच्या कुवतीची, हक्कांची आणि संघटित झाल्यामुळे लाभलेल्या बळाची जाणीव करून दिली आणि त्यांना सक्षम बनवून त्यांची परिस्थिती सुधारली. कचरा गोळा करणं, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणं, भरतकाम करणं, डिंक गोळा करणं, मिठागरांमध्ये मीठ बनवणं अशा विविध व्यवसायांतल्या स्त्रियांच्या मालाला बाजारपेठ आणि चांगले भाव मिळवून देणं, कर्जाच्या दलदलीतून वर काढायला स्वस्त दरानं कर्ज देणं, त्यांना इतर विविध सुविधा मिळवून देणं अशी अनेक कार्यं ‘सेवा’नं कशी तडीला नेली, याचा प्रेरणादायी, उद्बोधक अनुभव हे पुस्तक घडवतं. स्त्री-कल्याण, दारिद्र्य निर्मूलन, नोकरीच्या सुसंधीमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #WEAREPOORBUTSOMANY #WEAREPOORBUTSOMANY #वुइआरपुअरबटसोमेनी #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #ELAR.BHATT "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 11-06-2017

    इलाबेन भट्ट यांचे सेवाकार्य... जगभरातील लोकोत्तर व्यक्तींनी केलेल्या असाधारण कार्याची यशोगाथा मराठी वाचकापार्यंत पोहोचवणं, या सामाजिक बांधिलकीच्या कामात ‘मेहता प्रकाशन’ संस्था अग्रभागी आहे. ‘सेवा (SEWA- Self Employed Women S Association) हे श्रीमतीइलाबेन भट्ट यांचं अलौकिक जीवितकार्य आहे. लहानसहान व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या तळागाळातल्या लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून त्यांना त्यांच्या कुवतीची, हक्काची आणि संघटित झाल्यामुळे लाभलेल्या बळाची जाणीव करून देणं आणि त्यांची परिस्थिती सुधारणं हे मोठंच काम ‘सेवा’नं केलेलं आहे. कचरा गोळा करणाऱ्या, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणाऱ्या, नगावर कपडे शिवून देणाऱ्या, भरतकाम करणाऱ्या, जंगलातला डिंक गोळा करणाऱ्या, मिठागरांमध्ये मीठ तयार करणाऱ्या, जमीन धरणाखाली गेल्यामुळे विस्थापित झालेल्या अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांना संघटित करून त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणं, कर्जाच्या चिखलातून वर काढायला त्यांना स्वस्त दरानं कर्ज मिळवून देणं, यासाठी ‘सेवा’ बँकेची स्थापना करणं, रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांमागचा पोलिसांचा ससेमिरा हटवण्यासाठी त्यांना आयडेंटिटी कार्ड्स मिळवून देणं अशा ‘सेवा’नं तडीस नेलेल्या अनेक कार्याची ओळख आपल्याला या पुस्तकाद्वारे जवळून होते. शिकाऱ्याच्या जाळ्यात पाय अडकलेले पक्षी एकाच वेळेस सर्वांची शक्ती पणाला लावून जाळ्यासकट आकाशात झेप घेतात आणि शिकाऱ्याच्या तावडीतून सुटतात. ही संघटित शक्तीची महती सांगणारी कथा आपण सर्वांनीच बालपणी वाचलेली आहे; पण लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून ही कथा ‘सेवा’च्या कार्यकर्त्यांनी सत्यात उतरवली, हा स्तिमित करणारा अनुभव आहे. गांजलेल्या, असंघटित स्वत:च्या लहान सहान व्यवसायांवर उपजीविका करू पाहणाऱ्या गरीब स्त्रियांबद्दल इलाबेनना आस्था वाटली आणि त्यांनी त्या स्त्रियांना संघटित करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. इलाबेनच्या ठायीची आस्था, दूरदृष्टी, संघटन कौशल्य, व्यवहार ज्ञान, लढाऊ बाणा, लोकसंग्रह या साऱ्या गुणांमुळेच ही गोष्ट शक्य होऊ शकली, हे मनोमन जाणवतं. इलाबेनच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळो आणि ज्योतीनं ज्योत उजळून अनेकांच्या जीवनात प्रकाश उजळो, याच सदिच्छा! – सुनीती काणे ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - JULY 2015

    कष्टकरी स्त्रियांची यशोगाथा… कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या महिलांसारख्या अगदी कमी मोबदल्याची लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या खिजगणतीतही नसतात. पण अशाच महिलांना बरोबर घेऊन उभं राहिलेलं, व्यवस्थेला हलवू शकलेलं मोठं काम म्हणजे ‘सेवा. म्हणजेच सेल्फ एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन. दुधाच्या क्षेत्रात जसं आणंद तसं सामाजिक क्षेत्रात ‘सेवा’चं योगदान आहे, आपल्या समाजात जातीच्या उतरंडीमध्ये तळाच्या जाती अगदीच दुर्बल, वंचित राहिल्या. अशा जातीतल्या स्त्रिया त्याहूनही पिचलेल्या. या स्तरातल्या कष्टकरी, गरीब, असंघटित स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन ‘सेवा’ने त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केला. या स्त्रिया कोण होत्या तर दिवसभर कष्ट करून कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणाऱ्या, भरतकाम करणाऱ्या, जंगलात जाऊन डिंग गोळा करणाऱ्या, मिठागरांमध्ये मीठ बनवणाऱ्या स्त्रिया. दिवसभर राब-राबून त्यांना जेमतेम दहा रुपयेही मिळत नसत. त्यांच्या कष्टांवर वरचे व्यापारी गब्बर होत. कारण या स्त्रियांना लिहिता-वाचता येत नसे, त्यांना वेगवेगळे सरकारी परवाने मिळवणं जमत नसे आणि मुख्य म्हणजे त्या पूर्णपणे असंघटित असत. ‘सेवा’ने जगाला त्यांच्या कष्टांची दखल घ्यायला लावली. त्या कष्टांचा या स्त्रियांना योग्य दर मिळावा यासाठी वेळोवेळी त्यांना संघर्ष करायला लावला. या प्रक्रियेत वेळोवेळी आलेल्या मोठ्या अडचणींतही ‘सेवा’ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. या सगळ्या प्रक्रियेत कष्टांशिवाय दुसरं काहीही माहीत नसलेल्या या स्त्रियांचं आयुष्य कसं बदललं, याचा आलेखच हे पुस्तक मांडतं. तेही वेगवेगळे व्यवसाय त्यात काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्यापुढचे प्रश्न, ‘सेवा’शी संपर्क आल्यानंतर प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा बदललेला दृष्टिकोन आणि या सगळ्या प्रक्रियेत झालेलं त्यांचं सक्षमीकरण हे मुळातून वाचण्यासारखं आहे. यातलं चिंध्या गोळा करणाऱ्या स्त्रियांचं उदाहरण ‘सेवा’च्या कामांचा आवाका समजायला पुरेसं आहे. अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांमधून टाकून दिल्या गेलेल्या कापडाच्या चिंध्यांवर उपजीविका करणारा एक मोठा समूह तिथे होता. मोठे व्यापारी कापडाचे उरलेले तुकडे, चिंध्या विकत घेत आणि दलालांमार्फत त्या चिंध्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब स्त्रियांपर्यंत पोहोचवत. या स्त्रिया त्या कापडांपासून, चिंध्यांपासून रजयांची खोळं शिवत. गिरण्यांमधून मिळणाऱ्या तेलकट चिंध्या धुवायच्या, वाळवायच्या, आपलंच मशीन, आपलाच दोरा, आपलीच जागा वापरून त्यापासून खोळ शिवायची. या सगळ्याच्या बदल्यात त्या स्त्रियांना अगदी नगण्य पैसे मिळत. काहीही न करता केवळ काम आणून देण्याच्या बदल्यात व्यापारी, दलाल भरपूर पैसे कमवत. आपली यात फसवणूक होते हे या स्त्रियांना समजत असे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना माहीत नव्हता आणि हे काम गेलं तर इतर काही काम मिळवण्याचं कौशल्यही त्यांच्याकडे नव्हतं. ‘सेवा’ने त्यांच्यात काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या समस्या समजून घेतल्या. सर्वेक्षण केलं. त्यांची नेमकी कशी फसवणूक होते ते त्यांच्याच लक्षात आणून दिलं. या स्त्रियांना आत्मविश्वास दिला. आवाज उठवायला शिकवलं. चिंध्या व्यापाऱ्यांशी बोलणी करायला लावली. कामगारमंत्र्यांना या प्रश्नाची दखल घ्यायला लावली आणि या स्त्रियांना योग्य मोबदला मिळवून दिला. पुस्तकात येणाऱ्या अनेक जणींच्या उदाहरणांतून ग्रामीण, असंघटित स्त्रियांना योग्य दिशा मिळाली तर त्या काय करू शकतात, त्यांच्यामधली ऊर्जा जागवणं हे किती महत्त्वाचं काम ‘सेवा’ ने केलं आहे याचं प्रत्यंतर येतं. ‘सेवा’ची ही सगळी यशोगाथा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहीत असते, पण त्यापलीकडे इतर क्षेत्रात ती माहीत असेलच असं नाही. ती माहीत मात्र करून घ्यायला हवी, कारण संघर्षात्मक आणि रचनात्मक काम अशा पद्धतीने सातत्याने करत राहणं आणि त्यात यशस्वी होणं ही एक खरोखरच अवघड गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात अशा कामांसाठी बचत गटाचा बांगलादेशी पॅटर्न आपल्याकडेही विकसित होत गेला आहे. पण असं काही नव्हतं तेव्हा ‘सेवा’ने आपल्या कामाला सुरुवात केली आणि ‘नाही रे’ वर्गातल्या स्त्रियांच्या बरोबरीने वाटचाल करत झळाळतं यश मिळवलं आहे. खरं तर यापेक्षाही असं म्हणायला पाहिजे की, या स्त्रिया ‘सेवा’बरोबर आल्या. त्यांनी वेळोवेळी संघर्ष केले आणि त्यांच्यामुळे ‘सेवा’ घडत गेली. या स्त्रिया म्हणजेच ‘सेवा’ आणि सेवा म्हणजेच या स्त्रिया असं हे समीकरण आहे. या सगळ्या कामासाठी ‘सेवा’ला आणि इला भट्ट यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. ‘वुइ आर पुअर बट सो मेनी’ हे इला भट्ट यांनी लिहिलेलं पुस्तक आलं २००६ मध्ये आणि अलीकडे त्याचा मराठी अनुवाद आला आहे. आज सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या कामांचं एनजीओकरण झालं आहे. त्याआधीच्या काळातली संघर्षात्मक आणि रचनात्मक सामाजिक कामं कशी चालत, याचं हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाचा हा अलौकिक प्रयोग वाचायलाच हवा असा आहे. सुनीती काणे यांनी या पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more