* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T READ MAPS
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184980301
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"WHY MEN DON`T LISTEN AND WOMEN CAN`T READ MAPS` THE TITLE OF THIS BOOK WRITTEN BY ALLAN AND BARBARA PEACE IS ITSELF SELF-INTRODUCTORY SO THERE IS NO NEED TO TELL YOU ABOUT THE THEME OF THE BOOK. BUT SPECIAL FEATURE OF THIS BOOK IS THE HANDLING OF THEME. THE LANGUAGE OF THE BOOK AND EXAMPLES THEREIN ARE VERY WITTY AND COMIC. THE FUNDAMENTAL PROBLEM IS MEN AND WOMEN ARE DIFFERENT. NOT BETTER OR WORSE, JUST DIFFERENT. SCIENTISTS, ANTHROPOLOGISTS AND SOCIOBIOLOGIEST HAVE KNOWN THIS FOR YEARS BUT THEY HAVE ALSO BEEN PAINFULLY AWARE THAT TO EXPRESS THIS KNOWLEDGE PUBLICLY IN SUCH A POLITICALLY CORRECT WORLD COULD TURN THEM INTO SOCIAL PARIAHS. SOCIETY TODAY IS DETERMINED TO BELIEVE THAT MEN AND WOMEN POSSESS EXACTLY THE SAME SKILLS, APTITUDES AND POTENTIALS JUST AS SCIENCE IRONICALLY IS BEGINNING TO PROVE THEY ARE COMPLETELY DIFFERENT. THIS BOOK IS DEDICATED TO ALL MEN AND WOMEN WHO HAVE EVER SAT UP AT 2 A.M. PULLING THEIR HAIR OUT AS THEY PLEAD WITH THEIR PARTNERS. ""BUT WHY DON`T YOU UNDERSTAND` PARTNERS CAN`T ANSWER THIS BUT WE THE WRITERS HAVE ANSWERED THIS QUESTION IN THIS BOOK. RELATIONSHIPS FAIL BECAUSE MEN STILL DON`T UNDERSTAND WHY A WOMEN CAN`T BE MORE LIKE A MAN AND WOMEN EXPECT THEIR MEN TO BEHAVE JUST LIKE THEY DO. NOT ONLY WILL THIS BOOK HELP YOU TO GRIP THE OPPOSITE SEX, IT WILL HELP YOU UNDERSTAND YOURSELF. AND HOW YOU BOTH CAN LEAD HAPPIER, HEALTHIER AND MORE HARMONIOUS LIVES AS A RESULT. MUST READ THIS BOOK.
स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. ह्याचे कारण म्हणजे, स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशींपासून बनलेले आहेत, एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात. त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे, पंथाचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #व्हायमेनडोन्टलिसनअ‍ॅण्डविमेनकान्टरीडमॅप्स #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHUBHADAVIDVANS #ALLANPEASEBARBARAPEASE "
Customer Reviews
  • Rating StarPriyanka Landage

    Good evening All my वाचनवेडा मित्रमैत्रिणींनो ..... आतापर्यंत बरीच पुस्तके वाचली . पण कोणत्या पुस्तकाबददल आवर्जुन लिहाव अस वाटल नाही . पण हे पुस्तक वाचल्यावर अस वाटल कि लोकानी हे पुस्तक वाचाव . हे पुस्तक वाचल्यावर आपल्या आयुष्यातील बऱ्याच प्रशनाची उत्तर आपोआप मिळतील. कारण यामध्ये सर्वाचा आवडीच्या विषयाचे विश्लेषण केलेल आहे . *तो म्हणजे* * स्त्री पुरुष याच्यातील नातेसंबंध* तर काय वाटत तुम्हाला ? का बरं बिघडत असतील त्यांच्यामधील नातेसंबंध ? याचे कारण म्हणजे पुरुषांना समजत नाही कि स्त्रिया त्याच्यासारख्या का नाहीत ? अन् स्त्रियांना वाटतेळी आपण जस जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत? याचे कारण म्हणजे ते दोघेही वेगवेगळे आहेत . अन् ते का व कसे वेगळे आहेत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तका मध्ये मिळतील . हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडेल . त्याचा / तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.😊 ...Read more

  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत,आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. याचे कारण म्हणजे,स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशीपासून बनलेले हेत,एवढी एकच गोष्ट त्यांच्या समान आहे.पण हे दोघे वेगळ्या जगात राहतात.त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात.पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे पंथाचे वर्णाच्या असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात. या पुस्तकात-बायका का जास्त बोलतात, पुरुष का बोलत नाहीत अशा वेगवेगळ्या बाबींनवर या पुस्तकात माहिती दिली आहे. ...Read more

  • Rating StarVijaykumar Chougle

    Why Men don`t listen and Women can`t read Maps ~~~~Allan & Barbara Please व्हाय मेन डोन्ट लिसन अँड वूमन कानट रीड मॅप्स~~~~~अनुवाद Adv. शुभदा विद्वांस स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध का बिघडतात? पुरुषांना हे समजत नाही की स्त्रिया त्यांच्ासारख्या का नाहीत;आणि स्त्रियांना वाटत पुरुषांनी आपल्यासारखा वागावं. ह्याचे कारण म्हणजे स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत.ते समान पेशिंपासून बनलेले आहेत. एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. तुम्ही स्वतःला ओळखावं, तसच जोडीदाराच्या मनात काय चाललंय ते जानाव, ज्यामुळे तुमचे आपसातील नातेसंबंध आनंददायी व दृढ होतील. ह्या पुस्तकातून अनेक गुपीत तुम्हाला समजतील.ज्याचा तुम्हाला तुमचा पुढील आयुष्य सुफल, अधिक प्रेममय व जिव्हाळ्याचं करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. स्त्रियांची तक्रार--त्यांचे पुरुष सवेदनाशून्य आहेत.त्यांच्यामध्ये सहिष्णुता नाही.ते जास्त बोलत नाहीत, प्रेम करत नाहीत.... पुरुषांची तक्रार--मूळ मुद्दा सोडून भलतेच आणि खूप जास्त बोलतात, असे आणि अनेक.... स्त्रिया या मनकवड्या असतात.त्यांना समोरच्याच्या मनात काय चाललंय ते समजत. त्यासाठी त्यांना शब्दातून सांगण्याची गरज नसते.त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याला त्यांच्या मनातलं समजावं, तिच्या गरजा ओळखाव्यात पण तिची देहबोली तिचे इशारे काही त्याला समजत नाहीत.त्यामुळेच जगभरातील सर्व स्त्रिया पुरुषांना भावनाशून्य म्हणून संबोधतात. स्त्रिया एवढं का बोलतात? कारण त्यांच्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धात स्पीच सेंटर्स असतात. स्त्रियांना जास्त बोलण्याची गरज का असते? पुरुषांच्या मेंदूमध्ये अनेक कप्पे असतात आणि त्यात माहिती वेगवेगळी साठवून ठेवण्याची क्षमता असते. दिवसाच्या शेवटी सर्व समस्यांचे वर्गीकरण करून त्याचे फायलिंग झालेल असत. स्त्रियांचा मेंदू माहिती त्याप्रमाणे संकलित करत नाही. समस्या डोक्यामध्ये सतत ताक घुसळलयाप्रमाणे घुसळत राहतात. मग या संकटातून बाहेर पडण्याचा एकच उपाय त्यांच्याकडे उरतो, तो म्हणजे त्या समस्या विषयी इतरांशी बोलणं. त्यांना त्याची माहिती करून देणे आणि त्याच वेळी त्यांना कोणाकडून त्या समस्यांचा शेवट किंवा त्याच्यावर तोडगा नको असतो. स्त्रियांसाठी बोलणं म्हणजे एकमेकांशी नात जुळवण तर पुरुषांसाठी बोलण म्हणजे घटना सांगण. एकमेकांच्या दोषांवर पांघरुण घालण्यातच शहाणपणा आहे आपण सगळेच सगळ्या गोष्टीत हुशार नसतो. त्यांन फारस बिघडत नाही. सरावान गोष्टी येतात पण तेवढ्यासाठी आपल किंवा जोडीदाराच आयुष्य बरबाद करु नये. स्त्रीया नातेसंबंधात असंतुष्ट राहिल्या तर त्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि पुरुष जर कामाच्या ठिकाणी असंतुष्ट राहिला तर तो त्याच्या नातेसंबंधाला न्याय देऊ शकत नाही. स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळ्या संघटनांचे सदस्य आहेत. हा फरक लक्षात घेणं, समजून घेण गरजेचे आहे तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेऊ शकाल. तिला प्रेम, प्रणय आणि संवाद हवा असतो. त्याला मात्र बायकोकडून असा विश्वास हवा असतो की तो यशस्वी आहे आणि ती तो जे काही देतो त्यावर खुश आहे. पण त्यांन रोमँटिक असणे गरजेच असत. आणि मुख्य म्हणजे ती जे बोलते ते काळजीपूर्वक कुठलेही उपाय न सुचवता ऐकणे गरजेच असत. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नातेसंबंधावर प्रकाश टाकणारे पुस्तक… पुरूष आणि स्त्री हे भिन्न आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ नाही, फक्त भिन्न! शास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सगळ्यांना हे अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण सध्याच्या स्त्री पुरूष समानता, स्त्री शक्ति, स्त्री-मुक्ति्या जगात याबद्दल कसे बोलावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्त्री आणि पुरूष वेगळे आहेत. हे फरक समाजावून घेण्यामागे एकमेकांमधील दोषांवर टीका न करता त्यांच्यातील बलस्थाने शोधून काढून एक सुदृढ, सशक्त समाज निर्माण करणे हा हेतू आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी तीन वर्षांचा अवधी व चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास लेखकद्वयीला करावा लागला. संपूर्ण जग पालथे घातले. हे पुस्तक आव्हानात्मक तर कधी धक्कादायकसुद्धा वाटेल. पण मनाला लुभावणारे. नातेसंबंध का बिघडतात तर पुरूषांना समजत नाही, की स्त्रिया त्यांच्यासारख्या का नाहीत आणि स्त्रियांना वाटते पुरूषांनी आपल्यासारखे वागावे हा घोळ मिटविण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच. अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्ट सेलर ठरली. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये अनुवादित होऊन शंभर देशातील वाचकांपर्यंत पोहोचले. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी दोघेही भरपूर मेहनत घेतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात. अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी मूळ पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पहिले प्रकरण आहे ‘समानतेतून भिन्नता’ समान पेशीपासून निर्माण झालेले स्त्री-पुरूष कसे भिन्न आहेत हे अतिशय साध्या, सोप्या, खुमासदार शैलीतून नजरेस आणून दिले आहे. पूर्वी जीवन-संघर्ष अवघड होता, पण नातेसंधंब सुरळीत आणि सोपे होते. पण आता आधुनिक जगात सर्व नियम धाब्यावर बसवल्यापासून खूप गोंधळ, संभ्रम आणि दु:ख वाट्याला आले. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या आणि ते घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले, तरी त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. दुसरे प्रकरण आहे ‘दृष्टी व दृष्टिकोन.’ स्त्री व पुरुष यांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते इथे सांगितले आहे. पुरुषांची रंगांधता तसेच त्यांची ‘टनेल व्हिजन’ तर बायकांची ‘पेरिफेरल व्हिजन’ यामुळे कशा गमती-जमती घडतात ते वाचायला मिळते. बायका ऐकलेल्या गोष्टीचे वर्णनसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर असल्यासारखे करतात व पुरुष प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत. स्त्री-पुरुषांची निरीक्षणशक्ती कशी भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे वर्णन यामध्ये येते. बायका मनकवड्या असतात, पण पुरुषांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही. ‘सार काही मनाच्या गाभाऱ्यात’ या तिसऱ्या प्रकरणात स्त्री व पुरुष यांचा मेंदू आकाराने कसा लहान-मोठा आहे, तरीही स्त्रियांची बुद्धिमत्ता तीन टक्क्यांनी कशी जास्त आहे याचे शास्त्रशुद्ध पुरावे दिलेले आहेत. या प्रकरण्याच्या शेवटी वाचकांसाठी जी प्रश्नावली दिली आहे, ती सोडवताना नक्कीच मजा येईल. चौथे प्रकरण आहे,‘बोलणं आणि ऐकणं’ बायकांना बोलणे आवडतेच. पुरुष मात्र मनाशीच बोलतात. बायका किती जास्त बोलतात, तर पुरुष कसा मुखदुर्बल असतो हे विनोदी प्रसंगातून व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रसंगात पुरुषचा चेहरा कसा स्थितप्रज्ञ असतो आणि बायका भावनांच्या प्रत्येक छटा कशा दर्शवतात याचे सचित्र वर्णन हे. पुरुष मनातल्या मनात कसे बोलतात, तर बायका विचारसुद्धा मोठ्याने करतात यातील विरोधाभास पहावयास मिळतो. पाचवे प्रकरण ‘पुरुषांच्या विशेष क्षमते’ बद्दलचे. ती त्याला मिळालेली देणगी आहे. जी सामान्य स्त्रियांना आत्मसात करणे शक्य नसते. ‘विचार, भावना, दृष्टिकोन आणि इतर संभाव्य संकट’ या सहाव्या प्रकरणात पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे का रिअ‍ॅक्ट होतात याचे शास्त्रीय विवेचन विनोदी ढंगानी केले आहे. पुरुष भावना गिळून टाकतो तर स्त्री त्या भावना चघळत बसते़ ‘आपला केमिकल लोचा’ या सातव्या प्रकरणात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहिती वाचायला मिळते. आपल्या शरीरात जी संप्रेरके स्त्रवतात ती माणसांवर कशी गारुड घालतात याचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. ‘मुलं ही मुलं’ च असतात या आठव्या प्रकरणात काही कटु सत्यांना सामोरे जावे लागते, तर नवव्या प्रकरणात ‘पुरुष, स्त्री व प्रणय’ यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या कोणत्या गोष्टीना किती महत्त्व देतात व प्रत्यक्षात त्यांचे समज काय असतात हे उगते. ‘लग्न, प्रेम आणि प्रणय’ हे या पुस्तकातील दहावे प्रकरण आणि ‘सद्य: परिस्थितीकडे’ हे अकरावे व शेवटचे प्रकरण. आजच्या पुरुषासाठी आजही काहीच बदललेले नाही. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा प्रधान्यक्रम हा त्यांच्या आईपेक्षा व आजीपेक्षा बदललेला दिसतो. अनेक बायकांनी त्यांची व्यावसायिक करिअर निवडलेली आहे. शास्त्र सांगते की, करिअरमुळे बायकांनाही पुरुषांचे आजार, ह्य्दयविकार, ताणतणाव, अल्सर्स व अकाली निधन या समस्या भेडसावू लागल्या आहेत. थीन स्त्रीयांमधील एक वर्षातून किमान नऊ दिवस केवळ ताणतणावामुळे रजा घेताना दिसते. सर्व्हे केला तेव्हा लक्षात आले की, स्त्रीमुक्तीचे वारे वाहूनसुद्धा बायकांचे प्राधान्य आपल्या मुलांना चांगल्या, परंपरावादी कौटुंबिाक वातावरणात वाढवण्याला आहे. फरक एवढाच की आजच्या स्त्रीला आर्थिक परावलंबित्व नको आहे. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहणे पसंत नाही. तरीही आपले शरीर जराही बदललेले नाही. इस्त्राएलमध्ये एक प्रयोग केला. मुलांना कपडे, बूट, त्यांची हेअरस्टाईल, लाईफ स्टाईल मुले-मुली भेद न करता समान दिली. पण झाले काय? नव्वद वर्षांनीसुद्धा मुलांची आक्रमकता, उद्धट वर्तन, सत्तेसाठी झगडा मारामारी कमी झाली नाही. उलट सहकार्य करणे, प्रेमळ वृत्ती, शेअरिंग आजही मुलींमध्ये दिसते. थोडक्यात हे पुस्तक वाचल्याने अनेक कोड्यांची उत्तरे मिळतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more