* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258570
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ZANZIBARI MASALA ... A DELICIOUS LITERARY TREAT WITH A MIXTURE OF ALL TASTES. ALONG WITH THE HISTORICAL ISLAND OF ZANZIBARI, THESE WONDERFUL STORIES ARE HAPPENING ALL OVER THE WORLD. MANY OF THESE CHARACTERS ARE SPECIALLY FROM MARATHI SOIL, BUT THEY ARE WRAPPED IN COLORFUL STORIES IN OTHER CORNERS OF THE WORLD... ALTHOUGH THEIR CANVAS COVERS DIFFERENT COLORED SPACES OF THE WORLD, THEY ALSO RELATE TO OUR SOIL. THIS IS AN UNPUTDOWNABLE COLLECTION OF WONDERFUL STORIES THAT ALLOW YOU TO EXPERIENCE THE SPACE OF THE WORLD WITH THE WINGS OF IMAGINATION.
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
ZANZIBARI MASALA BY UMESH KADAM
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #UMESHKADAM #MARATHIBOOK #SHORTSTORIES #उमेशकदम #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तक
Customer Reviews
  • Rating Starकौशिक लेले

    उमेश कदम ह्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. ह्या कथांचं वैशीष्ट्य म्हणजे परदेशात प्रवास किंवा परदेशी माणसांशी आलेला संपर्क ह्यातून घडणाऱ्या प्रसंगांभोवती कथांची गुंफण आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार उमेश कदम हे शिक्षण आणि आपल्या नोकरी-व्यवसाानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहिले आहेत. परदेश म्हणजे फक्त युरोप अमेरीका नाही तर आफ्रिकन देश आणि पौर्वात्त्य देश सुद्धा ! ह्या वास्तव्यात त्यांना आलेले स्वानुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्याकडून कळलेले किस्से ह्याला थोडी काल्पनिकतेची जोड देऊन त्यांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. त्यातून प्रवासवर्णन + किश्श्यांच्या गमतीजमती + लेख + मानवी संबंधाचे पैलू असा “मसाला” तयार झाला आहे. त्याला चपखल नाव दिले आहे “झांझिबारी मसाला” लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यावर त्यांच्या विद्वत्तेची आणि अनुभवसंपन्नतेची जाणीव होईल. प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो जुई जपानला जाते – लग्नाच्या वयाची मुलगी करियरसाठी जपानला जाते. पोर परदेशात जाणार म्हणून. आईवडिलांची घालमेल. तिच्या साठी भारतात “स्थळ”दर्शन चालू असताना तिला तिकडेच कोणी आवडला तर .. ? खंडेनवमी इन मॅनहॅटन – ही गोष्ट मला खूप आवडली. एकेकाळच्या संस्थानिक घराण्यातला पण आता इंजिनियर म्हणून एमएनसी कंपनीत काम करणार मालोजी आता नोकरीसाठी अमेरिकेत गेलाय. दिवस नेमके दसऱ्याचे. खंडेनवमीची शस्त्रपूजा करायची घराण्याची परंपरा. पण अमेरिकेत खरं शस्त्र कसं बाळगणार ? तो तर गुन्हाच. पण आले देवाजिच्या मना.. तर “खंडेनवमी इन मॅनहॅटन” होईल का ? समीरचं समांतर जीवन – मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा “चावटपणा” करण्याचा सल्ला समीरला मिळतोय. काय घडणार त्यात ? क्रायसिस मधून सुटका की नवा क्रायसिस. बाय बाय बिजू – कथा नायक रॉटरडॅम शहरात गेल्यावर त्याची राहायची सोय होत नाही. भाषेच्या अडचणीमुळे त्यात भरच पडते. तेव्हा त्याला योगायोगाने भेटतो भारतातून आलेला बिजू. गरीब घरातून येऊन आपलं नशीब काढण्यासाठी युरोपात कष्ट करणारा बिजू. त्याच्या वागण्यामुळे मदत झाली आणि पुढे त्याच्या वागण्यामुळे त्रासही. “बरं झालं हा भेटला” ते “कशाला हा भेटला” असा प्रवास करणारी हि कथा. वजन कमी करण्याची गुरुकिल्ली – वजन कमी करण्याच्यासाठी “डाएट”च्या प्रयत्नांमध्ये येणारं यशापयश हा नेहमीचा विनोदी विषय. नायकाची जीभ त्याच्याबरोबर बोलतेय आणि चांगलं चुंगलं खायला लावतेय असं कल्पनारंजन आहे. पॅरिसची पोरगी पटवली पाटलानं – ही पण धमाल कथा आहे. पैशाने श्रीमंत पण परदेशाचा, परभाषेचा काही अनुभव नाही असे गावचे पाटील आपल्या मित्राबरोबर आलेत पॅरिस बघायला. त्यांना खास करून “रंगीन हसीन पॅरिस” बघायचंय. पण नुसतं बघायला गेले आणि जणू काही “बघायचा” कार्यक्रम करून आले की. पॅरिसची पोरगी पटवली. आता ही गोरी पोरगी कुठले रंग दाखवणार. नायजेरियन (अ)सत्याचे प्रयोग – नायजेरियात काम कारणाऱ्या कथानायकाचा सहकारी त्याला त्याच्या बायकोच्या तक्रारी सांगतोय तर सहकाऱ्याची बायको नवऱ्याच्या. आता काय खरं आणि काय खोटं ? कुस्कोचे पोलीस – कथा नायक दक्षिण अमेरिकेत गेला असताना त्याला विमानात चिनी “लियांग” भेटतो. गप्पागोष्टी होतात. आपल्या प्रवासाच्या गोष्टींची देवाणघेवाण होते. ओळख वाढते. मग ते पुढचे स्थलदर्शन एकत्र कारतात. पण पुढे प्रवासात दारू च्या अंमलाखाली पासपोर्ट हरवतो. आता “कुस्को” शहरातले पोलीसांना तो सापडतो. प्रवासातल्या “हरवले-सापडले” ची घालमेल दाखवणारा हा किस्सा. रुसलेला किलीमांजारो नि धुसफुसलेला गोरोंगोरो – ही गोष्ट नाहीये तर “किलीमांजारो” पर्वत आणि “गोरोंगोरो” विवराच्या भेटीबद्दलचा लेख आहे. पर्वताच्या भेटीचा योग्य पुन्हा पुन्हा हुकत होता. त्यामुळे जणू तो रुसला होता असं लेखकाला वाटलं आहे. ह्या दोन ठिकाणांचं हे प्रवास वर्णन आहे. डच पाहुणचार – दोन चिनी मित्र युरोपात फिरायला आलेत. एकाला इंग्रजी येते दुसऱ्याला फक्त चिनी भाषा. प्रवासात इंग्रजी येणारा मित्र एक दिवस लवकर परत निघतो. दुसऱ्याला फक्त एक दिवस थांबून चीनला जाणारं विमान पकडायचंय. हॉटेल मधून थेट विमानतळावर जायचंय. फार बाहेर जायचंच नाही म्हणजे भाषेची अडचण येणारच नाही. पण घालून दिलेली “लक्ष्मणरेषा” ओलांडल्यामुळे भोगावा लागला “विजनवास” – पोलीस कोठडीचा वास. असं काय केलं त्याने ? पुढे सुटका कशी होणार ? किमया टोकियो कराराची – ही पण गोष्ट नाही तर एक माहितिरंजक लेख आहे. विमान हवेत असताना घोषणा होते की “आपण सौदी च्या हवाई हद्दीतून उडत आहोत. म्हणून पंधरा मिनिटे मद्य वितरण बंद राहील.” सौदी जमिनीवर मद्यावर बंदी आहे म्हणून आकाशात पण ? असं कसं ? विमान आकाशात असताना कोणी गडबड केली, त्रासदायक कृत्य केलं तर त्याला कुठला कायदा लागू होणार विमान कंपनीच्या देशाचा का जिथून विमान उडतंय त्या देशाचा का आणि काही ? ह्यासाठी केला गेला “टोकियो करार” आणि तो करार होण्याआधी कसे मजेशीर खटले घडले होते. हे ह्या लेखात सांगितले आहे. जुई चा जपानचा अनुभव मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा “चावटपणा” करण्याचा सल्ला परदेशात शिरसावंद्य मानून प्रवासात पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे बोलणारे दोन कथानायक … ज्यातला एक नंतर पासपोर्ट हरवतो लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करत. प्रवासवर्णन-परदेशाच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह हा ललित साहित्यातला वेगळा प्रयोग वाचकांनी नक्की वाचावा. ...Read more

  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १७ जुलै २०२२

    हलक्याफुलक्या आणि तरीही गंभीरपणे काही सांगू पाहणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी एका कथेचे नाव संग्रहाला दिले आहे. या कथांच्या नावांमधूनच लक्षात येईल, की त्यात जपान, मॅनहॅटन, पॅरिस, नायजेरिया, टोकियो, हॉलंड आणि अर्थातच झांजीबार येथील परिसराचा ेरफटका असणार आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more