* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YUGANDHAR IS ANOTHER NOVEL OF SHIVAJI SAWANT BASED ON THE LIFE OF KRISHNA, A GREAT CHARACTER IN MAHABHARATA AND OTHER NARRATIVE EPICS AS WELL AS THE GOD OF THE HINDUS.YUGANDHAR IS ONE OF THE BEST AND MOST FAMOUS NOVEL OF MARATHI LANGUAGE AND IT IS AWARDED WITH MANY OF THE PRIZES AND AWARDS GIVEN BY THE SAHITYA ACADEMY.
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!

No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarTanmay Mandarekar

    आनंद,भावना,प्रेम,विश्वास या चर्तुश्वांनी जोडलेल्या भावरथाचा `नंदीघोष` पाहिला. भरधाव वेगाने दौडणारा ,कपिध्वज फडकणारा ` नंदीघोष` दुरून ही नजरेत येत होता. क्षणार्धात रथाचे आवेग आवळले.. एक गौरवर्णी गांडीवधारी व्यक्ती रथातून अलगद उतरली अन भूमातेला स्पर्शकरून निश्चल अवस्थेत बसली. त्या नीलवर्णी शांतमूर्तीतून बासरीचे मंजुळ स्वर येऊ लागले की सुदर्शनाचे तेज वाढू लागले.अजितंजय धनुची प्रत्यंचा ओढली गेली .पाहता पाहता नीलवर्णी देह चराचर व्यापून टाकला. विश्वाच्या कानाकोपऱ्यातून दोन शब्दांनी जयघोष मांडला.. कृष्ण ..कृष्ण..कृष्ण.. या मुरलीधर गिरीधारीचे विराट रूप पाहता अर्जुनाच्या ही डोळ्याचे पारणे फिटावे. असा हा मनमोहन, सुदर्शनचक्रधारी समजावा तरी कसा ? ज्याने राधाराणीसह प्रेमयोग मांडला तर दारूका सह सारथ्ययोग खेळला.. त्या भगवद्गीतेने अर्जुन पावन झाला तर श्रीमदभागवताने उद्धव उद्धरला.त्याने प्रेम भावनांचे प्रतीक असे `भाववृंदावण` निर्मिले.पश्चिम सागराच्या तटावर सुवर्णी द्वारीका स्थापिली.या विश्वाच्या नियंत्याला जाणून घेण्यास युगानेयुगे पार पडावी, हेच त्या विश्वनारायनाचे भाग्य!! या विश्वनिर्मात्याला एकेरी नावाने उद्बोधण्यात स्वारस्य वाटावे,अशी त्या मधुसूदनाची महती..त्याचे जीवन म्हणजे हजारो पाकळ्यांनी बहरलेले कमलपुष्पच. जिच्या प्रत्येक पाकळीवर त्याच्या प्रत्येक कृतीचा भावार्थ लपला आहे.या भावविश्वाचे कमल दल उमलावे अन त्या भावरसात आकंठ वहावे. या भावरसात गीतेचे अमृत बोल आहे ..तर भागवत पुराणाचे अगाध ज्ञान .. हे मनमोहना, जरी देवांच्या पदी क्षीरसागरात विराम करीत असलास, तरी आजही या पृथ्वीवर वावरताना दिसतोस.. तुझ्या बाळलीलांनी गोकुळ बहारतोस. जिथं मुरलीचे धून चरचरांत मधुर स्वर निर्माण करतात,तर तू मांडलेला भावरास आजही भाववृंदावणात फेर धरीत आहे. तुझा जन्म जरी त्या बंदिवानांच्या कैदेतील असला,तरी लटक्या बोलांनी सारं गोकुळ खेळवलंस.अपार लीलांनी असुरांचा लीलया वध केला.पण तुझी कोणतीही कृती अतिशयोक्ती नव्हती, मानवजातीच्या आवाक्याबाहेरची नव्हती.तुझा जन्म हेच नमूद करीत होता की ," तू मनुष्यरूप धारण केलं आहे, तुझी कृत्ये ही मनुष्यकसोटीस उतरणारी असावी". तरी तुला अवतारी मानण्यापेक्षा तुझं महान मनुष्यपण जाणणे, योग्य वाटावे. जरी देवाचा अवतार असला,तरी आपलेपणाची भावना हेच तुझं मोठेपण.. भावार्थ काय? तर माणूस हा देवाला देव्हाऱ्यात पुजून त्याच्या चरित्रास केवळ देवालाच शक्य होते , असे म्हणून त्याच्या सर्व लीलांची एकाधिकारशाही देवत्वावर सोडून मोकळा असतो.. पण तुझी महान कृत्ये ही देवत्वापेक्षा श्रेष्ठ मनुष्यासम भासतात. म्हणूनच तू नर श्रेष्ठ असून युगानुयुगे तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तुझ्या सत्मार्गावर चालणे, हेच मनुष्यकर्म. तू कधीही कोणत्या राजसिंहासनावर बसला नाही. कधी कोणतं उत्तरदायित्व स्वीकारले नाही. केवळ कर्तव्य केलं. प्रेमयोग मांडला.कंस वधानंतर उग्रसेन यांना मथुरेचं महाराज पद बहाल केलं. द्वारीका निर्मिली.पण राजपद वसुदेवांकडे दिलं. करवीरच्या श्र श्रुंगाला वधलं.नरकासुराचा वध केला. जरासंध भीमाकरवी मारला तर शिशुपालाचा शिरच्छेद केला..पण कधी राजगादी हस्तगत केली नाही.अन्यायकारी राजांचा वध करून तेथील जनतेस मुक्त करणे,हेच आद्यकर्तव्य. त्यांच्याच पुत्रांच्या खांद्यावर राज्य सोपवून पुढील कर्तव्यास मार्गक्रमण करणे,हीच तुझी नीती..!! महाभारत या महागाथेचा कर्ता, करविता अन कर्मयोगी म्हणजे श्रीकृष्ण.. महाभारत हे केवळ महायुद्ध नव्हते तर महायज्ञ होता. तिथं रक्ताची,त्यागाची,नात्यांची,प्रेमाची ,भावनांची समिधा अर्पण करावी लागली.या महायज्ञातून निष्पन्न झाली महातेजाची ,महाज्ञानाची कर्मगाथा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ हे पद्मनाभा ,जिथं अर्जुन सारखा महारथी हताश होऊन समरभूमीवर बसला,तेव्हा कृष्णबोलीतून कर्मगीता सांगितली.कर्माची जाणीव करून दिली. सारा आर्यावर्त ज्या युद्धासाठी कुरुक्षेत्र व्यापला होता ,त्या महायज्ञाचा यज्ञकर्ता तूच होता. तसं दुर्योधन, दुशासन,शकुनी यांचा एका क्षणात शिरच्छेद करता आला असता,द्रौपदीचे वस्त्रहरण घडताना लज्जारक्षणासोबत सुदर्शनाचे प्रक्षेपण करून उभा हस्तिनापूर रक्तरंजित करण्याची तुझी शक्ती होती.पण तसं तू केलं नाही.कारण तुला या महायज्ञाचे महत्त्व पटवून द्यायचं होतं. युगानेयुगे जगाला शिकवण द्यायची होती. जिथं नाती गोती,आपलं-परकं बाजूला सारून जीवन सार द्यायचं कर्तव्य तुला पार पाडायचे होते . या महासंग्रामात तू कधीच शस्त्र हाती घेतलं नाही, केवळ भूषविले सारथ्यपद..हा सारथ्य योग जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी केला होता,हे तुलाच ठाऊक!! तू जलपुरुष आहेस,असं म्हणतात. म्हणजे मथुरेची यमुना वा द्वारकेचा दर्या.जिथं पाणी तिथं तू..युद्धानंतर मात्र तू द्वारकेत विसावलास.त्या उत्तर कृष्ण अध्यायात मात्र उन्मत यादवांचा विध्वंस झाला.तुझे प्राण प्रिय पुत्र ,यादवसेन सारे यादवीत मारले गेले.. बलरामाने ही दर्याजलात प्राणार्पण केला. त्या प्रभास पावन क्षेत्री तुझा अध्याय संपवण्याचा काळ आला..जाता जाता उद्धवाला `उद्धव गीतेचे` भावामृत देऊन गेलास अन अश्ववृक्षाच्या घनदाट सावलीत पायाच्या तळव्यात तीर घुसला अन या कृष्ण जीवनाचा अंत केलास.. या वासुदेवाला जाणून घेण्यास हा जीवन यज्ञ ही अपुरा पडावा. युगानेयुगे जन्म घेतला,तरी तू कळणार नाहीस रे.. अनंत हस्ते द्यावे या सर्वेश्वराने.. घ्यावे किती या दो कराने... परम अवतारी..सुदर्शन चक्रधारी.. तुझं एक रूप जाणायला हे जीवन अपूरे पडावं,तिथं त्या पार्थाने कसं विश्वरूप जाणलं असावं.तू परम अवतारी आहेस. तुझ्या इशाऱ्यावर या कळसूत्री बाहुल्या नाचतात..अखेर तूच सुत्रधार.. तुला शोधायचं तरी कुठं? मथुरा,वृंदावन, गोकुळ,द्वारका,कुरुक्षेत्र सारं धुंडाळलं. पण तू गवसला नाहीस.. तू चराचरात आहे असं म्हणतात. पण तू दिसत नाहीस.नजरेत येत नाहीस.जाणवते ते तुझं `अस्तित्व`. कानी पडतात तुझ्या भावमुरलीचे सुरेल स्वर..कदाचित त्या स्वररागात तू लपला असावा!!! असा युगानुयुगे शिरी धारण करावा असा युगंधर नक्की वाचा ...Read more

  • Rating StarSanjay Dhote

    अरे जबरदस्त! मी वाचली आहे ही कादंबरी .

  • Rating StarAtul Junnarkar

    पुस्तक वाचून झाल्यावर आनंद म्हणजे काय ? हे समजले व डोळे पानावले खूप सुंदर

  • Rating StarRutuja Pardeshi

    इतकी देखणी भाषा की सहजच वाचणारा तिच्यात गुंतत जातो!

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more