THE BIRTH OF A GIRL IN FARMER`S HOUSE IS LIKE THE BEGINNING OF THE CALCULATION OF HER WEDDING EXPENSES. IT IS LIKE A CURSE TO HAVE TO GIVE EVERYTHING EARNED BY THE HANDS WORKING IN THE FIELDS. MANY FAMILIES ARE STILL BURDENED BY THIS MINDSET. THEREFORE, EVEN THE HAPPY CEREMONY OF MARRIAGE BECOMES A FACE OF SORROW. THIS COLLECTION OF STORIES PRESENTS MANY LAYERS OF SUCH LIVES. THE STORIES PROVIDE A HEART-WRENCHING ACCOUNT OF MANY DISTURBING INCIDENTS, WHETHER IT BE THE DOWRY BLACK MONSTER FACING THE BRIDE`S FATHER IN MARRIAGES, AND ATTACK A PERNICIOUS PRACTICE OF INDIAN SOCIETY.
बळीराजाच्या घरी लेकीचा जन्म म्हणजे जणू तिच्या लग्नखर्चाच्या हिशोबाची सुरुवातच. शेतात राबणाऱ्या हातांनी कमावलेलं सारं लेकीच्या सासरच्यांच्या वाट्याला द्यावं लागण्याचा जणू शापच. या मानसिकतेतून असंख्य कुटुंबं आजही भरडली जातात. त्यामुळं लग्नाचा सुखावह सोहळाही दुःखाचा पट समोर मांडणारा ठरतो. अशाच आयुष्यांचे अनेक पदर हा कथासंग्रह मांडतो. लग्नसमारंभारतले हेवेदावे असतो की लेकीच्या वडिलांसमोर असणारा हुंड्याचा काळराक्षस असो, अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटनांची हृदय पिळवटणारी मांडणी या कथा करतात आणि भारतीय समाजाच्या एका विघातक प्रथेवर जोरदार प्रहार करतात.