* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZADVATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660463
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A STORY COMES IN DIFFERENT FORMS, IT SEARCHES THROUGH THE DIFFERENT MODES OF LIFE. NONE OF THE EXPERIENCES OR FORMS OF LIFE ARE FORBIDDEN TO IT. AT THE SAME TIME, THE WRITER UNDERGOES SOME PARTICULAR LIFE-STYLE. HE EXPRESSES THIS THROUGH HIS WRITINGS. STILL, HE TRIES TO TAKE AN AIM AT THE UNIVERSAL HAPPENINGS BASED ON HIS PERSONAL EXPERIENCES. THIS IN TURN MAKES THE STORY UNIVERSAL WITH ITS PECULIAR BODY AND FORM. THIS IS A UNIQUE FEATURE OF THE ARTISTIC STORIES. WE TASTE THE TRUENESS OF THIS THROUGHOUT ANAND YADAV`S STORIES SKETCHED IN `ZADVATA`, LITERALLY MEANING THE WAYS IN A JUNGLE. EVEN THOUGH THE AUTHOR IS EXPLAINING HIS PERSONAL EXPERIENCES, THE READERS FIND THEM TO BE UNIVERSAL. EACH AND EVERY LEAF OF ALL THE TREES MAKE THIS COME TRUE.
कथा ही विविध रूपांनी जशी अवतरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वज्र्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या `झाडवाटा`मध्ये याचा प्रत्यय येतो. ते `झाडवाटा` धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. `झाडवाटा`ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-04-2001

    झाडवाटांवरचा नवा प्रवास… गाव आणि शहर यांच्यातील फरक हा केवळ सोयीसुविधांचा नसतो, तर तो विभिन्न जीवनदृष्टींचा फरक असू शकतो– असा प्रत्यय देणाऱ्या कथा झाडवाटांमध्ये भेटतात. मराठी कथेला आणि पर्यायाने कथालेखकांना वर्णनांचा सोस असल्याचे दिसते. आनंद यादवां्या कथेतील वर्णने कथाबीज घेऊन येतात, नेमकी असतात. ‘एका दगडी घराचा इतिहास’ या कथेमध्ये वस्तुत: तो त्या घरातील गुंडांचा इतिहास आहे. भमा मांग व त्याचे भाऊ यांचा गावात चालणारा अमानुष कारभार, गुंडगिरी, खून, दहशत याचा प्रत्यय या ‘इतिहासा’तून येतो– ‘... ह्या घराला पोरांनी मारलेली ढेकणं, पुसलेला शेंबूड, कोळशाच्या रेघोट्या आपल्या भिंतीच्या अंगावर वागवायला अभिमान वाटायचा–’ यासारखे अभिप्राय किंवा दोन पैकी उजव्या बाजूची खिडकी बुजवल्यामुळे ‘खुनात डोळा फुटलेल्या जानू पैलवानागत ते घर वाटतं’– अशा वर्णनांमधून घराचा इतिहास, घराचे नायक (?), घराचे कथानक एकाच वेळी आकळतं. आणि अशा घराचे भवितव्य काय? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सुचवून कथा संपते. ‘बाकड्यावरचं जग’ ही रूढ अर्थाने कथा म्हणता येणार नाही. अनिल अवचटांची आठवण करून देणारी शैली यात आनंद यादव वापरतात. रिपोर्टाजसारखा प्रवासाचा आढावा यात घेतला आहे. त्यातील प्रवासाचे रूपक ‘बहुप्रसवी’ आहे व ते अंधारयुग, अश्मयुग, आधुनिक युग या साऱ्याचा समावेश करणारे आहे. आपण खरंच प्रगत झालो का? ‘आपली खेडी’ आणि ‘प्रसार माध्यमे त्यांचे जे चित्र उभे करतात’ यातील दरी किती सखोल आहे याचा अंदाज या कथेमधून येतो. ‘झाडवाटा’ ह्या १३९ पानी कथासंग्रहात आनंद यादव यांच्या एकूण १४ कथा आहेत. अपघातामध्ये हात गमावल्यानंतर जगावं लागणारं विमनस्क जगणं, हातांच्या अभावी जगण्यातील अपुरेपणा, ठसठस यांचा अत्यंत संयत अनुभव घेऊन ‘हात’ ही कथा आपल्यासमोर येते. खाजवणे, लाळ पुसणे, घोंघावणाऱ्या माशा उडवून लावणे इ. अनेक गोष्टींना पारखा झालेला, मनाने घायाळ झालेला अपंग व त्याची बायको मंजी यांचे चित्रण दूर कथेमध्ये केले आहे. अपघतावर मात करून जगण्याची ताकद व इर्षा यांचा या कथेमध्ये मिळणारा प्रत्यय परिणामकारक आहे. हत्तींच्या कळपामधील घडामोडींवर लिहिलेली ‘नर’ही कथा हत्तींच्या बारीकसारीक तपशिलांमुळे विचक्षण झाली आहे. हत्तींच्या हालचाली, त्यांचे कान हलवण्याची रीत, सोंडेने फुत्कार सोडणे, तसेच कानोसा घेणे, बेचैनीत पाय हलविणे यासारखी वर्णने नैसर्गिक व म्हणून प्रवाही झाली आहेत. स्थूल मादीची आकांक्षा धरणारा एक नर हत्ती, त्याची तिच्यावरील माया, त्यांचे खेळ व चाळे– कळपाच्या प्रमुखाशी तिच्यामुळे घेतलेले वितुष्ट, त्या ‘महाराजांशी’ दिलेली टक्कर तिथपासून त्याने कळप सोडणे, दुसऱ्या मादीशी त्याला पकडून नेण्यापर्यंतच्या घडामोडी या कथेत आहेत. पालवी आणि पानगळ ही कथा दत्तोबा व त्याच्या भावंडांची सावकारी कर्ज, सव्याज परतफेड, बापाचं छत्र उठलेलं, सोबत तीन धाकटी भावंडे या दत्तोबा एका कमजोर क्षणी घर सोडून जातो. नंतर तो २०-२५ वर्षांनी परत येतो. तोवर त्याच्या तिघा भावांची ३ घरे झालेली असतात. कूळकायद्याचा फायदा होतो. सावकारीचा नष्टावा झाल्यामुळे, भाऊ गेला तरी तशीच झगडत राहिलेली किसाखा, रामजी, मारुती ही दत्तोबाची भावंडे हळूहळू भरभराटीस येतात. मोठी होतात. गब्बर होतात. लग्न, संसार व प्रेम याला मुकलेला एक अभागी भाऊ ‘पालवी आणि पानगळ’ मध्ये रंगविला आहे. एकीकडे परंपरेशी नातं सांगणाऱ्या आनंद यादव यांच्या कथा ‘ग्रामीण’ आहेत, पण त्या कथांमध्ये घटनांपेक्षा, चित्तथरारक कलाटणीपेक्षा, दृष्टिकोनांचा विस्तार दिसतो. कथेतील कथाबीज हे ग्रामीणतेमुळे बहरास येते. आनंद यादवांच्या कथेतील ग्रामीणता ही ‘ग्राम्य’ भाषेमुळे आलेली नाही. वर्णनांमुळेही आलेली नाही. अनुभवाच्या अस्सल मुशीतून यादवांनी ग्रामीणता येते. आकारते. म्हणूनच संकेतसाध्य वाटा सोडून या झाडवाटांनी केलेला प्रवास जास्त बहारीचा, ताजा व स्वयंशोधात्म झाला आहे. काही कथा ह्या ‘रिपोर्टाज् ’ ह्या रूपबंदाशी जास्त जवळीकीचे नाते सांगत असल्यामुळे त्यांना ‘कथा’ म्हणताना, कथेची व्याख्या फारच रुंदवावी लागते. प्रसन्न नसला तरीही एक अस्सल अनुभव आपल्याला झाडवाटांमधून मिळतो. हा अनुभव आपल्याला मराठी ग्रामीणतेच्या अंतरंगाचे दर्शन घडवितो. मराठी समाज, मराठी कृती व मराठी परिसराचा आरसा बनून हा अनुभव येतो आणि सहजरीत्या आपल्याला भिडतो. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 05-08-2001

    महाराष्ट्राच्या मातीत उमललेल्या झाडवाटा… झाडवाटा म्हणजे रानवाट ! सापासारखी वळणं, वळसे घेत झाडीतून, रानातून जाणाऱ्या वाटा. झाडं आणि रानं आता ग्रामीण भागातच उरलेयत, त्यामुळे ‘झाडवाटा’ हा ग्रामीण कथांचा संग्रह हे वेगळे सांगायला नको. आपल्या देशाच्या, साजाच्या पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेचा केंद्रिंबदू गाव हा होता. आपली ही ग्रामाधारित समाजरचना शतकानुशतकं टिकली. तिच्यात दोष नव्हते असं नाही, तरीही अनेक परकीय आक्रमणांना तोंड देऊन ती टिकून राहिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हीच रचना तिच्यातले दोष काढून टाकून चालू ठेवायला हवी होती किंवा ती व्यवस्था पूर्णच बदलून तिच्याचसारखी सर्वांगीण म्हणजे संपूर्ण समाजाचा विचार करणारी नवी रचना आणायला हवी होती. दुर्दैवाने आपल्या नेत्यांनी आपल्या समाजाचा विचार पाश्चिमात्त्य चष्म्यातून केला. जुनी रचना कालबाह्य म्हणून रद्द ठरवली. नवी रचना करण्याची तर त्यांच्यात कुवतच नव्हती. लोकशाहीवर आधारलेला समाजवादी भांडलवाद आम्ही स्वीकारला. परिणामी या सगळ्या व्यवस्थांमधले तोटेच फक्त आमच्या नशिबी आले. विकास या गोंडस नावाखाली सगळं जीवनच बकाल होत चाललंय. शहरं प्रमाणाबाहेर फुगतायत आणि गावं ओस पडतायत. रोजगाराच्या संधीच नाहीत. मग माणसांनी तरी काय करावं ? उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असं एकेकाळी म्हटलं जात असे. आज ही म्हण नेहमी उलटी झालीय. ज्या गावामधले लोक आमदार, खासदार, मंत्रीबिंत्री झाले त्यांनी सरकारी पैसा आपापल्या गावांकडे वळवला. कालवे आले. धरणं झाली. कोरडवाहू शेतीची बागायत झाली. साखर कारखाने आले, पण तिथला सर्वसामान्य माणूस सुखी झाला का ? याचं उत्तर नकारार्थी आहे. पूर्वी वतनदार, देशमुख, देशपांडे, पाटील असत. ते सामान्य रयतेला गुलामासारखं वागवत. आमदार - खासदार या त्यांच्याच आधुनिक आवृत्त्या. ते आणि त्यांचे हुजरे गब्बर झाले. शहरातलं गलिच्छ राजकारण त्यांच्यामार्फत थेट गावापर्यंत धडकू लागलं. साखर कारखान्यांच्या मळीचा उपयोग करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मद्यार्क कारखाने निघाले. दारूची दुकानं निघाली. गोर-गरिबांचा ग्रामीण महाराष्ट्र एका नव्याच विळख्यात अडकत चालला. प्रस्तुत ‘झाडवाटा’ या कथासंग्रहातून आनंद यादवांनी जुनी समाजरचना, उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण महाराष्ट्राचा वेध घेतला आहे. बाकड्यावरचं जग, नवे वळण, झाडांची रानवाट या कथांमधून बदलत्या महाराष्ट्राचं लेखकाने केलेलं चित्रण वाचकाला अस्वस्थ करतं, अंतर्मुख करतं. कुटुंबनियोजन ही आमच्या सरकारची अशीच एक विकास संकल्पना. वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या समस्या वाढतात. म्हणून कुटुंबनियोजन जवळजवळ सक्तीचं करण्यात आलं. जिल्हा परिषदांच्या शाळांमधले शिक्षक म्हणजे जणू हक्काचे गुलामच. त्यांना प्रत्येकी वीस -वीस माणसं गोळा करून आणण्याचे हुकूम सुटले. शिक्षकांनी मुलांना शिकवायचं की सरकारी कोटा पूर्ण करण्यासाठी नसबंदीच्या केसेस जमा करायच्या ? पण सारासारविवेक आणि सरकारी अधिकारी यांचा संबंधच काय ? ‘बदली’ या कथेतला रेड्यासारखा माजलेला एडकेसाहेब मोरे मास्तरांना हुकूम सोडतो. ‘गावातून वीस माणसं गोळा करून आणा, नाहीतर शाळेतली पोरं हाकून आणा. कोटा पूर्ण झाला पाहिजे.’ मोरे मास्तर पळून जातात आणि परिणाम म्हणून नको त्या गावी बदलीचा हुकूम त्यांच्या हातात पडतो. एका शाळामास्तराच्या ओढगस्तीच्या संसाराचं, आजच्या तथाकथित विज्ञानयुगातही समाजात पक्क्या रूढावलेल्या काही समजुतींचे चित्रण लेखकाने यथार्थ उभं केलं आहे. संस्कृत साहित्यात शरद आणि वसंत या ऋतूंची बहारदार वर्णन आहेत. भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या महाराष्ट्रात मात्र वर्षा हाच ऋतू सर्वात बहारीचा. त्यातून तो पावसाळा दुष्काळानंतरचा बरसणारा असेल तर मग बघायलाच नको. ‘दुष्काळानंतरचा पाऊस’ या कथेत तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बरसणाऱ्या पावसाचं आणि तो धुवाधार पाऊस अंगावर झेलणाऱ्या माणसांचं, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचं अत्यंत बहारीचं वर्णन लेखकानं केलं आहे. लेखकासोबत आपणही त्या झिम्मड पावसात भिजू लागतो. पावसाच्या बरसत्या धारांबरोबर लेखकाचा कृत्रिम शहरीपणा जसा वाहून जाऊ लागतो आणि निसर्ग त्याच्या मृद्गंदासह अंगात भिनू लागतो तशीच स्थिती वाचकाचीही होऊन जाते. एकंदरीत ‘झाडवाटा’मधल्या कथा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतून उमलून आलेल्या आहेत. या मातीचे गुण आणि दोष, व्यथा आणि वेदना, सुख-दु:खं सारं काही अस्सल मराठी ढंगात इथे आलेलं आहे. पश्चिमी ढंगाची नटवी कृत्रिमता इथे जराही नाही. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ आणि सुनील मेहतांची निर्मिती उत्तम. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more