* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YODDHA SHASTRADNYA RASHTRAPATI A. P. J. ABDUL KALAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664072
  • Edition : 16
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN DR. KALAM WAS ELECTED AS THE PRESIDENT OF INDIA, WE INDIANS WERE IMMENSELY PROUD. A SCIENTIST FAMOUS WORLDWIDE WAS GOING TO BE THE PRESIDENT NOW. THE MERE THOUGHT WAS MESMERIZING. AFTER THE GREAT PHILOSOPHER DR. SARVAPALLI RADHAKRISHNAN; DR. KALAM WAS GOING TO CHAIR THE PRESIDENTSHIP. OUR POLITICAL LEADERS HAD GIVEN US A WONDERFUL GIFT, A PLEASANT SURPRISE. DR. KALAM CHAIRED THE POST FOR ONE YEAR. THROUGHOUT HIS TENURE HE MAINTAINED A SIMPLE LIVING AND HIGH THINKING. HIS WORKING WAS DEVOID OF POMP AND SHOW. HE SOUGHT DISCIPLINE IN EVERYTHING HE PRACTISED. HE ALWAYS SOUGHT A BRIGHT FUTURE FOR INDEPENDENT INDIA. TO FULFILL HIS DREAM HE WOULD ALWAYS ENCOURAGE THE YOUTH AND STUDENTS OF INDIA. TO ACCOMPLISH THIS MISSION, HE ENTHUSIASTICALLY TRAVELLED THROUGHOUT INDIA AND REACHED ALL THE NICHES AND CORNERS. DURING EACH OF HIS PROGRAMS HE SPECIFICALLY RESERVED SOME TIME SLOT ESPECIALLY FOR THE YOUTH AND SCHOOL CHILDREN. AT TIMES, HE DID NOT HESITATE TO KEEP THE POLITICAL DECORUM AT BAY. HIS PERSONALITY WAS A HARMONIOUS COMBINATION OF SCIENTIFIC AND PHILOSOPHICAL MIND INTERWOVEN WITH PRIDE FOR INDIA. HE WAS EXTREMELY AWARE OF THE CURRENT SCENARIO. AN IN DEPTH STUDY OF HIS BIOGRAPHY WILL SURELY HELP THE YOUTH OF INDIA. ONE CAN INCULCATE AS MANY GOOD QUALITIES FROM IT AS POSSIBLE. HE HAD SEEN A DREAM; HE HAD DEVELOPED A VISION TO WHICH WE ALL CAN CONTRIBUTE. THIS BOOKS AIMS AT THAT.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी निवड करण्यात आली आणि सारा देश कधी नव्हे इतका हरखून गेला. एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ, संशोधक देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार ही कल्पनाच एका परीने अद्भुतरम्य होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या एका थोर तत्त्वज्ञानंतर - डॉ. कलाम राष्ट्रपतीपद भूषवणार होते. राजकीय नेतृत्वाने भारतीयांना दिलेला तो एक अनपेक्षित आणि तरीही सुखद असा धक्काच होता. आपल्या एका वर्षाच्या कारकिर्दीत डॉ. कलाम यांनी त्या पदाची शान वाढवली होती. कसलाही डामडौल, दिमाख न दाखवता, ते स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी ते तरुणांना, विद्याथ्र्यांना अगदी मनोमन प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी ते सा-या देशभर मोठ्या उत्साहाने संचार करत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते खास तरुणांसाठी, शाळकरी मुलांसाठी आवर्जून वेळ काढत आहेत. प्रसंगी राजनैतिक शिष्टाचार गुंडाळून ठेवत आहेत. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वात शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व स्वदेशाभिमान यांचा सुरेख संगम आढळतो. त्यामागचे कारण एकच आहे. ते म्हणजे, त्यांनी सांप्रतच्या परिस्थितीचे ठेवलेले अचूक भान, शास्त्र काट्यावर तोलून घेतलेले आहे. देशातील समस्त तरुण-तरुणींनी त्यांच्या चरित्राचा लक्षपूर्वक वेध घेण्याची गरज आहे. त्यावरून जेवढा बोध घेता येईल, तेवढा जरूर घ्यावा. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीतील आपले योगदान निश्चित करावे. हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #माधवमोर्डेकर # MADHAVMORDEKAR #योद्धाशास्त्रज्ञ : राष्ट्रपतीए.पी.जे. अब्दुलकलाम #YODDHASHASTRADNYARASHTRAPATI A. P. J. ABDUL KALAM
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-12-2003

    भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेतली, तेव्हा या सर्वोच्च पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर तत्वज्ञाची या पदीनिवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञाच्या आयुष्याचा, विचारसरणीचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-12-2003

    रोचक परिचय... भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २५ जुलै २००२ रोजी शपथ घेती, तेव्हा या सर्वोच्य पदावर आरूढ होणारी राजकीय क्षेत्राबाहेरची दुसरी व्यक्ती अशी नोंद इतिहासात झाली. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या थोर त्वज्ञाची या पदी निवड झाली होती. डॉ. कलाम हे मुळातले एक योद्धा शास्त्रज्ञ. ‘सामर्थ्य सामर्थ्यांचा आदर करते’ हे सूत्र मनाशी बाळगून त्यांनी भारताला संरक्षणदृष्ट्या समर्थ करण्याचे स्वप्न उरी बाळगले. १९८२ ते १९९२ या अवघ्या दहा वर्षांत ‘एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना’ पूर्ण केली आणि त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग आणि आकाश या पंचास्त्रांचा उदय झाला. देशाचा सर्वोच्च नेता बनलेल्या या थोर शास्त्रज्ञानाच्या आयुष्याचा, विचारसरणींचा जुजबी परिचय सर्वसामान्यांना व्हावा म्हणून माधव मोर्डेकर यांनी लिहिलेले त्यांचे छोटेखानी चरित्र रोचक व लहानथोरांसाठी उपयुक्त आहे. डॉ. कलाम यांचा जीवनपट थोडक्यात विशद करतानाच त्यांच्या उत्तुंग कार्याचा सुरेख आढावाही घेतल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-09-2003

    असामान्य कर्तृत्वाचा छोटेखानी आढावा... ‘अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील... भारताचे भविष्य घडविणाऱ्या अशा सृजनशील साहसांपैकीच एक नाव म्हणजे डॉ. ए. पी. अब्दुल कलाम भारताचे बारावे राष्ट्रपती म्हणून डॉ. ए. पी. अब्दुल कलाम यांची निवड झाली. यापूर्वी ते एक जगद् विख्यात शास्त्रज्ञ म्हणून लोकांना परिचित होते. एक साधं परंतु बुद्धिमान व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची भारतीयांवर छाप आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा वेध माधव मोर्डेकर यांनी ‘योद्धा शास्त्रज्ञ राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या पुस्तकाद्वारे घेतली आहे. तामीळनाडू राज्यातील रामेश्वरम् या लहानशा गावात जन्मलेल्या डॉ. कलामांनी एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ म्हणून कशी झेप घेतली याची आढावा लेखकाने या पुस्तकातून घेतला आहे. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म, बालपण व शिक्षण कसे व कुठे झाले याबद्दल सुरुवातीला संरक्षण लेखकाने माहिती दिली आहे. डॉ. कलामांचा मूळ पिंडच संशोधकाचा. संरक्षण खात्यात त्यांच्याकडे ‘डार्ट’ या युद्धात वापरायच्या विमानाचा आराखडा सोपवला. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्या रुपाने कलामांना एक परिपूर्ण विज्ञानसंशोधक लाभला. डॉ. साराभार्इंच्या आश्वांसक छायेखाली त्यांच्यातील शास्त्रज्ञाची प्रगती झाली. थुंबा येथील अवकाशतळाच्या कार्यालयाची जबाबदारी, नासामध्ये प्रशिक्षणाची संधी, नाईके-अपाची भारताची पहिल्या वहिल्या अंतराळयानाच्या जुळवा-जुळवीत कमालांचा सहभाग, साऊंड रॉकेटस् आणि लाँचिंग रॉकेट्स, पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग व अग्नी या क्षेपणास्त्र निर्मितीपर्यंतचा अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीचा आलेख लेखकाने शब्दबद्ध केला आहे. या वाटचालीत त्यांच्यावरील आघात आणि आजवर त्यांना मिळालेले मानसन्मानाबद्दलही लेखक लिहितो. डॉ. कलामांनी संशोधन हा व्यवसाय बनू दिला नाही. संशोधन हा त्यांचा ध्यास, ध्येय, धर्म बनलं. भारताचे राष्ट्रपतीपद हे कलामांच्या कारकिर्दीतील मानाचा मुकुट म्हणावा लागेल. डॉ. अब्दुल कलामांकडे पाहिले की जाणवते ‘या पंखांना क्षितीज नाही.’ त्यांच्या कार्यकतृत्वाची कमान नेहमीच चढती राहील. डॉ. कलामांच्या असामान्य कतृत्वाचा छोटेखानी पुस्ताकात घेतलेला आढावा सिमित वाटला तरी लेखकाने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-10-2003

    हिंदुस्थानचे विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे छोटेखानी चरित्र माधव मोर्डेकर यांनी लिहिले आहे. डॉ. कलाम हे नामवंत शास्त्रज्ञ असून संशोधकाचा होत. संरक्षण खात्यात त्यांना विमानाचा आराखडा तयार करण्याचे काम मिळाले. यानंतरच्या कामगिरीचा तयांच्याविषयी लोकांत खूप कुतूहल आहे. रामेश्वरम येथे संपन्न कुटुंबात जन्मलेल्या डॉ. कलाम यांना घरची फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच त्यांच्यावर कुटुंबात उत्तम संस्कार झाले. त्यांचा मूळ पिंड आलेख सतत चढताच राहिला. तरुण पिढीने त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घ्यावी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more