WITHIN A MOMENT BAISA HUGGED HIM. RADHO SNUGGLED INTO HER EMBRACE AND A WAVE OF COMPASSION FILLED HER MIND. HIS TOUCH BROUGHT BACK MEMORIES OF SO MANY AROMAS. AROMA THAT WENT BEYOND COLLAPSE OR SUPPORT – IT WAS THE AROMA OF A LIFE OF FUTILITY AND LONELINESS… THE AROMA OF DAMP, OLD CLOTHES KEPT IN A TRUNK IN THE DARK ATTIC…BAISA WHO HAD NEVER EXPERIENCED THE TENDER FEEL OF A BABY’S SKIN, DRAGGED HER MIND OUT OF ITS DARK RECESSES. HER GAZE SETTLED ON RADHO, WITH THE SAME CURIOSITY WITH WHICH ONE GAZES AT AN INNOCENT NEWBORN…
एका क्षणात बाईसानं त्याला कवेत घेतलं. त्यांच्या कुशीत राधो शिरला, आणि बाईसांचं मन मायेच्या पहिल्या आवेगानं भरून गेलं. त्या स्पर्शासरशी कितीतरी वास त्यांच्या मनात जागे झाले होते. ते कोसळणं किंवा आधार देणं याच्यापलीकडे त्यांच्या अनाथपणाच्या साधम्र्यानं त्यांच्या व्यथित आयुष्याचा वास... अंधा-या माजघरातल्या पेटीतल्या कपड्यांचा वास... कोवळ्या जिवाची कातडी कधीही न भोगलेल्या बाईसांनी माजघरातून मन ओढून काढलं. सवयीनं आणि निष्पाप नवजात बालकाकडे कुतूहलानं पाहावं, तसं त्या राधोकडे पाहू लागल्या.