* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9789353170950
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 736
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : COMBO SET
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HAMLET, ROMEO AND JULIET, KING LEAR, AND THE TEMPEST ARE NOT JUST PLAYS, BUT IMMORTAL PIECES OF LITERATURE BY ONE OF THE GREATEST PLAYWRIGHTS TO HAVE EVER LIVED, WILLIAM SHAKESPEARE. THIS SERIES PRESENTS A THOUGHTFUL SELECTION OF TWENTY-TWO PLAYS BY SHAKESPEARE, WHICH HAVE BEEN SUITABLY ABRIDGED AND UPDATED FOR YOUNG READERS. THE ADAPTED NARRATIVE STYLE IS ACCESSIBLE, AND COUPLED WITH UNIQUE ILLUSTRATIONS THAT WILL ENGAGE CHILDREN AND SUPPORT THEM AS THEY BEGIN THEIR JOURNEY OF READER DEVELOPMENT AND LITERARY INTEREST.
जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. शोकांतिका, सुखांतिका आणि एतिहासिक नाटकांचे तीन प्रकार शेक्सपिअरनी नाटकांसाठी वापरले. त्यात शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष गाजल्या. शेक्सपिअरनं जागतिक रंगभूमीला नवे आयाम दिले. चारशेहून अधिक वर्षे जागतिक साहित्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या साहित्यिकाची कुमारांना ओळख व्हावी , यासाठी शेक्सपिअरची नाटकं या मालिकेत विशेष शैलीत सादर करण्यात आली आहेत. शेक्सपिअरच्या बावीस लोकप्रिय नाटकांचा यात समावेश आहे. अ मिडसमर नाइट्स ड्रीम, अ‍ॅज यू लाइक इट,ट्वेल्थ नाइट,द टू जेन्टलमेन ऑफ व्हेरोना सारखी कल्पनारम्य नाटके, ऑथेल्लो,किंग लियर,मॅकबेथ,रोमियो अ‍ॅन्ड ज्यूलिएट,हॅम्लेट सारख्या शोकांतिका आणि द टेंप्टेस्ट, द विंटर्स टेल,सिंबेलाईन सारखी सौंदर्यवादी नाटके यात समाविष्ट आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 07-04-2019

    विश्वविख्यात साहित्यिकाचं विविधरंगी कथाविश्व... विल्यम शेक्सपिअर – विश्वविख्यात नाटककार आणि कवी. आज एकविसाव्या शतकातही त्याच्या साहित्याचं गारूड वाचकांच्या मनावर कायम आहे. शेक्सपिअरने दु:खांतिका आणि सुखांतिकाही लिहिल्या. त्याच्या दु:खांतिकांमधून मानी जीवनातील दु:खाची अटळता त्याने नाट्यमय रीतीने अधोरेखित केली. त्यामुळे त्याच्या दु:खांतिकांनी जागतिक साहित्यात इतिहास घडवला. अशा या विश्वविख्यात साहित्यिकाच्या साहित्यकृती कथारूपात मराठीत आणण्याचं श्रेय जातं मेहता पब्लिशिंग हाऊसकडे. शेक्सपिअरच्या साहित्यावर आधारित कथांची तब्बल बावीस पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसने बाल/ कुमार वाचकांच्या भेटीसाठी आणली आहेत. या पुस्तकांचा अनुवाद केला आहे मंजूषा आमडेकर यांनी. ‘अ मिडसमर नाईट्स ड्रीम’मध्ये जंगलात गेलेले चार प्रेमिक, तिथे परीराज्यातील राजाराणीशी झालेली त्यांची भेट आणि त्यांच्याशी भेट झाल्यानंतर या प्रेमिकांच्या विश्वात उडालेला गमतीदार गोंधळ, याचं अतिशय खुसखुशीत चित्रण केलं आहे. ‘ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल’ या सुखान्तिकेमधून अनाथ हॅलेना आणि सरदाराचा मुलगा बट्र्राम यांची प्रेमकहाणी सामोरी येते. रोमन जनरल अँटोनी इजिप्तची राणी क्लिओपात्राच्या प्रेमात पडतो. प्रेम आणि साम्राज्याची जबाबदारी यांच्यात सुरू असलेली अँटोनीच्या कसरतीचं कथारूपात चित्रण केलं आहे ‘अँटोनी आणि क्लिओपात्रा’मध्ये. ‘अ‍ॅज यू लाइक इट’मध्ये हद्दपार ड्यूकची मुलगी रोझलिंड आणि ओरलँडो यांच्यातील नाजूक भावबंधांचं विलक्षण दर्शन घडतं. ‘सिंबलिन, किंग ऑफ ब्रिटन’ ही युद्ध आणि होरपळीच्या धाग्यात विणलेली, सिंबलिनची मुलगी इमोजन आणि पोस्थुमससचीr प्रेमकहाणी आहे. ‘हॅम्लेट, प्रिन्स ऑफ डेन्मार्क’ म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या हॅम्लेटची दु:खान्तिका आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरच्या ‘हेन्री फाइव्ह’ मध्ये इंग्लंडचा बेताल राजकुमार आदर्श राजा कसा होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण आहे. ‘ज्यूलियस सीझर’मध्ये ज्यूलियस सीझर या रोमन लोकशाहीच्या सिनेटमधल्या शूर आणि तडफदार सिनेटरचा काही सिनेटर्स खून करतात. सीझरचा परममित्र अँटोनी खुन्यांचा सूड घेऊन रोममध्ये लोकशाही आणतो; पण अंतर्गत दुफळीमुळे ती लयाला जाते, असं कथानक आहे. ‘राजा लिअर’मध्ये ब्रिटनच्या स्तुतिप्रिय लिअर राजाची कथा आहे. त्याच्या तीन मुलींपैकी त्याची स्तुती करणाऱ्या दोन मुलींना तो सगळी संपत्ती देऊन टाकतो आणि स्तुती न करणाऱ्या मुलीला काहीच देत नाही; संपत्ती मिळालेल्या दोन्ही मुली त्याला चांगली वागणूक देत नाहीत आणि जिला लिअरने काहीच दिलेलं नसतं, ती मुलगी त्याला मदत करते. ‘मच अ‍ॅडो अबाउट नथिंग’मध्ये मसिनाचा गव्हर्नर लिओनाटोची मुलगी हेरो आणि तिचा प्रेमिक क्लाउडिओ यांच्यात गैरसमज झाल्यामुळे ते दुरावतात आणि नंतर ते कसे एकत्र येतात, याचं चित्रण आहे. ‘ऑथेल्लो’ हे शेक्सपिअरचं प्रभावशाली नाटक. ऑथेल्लो आणि डेस्डिमोनाच्या प्रेमाचं विवाहात झालेलं रूपांतर, डेस्डिमोनाबद्दल ऑथेल्लोच्या मनात निर्माण झालेला संशय आणि त्यातून उभं राहिलेलं सूडनाट्य...असा या कथानकाचा प्रवास होतो. ‘राजा रिचर्ड’ म्हणजे शेक्सपिअरनं रंगवलेला क्रूर खलनायक. त्याच्या स्वगतातून हे कथानक फुलत जातं. त्याच्या क्रूरतेला विनोदाची झालर लावलेली असल्यामुळे कथानकात रंगत येते. शेक्सपिअरच्या रोमॅन्टिक नाटकांपैकी सर्वाधिक गाजलेलं नाटक ‘रोमियो अँड ज्युलिएट.’ इटलीतल्या वेरोना शहरातल्या सरदार घराण्यांमधील रोमियो-ज्युलिएट एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्या दोघांच्या घराण्यांमध्ये असलेल्या कट्टर वैराला ते बळी पडतात. जगभरातल्या सिने-नाट्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेलं शेक्सपिअरचं नाटक ‘द कॉमेडी ऑफ एरर्स.’ सरॅकसचा वृद्ध व्यापारी एगॉन, त्याची जुळी मुलं आणि त्यांचे जुळे नोकर नाटकात एकच धमाल उडवून देतात. ‘अंगूर` नावाचा धमाल हिंदी विनोदी चित्रपट याच नाटकावरून बेतला गेला आहे. ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ ही कथा आहे शायलॉक या अत्यंत दुष्ट आणि लबाड ज्यू सावकाराची. पोर्शिया नावाची तरुणी शायलॉकचे दात त्याच्याच घशात घालून, त्यानं स्वत:च विणलेल्या जाळ्यात त्याला कशी अलगद अडकवते, याचं रंगतदार चित्रण या कथेमध्ये केलं आहे. ‘द टेमिंग ऑफ द श्रू’ या शेक्सपिअरच्या खुसखुशीत, गमतीदार विनोदी नाटकात कॅथेरीन या आगाऊ, उद्धट आणि कजाग मुलीला पेट्रूशिओ नावाचा तरुण समजंस बायको बनवायचा निश्चय करतो आणि त्याच्या या प्रयत्नात घडलेल्या अनेक गमतीदार प्रसंगांचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. आपल्या भावाकडून फसवला गेलेला प्रॉस्पेरो आणि त्याची लहान मुलगी, मिरांडा एका जादुई बेटावर पोहोचतात. एरिएल या आत्म्यांच्या प्रमुखाच्या मदतीनं प्रॉस्पेरो आपला विश्वासघात करणाऱ्यांना अद्दल घडवतो आणि आपलं राज्य परत मिळवतो, असं कथानक आहे ‘द टेम्पेस्ट’चं. तीन चेटकिणींच्या भविष्याच्या प्रभावाखाली क्रौर्य आणि सत्तालालसेची परिसीमा गाठलेल्या लॉर्ड मॅकबेथची कथा आहे ‘द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ.’ गहन, गूढ घटनाक्रम आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे ही कथा विशिष्ट उंची गाठते. ‘द टू जंटलमन ऑफ व्हेरोना’ची कथा रोमॅन्टिक, विनोदी आहे. प्रोटियस आणि व्हॅलेंटाइन हे दोन जिवलग मित्र असतात. त्यांच्यातल्या मैत्रीत दरी निर्माण होते. ज्युलियाच्या प्रेमात असणारा प्रोटियस व्हॅलेंटाइनची प्रेमिका सिल्व्हियाच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या प्रेमात दरी निर्माण करतो; पण ज्युलिया आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी युक्तीचा वापर करते. ‘द विंटर्स टेल’ ही कथा आहे सिसिलीचा राजा लिओन्टेस याची. आपली बायको आणि आपल्या परम मित्राविषयी राजा संशय घेतो. त्याच्या या संशयी वृत्तीमुळे सगळ्यांच्याच आयुष्याची धूळधाण होते. ‘टिमॉन ऑफ अथेन्स’ - टिमॉन हा अथेन्समधला श्रीमंत माणूस आपल्या मित्रांवर आणि गरजूंवर पैशाची उधळण करून एक दिवस कफल्लक होतो. त्यानंतर इतके दिवस त्याच्या जिवावर मजा मारणारे सगळेजण त्याला टाळायला लागतात. हताश झालेला टिमॉन सरळ जंगलात निघून जातो. त्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जातो. ‘ट्वेल्थ नाईट` ही एक हलकीफुलकी मजेदार प्रेमकथा आहे. सरदार घराण्यात जन्मलेली व्हिओला आणि तिचा जुळा भाऊ सेबॅस्टिन एका जहाजातून प्रवास करत असताना ते जहाज फुटतं. त्यांची ताटातूट होते. व्हिओला आयलिरियाच्या ड्यूकचा नोकर बनून मुलाच्या रूपात वावरू लागते. आणि ड्यूकचं जिच्यावर प्रेम असतं ती ऑलिव्हिया मुलाचा वेष धारण केलेल्या नोकराच्या प्रेमात पडते आणि एकच गोंधळ उडतो. तर असं हे शेक्सपिअरचं कथाविश्व विविधरंगी, विविधढंगी व्यक्तिरेखांनी गजबजलेलं आणि जीवनाभिमुख आहे. त्याच्या सुखांतिकांमधून प्रसन्नतेचे तुषार उडतात, तर दु:खांतिकांमधून मनोवेदनेचे डोंब उसळतात. या कथांमधील घटना आणि व्यक्तिरेखांना साजेशी पावडर शेडिंगमधली चित्रं, हे या पुस्तकांचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावं लागेल. शेक्सपिअरचा कल्पनाविलास आणि त्याचं माणसाच्या अंतर्मनात शिरण्याचं सामर्थ्य या कथांमधून जाणवत राहतं. राजा-राणी, पऱ्या त्याच्या या कथांमध्ये आहेत, पण इतर बालकथांपेक्षा वेगळ्या स्वरूपात त्या भेटतात. शेक्सपिअरची नाटकं अनेक भाषांमध्ये भाषांतरित/रूपांतरित झाली; पण त्याच्या कथा भाषांतराच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिल्या. त्या कथा आता या बावीस पुस्तकांच्या निमित्ताने बाल/कुमार वाचकांसमोर आल्या आहेत. मंजूषा आमडेकर यांचा अनुवादही सरस झाला आहे. शेक्सपिअरसारख्या जगत्विख्यात साहित्यिकाची ओळख इतक्या उत्तमोत्तम कथांमधून बाल/कुमार वाचकांना होणार आहे. माणसाच्या स्वभावाच्या विविध छटांचं दर्शन घडविणाऱ्या या कथा बाल/कुमार वाचकांचं मनोरंजन तर करतीलच; पण त्यांना मार्गदर्शकही ठरतील, असं वाटतं. तेव्हा या महान साहित्यिकाच्या या साहित्यकृती बाल आणि कुमारांबरोबरच मोठ्यांनीही अवश्य वाचाव्या अशा आहेत. –अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more