* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZOMBI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663921
  • Edition : 27
  • Publishing Year : DECEMBER 1987
  • Weight : 400.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Sub Category : THEATRE, ACTOR, CINEMA
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ZOMBEE LITERALLY MEANS WRESTLING. THIS IS AN ACCOUNT OF A YOUTH FROM INTERIOR MAHARASHTRA. HE FIGHTS HIS WAY THROUGH JUST TO COMPLETE HIS SECONDARY EDUCATION. HIS LANDLESS FATHER TILLING LANDS FOR OTHERS, THINKS HIS SON`S EDUCATION NOT ONLY UNAFFORDABLE BUT UNWISE ALSO, HE HELPLESSLY WATCHES HIS MOTHR PERMANENTLY FATED TO THANKLESS LABOUR, CONTINEOUSLY WORKING FOR AN EVERGROWING FAMILY DEEP IN THE CLUTHES OF CUSTOMS AND SUPERSTITIONS. HE HAD TO WRESTLE WITH HARDSHIPS AND HUNGER TO COMPLETE HIS SCHOOL EDUCATION. THIS AUTOBIOGRAPHICAL NOVEL IS AN AUTHENTIC TALE AS MUCH OF THE AUTHOR AND HIS FAMILY AS OF ANY OF THE HUNDREDS OF LANDLESS FAMILIES FROM RURAL INTERIORS.
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
* प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार १९८८. * महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९. * दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स- उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९. * दे.भ.पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार पुरस्कार १९८९. * मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०. * साहित्य अकादमी पुरस्कार १९९०. * प्रवरानगर-विखेपाटील पुरस्कार १९९१ * संजीवनी साहित्य पुरस्कार ,कोपरगाव १९९४

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSurekha Abhang

    परिस्थितीवर मात करून बरेच लोक आपले शिक्षण पूर्ण करतात. मात्र त्यांना कुटुंबाची साथ असते मात्र या कादंबरीत थोडं वेगळं चित्र मला अनुभवायला मिळालं गरिबीमुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाला जन्मदात्या बापाचा विरोध असुनही लेखकाने पोटाला अन्न कमी पण पाठीवर भरूर मार घेऊन सहा सहा मैल पायी चालून आपली शिकण्याची जिद्द पुर्ण केली . *मी एक प्राथमिक शिक्षिका असल्याने सांगायला अभिमान वाटतो की लेखक लिहीतात जिल्हा परिषदेची शाळा मला माझी वाटत होती तेथील शिक्षक मला समजुन घेत होते. परंतु याचा उलट अनुभव मला माध्यमिक शाळेत आला** .बरे असो .💐💐मात्र ही कादंबरी सर्व वयोगटातील वाचकांसाठी प्रेरणा दायी आहे पण त्याहीपेक्षा आज शिक्षण घेत असलेल्या तरूण वर्गाने या कादंबरीचे वाचन जरूर करावे हे यासाठी की आज आई वडील सहज आपल्याला समजावत असतील तर हे तरूण तरूणी लगेच नाराज होतात एवढेच काय पण नको ते प्रकार आपल्याला आजुबाजुला पाहायला व ऐकायला मिळतात तेव्हा नवसंजीवनी मिळण्यासाठी ही कादंबरी जरूर एकदा तरी वाचणात यायला हवी.💐💐 दहा भावंडात असणारा आंदा काम करून , उपाशी राहून मित्रांची जुनी पुस्तक वापरून आणि दररोज उशीर झाला म्हणून अनवाणी पायाने फडक्यात भाकरी गुंडाळून शालेय शिक्षण घेतो,एवढंच काय पण कामाच खाडं व्हायला नको म्हणून घरीच अभ्यास करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावतो हे वाचताना मन गहिवरल्याशिवाय राहत नाही .💐💐याचाच अर्थ असा की जिद्द, चिकाटी असेल तर ध्येयाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. 💐💐 अजुन लिहीण्यासारख खूप आहे तुर्तास एवढेच पुरे बाकी आपण वाचणातुन अनुभवालच🌹 *हा पुस्तकातील आंदा त्या पुस्तकातच मर्यादित नाही आजही आपल्या आजूबाजूला असे आंदा आपल्याला भेटतात गरज आहे फक्त त्यांना जाणुन घेण्याची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ...Read more

  • Rating StarDr.Bhushan Phadke

    शालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या "झोंबी" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत "पु ल देशपांडे" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच "झोंबी". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, "एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, "आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल." आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more

  • Rating StarVijay Nimbalkar

    बाप अडमुठी, हेकेखोर आणि स्वताच खर करणारा पोरगा अकरावीच्या बोर्ड परिक्षेला बसला. त्यावर्षी बापाने बारावं पोरगं काढलं. हा सोडला तर सगळी पोरं रोगट. माती खाऊन नाळरोगी झालेली. ती फक्त खायच्याच कामाची. `ह्या पोरांना मी एकटा खायला घालू काय? तुला मळ्यात कम करायलाच लागंन!` पोराची शाळा बंद करण्यासाठी बापाचा युक्तिवाद. असल्या भयंकर बापाच्या नाकावर टिच्चून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं व प्राध्यापक झाला. तो पोरगा म्हणजेच लेखक आनंद यादव. - विजय निंबाळकर लोहगाव, पुणे ...Read more

  • Rating StarRagini Bagwe

    कालच "झोंबी" वाचून संपवले... पण मनात रेंगाळत राहिलेय... वाचत असतानाही बरयाचवेळा वाचन थांबवत होते... आनंद यादव प्रथमच वाचले... त्यांच्या जीवंत अनुभवांनी मन त्यांच्यापेक्षा माझेच कुचंबून जात होते...1934 ते 1955 चा काळ आहे ह्यात पण असे वाटते की कुठतरी आपणच जबाबदार त्यांच्या (आणि त्यांच्यासारख्या ईतर मुलांच्या / शेतकरी कुटुंबाच्या ) हालअपेष्टांना ... कुठे तो काळ आणि कुठे आजची पिढी...उशीरा येण्यावरून,फी वेळेत भरता येत नाही म्हणून..गरज नसलेल्या मुलांना फ्री शीप दिल्यामुळे त्यांना कसे हायस्कूलला फ्री शीप ला मुकावे लागते..पुस्तकांची व फी ची बेगमी करताना किती हाल सोसावे लागतात...किती आणि कुठे राबावे लागते..हे ते कुठेहि वाचकांकडून सहानुभूतीची अपेक्षा न बाळगता...कुठेही लेखणी न बारगळता(पु लं नी प्रस्तावनेत लिहिलेलं माझ्या विचारात ,शब्दात पकडता नाही आले असते ..असे सत्य) .. कथन करत जातात... एवढे हाल .. घरात भावंडाच्या वाढत्या लेंढरांना बाप कसा जबाबदार..तरिही शाळेला जावू नये म्हणून त्याचा बेदम मार खात...ह्या भल्या माणसाने कसे घरातल्या परिस्थितीची जबाबदारी घेत शिक्षण पूर्ण केले...आपली अभ्यासाची आणि वाचनाची , काव्य लेखनाची आवड कशी जोपासतात...ओल्ड S S C हायस्कूलात तिसरया नंबरने कसे पास होतात.... सारेच डोक्यात घोळत राहते... त्यांच्या उर्वरित 3 आत्मचरित्र पण घ्यायचीत... Hats off to you Dr Anand Yadav.. शत शत प्रणाम तुम्हांला🙏🙏 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more