* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY HAS WANDERED IN MANY REMOTE AND ECONOMICALLY BACKWARD PLACES IN INDIA. SHE HAS WALKED OVER TO DEPTHS AT THESE PLACES, SHE HAS TRAVELLED BY THE PUBLIC TRANSPORT. SHE HAS TRIED HER LEVEL BEST TO TAKE THE MEDICAL FACILITIES TO THE DOORSTEPS OF THESE NEGLECTED AND NEGLIGENT PEOPLE. HER WORK HAS GIVEN HER THE OPPORTUNITY TO MIX WITH MANY NOBLE PEOPLE FROM THE VARIOUS SECTORS OF SOCIETY. SHE HAS MET THE BEGGAR`S FAMILY FROM MUMBAI WHO WENT TO SETTLE DOWN IN GUJARAT WHERE THE EARTHQUAKE HAD LEFT EVERYONE IN CHAOS. SHE HAS MET THE MOTHER OF A GIRL WHO WAS KILLED FOR THE DOWRY. SHE HAS COME ACROSS THE UNKNOWN DONOR WHO HAS DONATED A HUGE AMOUNT BY CHEQUE. SUDHA MURTI`S LIFE IS MATURED TODAY WITH THE MEETINGS WITH SUCH VARIOUS PEOPLE WITH THEIR UNIQUE THOUGHTS, PHILOSOPHIES AND FEELINGS. SHE HAS PRESENTED HER EXPERIENCES AS A PROFESSOR AND AS A SOCIAL WORKER. THIS BOOK HAS A VERY SIMPLE AND HOMELY LANGUAGE THAT OF ANY COMMON PERSON, YET IT PRESENTS THE PERFECT PICTURE OF SUDHA MURTI`S WORK AND PHILOSOPHY IN DETAIL.
आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAnand Saraikar

    #वाइज #अँडअदरवाइज -------------------------------------------- काही व्यक्तींवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो तर काही व्यक्तींवर सरस्वती ची कृपादृष्टी असते...परंतु जगात अशा मोजक्याच व्यक्ती असतात ज्यांच्या हातात लक्ष्मी आणि हृदयात सरस्वती निवास करत असे. भांडवलदार असूनही मनात जर समाजसेवेची आवड असेल तर कमावलेली पै नी पै ही धन्य होत असेल, कारण लक्ष्मीलाही ठाऊक असते की आपण सत्पात्री पडलो आहोत. सुधा मूर्ती या अशाच विदुषी. इन्फोसिस या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीच्या त्या पतीसह भागीदार. त्या स्वतः M.Tech Computer science आहेत. त्याच बरोबर त्या प्राध्यापिका सुद्धा होत्या. प्राध्यापिका म्हणण्यापेक्षाही त्या कनवाळू,सह्रदय शिक्षिका ... वडील डॉक्टर असल्याने समाज सेवेचे बाळकडू लहानपणीच मिळालेले, समाजाकडून मिळालेले काही अंशी समाजाकडे गेले पाहिजे ही विचारसरणी मनात पक्की रुजलेली त्यामुळे इन्फोसिस फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी संस्था उभारली गेली नसती तर नवल वाटले असते. इन्फोसिस फाऊंडेशन ही विद्यार्थी, आदिवासी, आणि इतर गरजवंताना आर्थिक आणि वस्तु स्वरुपात मदत करणारी संस्था. अर्थात मदत देण्याचेही काही निकष असतात, आणि ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या सदसद्विवेक बुद्धिला जे पटेल त्यांना सुधाताई इमाने इतबारे मदत पोहोचवत असतातच....मुळात हे खरेखुरे अनुभव असल्याने समाजाचा खरा चेहरा आपल्या पुढे उघड करण्याचे काम त्या खुबीने करतात...आता विना रंगरंगोटी खरा चेहरा हा प्रत्येक वेळी विलोभनीय कसा असू शकेल...हे माहीत असूनही आपण कित्येक वेळा चकित होतो, हताश होतो आणि निराशही होतो.तुम्ही मला मदत करा नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी देणारा याचक(?), शेअर बाजारात पैसे बुडाले म्हणुन पाच कोटींची मदत मागणारी एक महाभाग स्त्री ... स्वतः च्या वडिलांना अनाथ म्हणून ऑफिस मधे आणून सोडणारा आणि त्यांच्या मृत्यूनंतर खरी ओळख सांगून बँक खात्यावर वारसा हक्क सांगणारा आधुनिक श्रावण... ज्या विद्यार्थ्यांला मदत केल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकलेला डॉक्टर जेव्हा त्यांच्याकडून फीसची मागणी करतो .. या आणि अशाच अनेक हृदयद्रावक हकिकती वाचताना एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो माणुस असा का वागतो...?सामाजिक कार्य करत असताना आलेल्या अशाच कटू गोड अनुभवाचा मिश्किल आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या शैलीत मांडलेला लेखाजोखा म्हणजेच #वाइजअँडअदरवाइज हे पुस्तक होय. #डॉ.#आनंद #सराईकर ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    वाइज अँड अदरवाईज अतिशय छान पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विशाल महानता कळते. 204 पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे 51 कथा आहेत. आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो .प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची णि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.सुधा मूर्ती वाइज अँड अदरवाइज गोष्टी अनुभवाच्या त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकतमोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन ते शिकतात. वाइज अँड आदर वाईज एक प्रसिद्ध पुस्तक! भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य! आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना! त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच! जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते! "इन्फोसिस फाऊंडेशन" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान! त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते! त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! खरंच आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो. ...Read more

  • Rating StarDARSHANA CHAPHEKAR

    इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना `द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं रत असणार्‍या या लेखिकेने `द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे `तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन `इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे. ...Read more

  • Rating StarLaxmikant Kulkarni

    थोडंसं जगणं समाजासाठी..! हे जरी खरे असले तरीपण "जगणंच फक्त समाजांसाठी" हे स्वतःच्या आचरणाने दाखवून देणाऱ्या अन असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या आणि असामान्य काम करणाऱ्या गोरगरीब,होतकरू आणि कित्येक निराधारासाठी आधारवड असणाऱ्या अम्मा म्हणजेच सुधा मूर्ी..! खरंच अशाच ठिकाणी "कर माझे जुळती " वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्तृत्ववान महाराणी..! प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल..! - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे..! आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय..! शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि "उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे..! :-खूप काही शिकण्यासारख्या..! सलाम सुधा मूर्ती यांना..! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more